Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
चणे, दाणे, वाटाणे, फुटाणे आणि बकाणे ...

Hitguj » Cuisine and Recipies » उपाहार » चणे, दाणे, वाटाणे, फुटाणे आणि बकाणे « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through January 21, 200620 01-21-06  7:23 pm

Moodi
Saturday, January 21, 2006 - 7:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्यामली thank you ग. अगदी उकडलेल्या शेंगांची आठवण आली. आता पुढच्या आठवड्यात आमच्या कडे बर्फ पडेल पण उद्याच करायला हरकत काय?

Chioo
Monday, April 23, 2007 - 9:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हल्दीरामच्या मूगडाळीसारखी मूगडाळ घरी कशी करायची? मला ती खूप आवडते पण इथे मिळत नाही. :-(

Dineshvs
Monday, April 23, 2007 - 4:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चिऊ, ईथे कृति लिहिली होती मी. आता परत थोडक्यात लिहितो.
यासाठी डाळ ताजी लागते. पाव किलो डाळीसाठी अर्धा लिटर पाण्यात एक चमचा तुरटीची पुड घालुन त्यात ती डाळ भिजत घालावी. मग चाळणीत निथळुन, सावलीतच कपड्यावर पसरुन ठेवावी. जराशी दमट असतानाच तळायला घ्यावी. यासाठी पोहे तळायची गाळणी असते ती घ्यावी. कढईच्या आणि गाळणीच्या आकाराच्या मानाने थोडीथोडी तळुन घ्यावी. तेल मध्यम तापलेले असावे. डाळ ओली असल्याने तेल उडते म्हणुन दुसर्‍या लांब दांड्याच्या चमच्याने ती गाळणीत टाकावी. हलकी होवुन वर तरंगु लागली कि गाळणी झटकुन तेल निथळावे. मग ती पेपरवर काढावी. वरुन मीठ लावावे.


Suparna
Saturday, September 15, 2007 - 11:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेशदादा किंवा मुडी,
मी काल वर मूडीने लिहिलेल्या कृतीप्रमाणे मसाल्याचे शेंगदाणे करून पाहिले. पण ते तेलात टाकल्यावर त्याचा सर्व मसाला तेलात उतरून आला व तेलाला खूप फेस आला अगदी तेल उतु जाईल एवेढा. मी लगेच गॅस बंद करून टाकला. पण अस का झालं असाव? मी सोडा पण चिमुटभर टाकला होता. व बाकी प्रमाण तेवढे तेच ठेवले. माझं काय चुकले असेल?
छान मोकळे शेंग्दाणे कसे करायचे ते पण सांगाल का? कारण बेसन टाकले की ते एकमेकांना चिकटतात व तळतानाही सुट्टे होत नाहीत.


Dineshvs
Saturday, September 15, 2007 - 2:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दाण्याना आधी पाण्याचा हात लावुन घ्यायचा. बाकिचे मिश्रण कोरडेच एकत्र करुन थाळ्यात ठेवायचे. मग त्यात ओले केलेले दाणे घालुन थाळा हलवायचा. थोडा वेळ ते तसेच राहु द्यायचे, म्हणजे मसाला दाण्याना चिकटतो.
असे शेंगदाणे अगदी थोडे थोडे तळायचे असतात. ते तळायला पोह्याची गाळणी वापरली तर चांगले. असे थाळ्यात सुकवुन घेतलेले शेंगदाणे तेलात टाकतानाच सुटे सुटे टाकता येतात.
तेल चांगले असेल, तर फ़ेस शक्यतो येणार नाही.


Suparna
Sunday, September 16, 2007 - 9:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद दिनेशदादा, तुम्ही लिहिलेत तसे आता करून पाहते. थोडा वेळ ठेवले की पुन्हा मिठामुळे पाणी सुटून ते चिकटणार नाहीत ना?

मी तेल ताजेच रिफाईंड सनफ़्लावर तेल वापरले होते पण लिहायला विसरले की स्वादासाठी वाटलेला लसून टाकला होता मसाल्यात. त्यामुळे असेल कदाचीत.........


Dineshvs
Sunday, September 16, 2007 - 11:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिठाने पाणी सुटले तरी बाकिचे पदार्थ कोरडे असल्याने, ते चिकटायचे नाहीत.
लसणीमुळे फ़ेस वैगरे यायला नको.
लसणीच्या स्वादाचे मीठही करता येते. काहि पाकळ्या चुरडुन कोरड्या मिठात बुडवुन ठेवल्या तर मीठाला लसणीचा स्वाद येतो.


Archana77
Saturday, December 29, 2007 - 12:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Namskar mandali,
mala koni ghari futane kase banavayache te sangal ka?

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators