Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
गुळपापडीच्या वड्या ...

Hitguj » Cuisine and Recipies » गोडवा » वड्या » गुळपापडीच्या वड्या « Previous Next »

Dineshvs
Thursday, August 14, 2003 - 4:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लहान मुलना दात यायच्या वेळी गुळपापडीच्या वड्या द्यायची पद्धत होती.त्या गुळाचा पाक करून करत असत.

मी मात्र पाक करत नाही. तीळ, खोबरे आणि खसखस हे तिन्ही कोरडेच गुलाबी रंगावर भाजून घ्यावे. प्रत्येकी अर्धी वाटी पुरे. मग प्रत्येकी अर्धा किलो कणीक, बेसन आणि सोयाबीनचे पीठ वेगवेगळे खमंग भाजून घ्यावे. एकावेळी दोन पीठे वेगवेगळी भाजता आली तर उत्तम. मग हे सगळे एका पातेल्यात एकत्र करावे. जर थंड झाले असेल तर परत जरा गरम करावे. मग त्यात बारीक चिरलेला गुळ,( अर्धा किलो) घालावा. उष्णतेने तो विरघळतो. मग परत थोडे तुप घालावे. व मिश्रण नीट मिसळावे. तुप लावलेल्या ताटात थापुन वड्या पाडाव्या. गुळाऐवजी थोडी काकवी घातली, तर छान चव येते. या वड्या कडक होत नाहीत.


Dineshvs
Thursday, August 14, 2003 - 5:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

varcyaa vaD\yaa itt@yaaXyaa gaÜD hÜt naahIt. hvaa Asalyaasa AaNaKI gauL Gaalaayalaa hrkt naahI. vaasaasaazI vaolacaI puD GaalaavaI.

sayonara,

majabaurIcao ÉpaMtr CMdat kolao. AaiNa gait p`aPt JaalaI.

Swati2
Thursday, August 14, 2003 - 2:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

idnaoXaÊ tumhI gauLpapDIcyaa rosaIpIt AQaa- iklaÜ p`maaNa idlaoya to kpacyaa maapanao iktI Gyaayacao saaMgaala kaÆ

Seema_
Thursday, February 16, 2006 - 4:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चन्द्रिका तुला हीच हवी होती ना recipe?
गुळ पापडी
साहित्य: १/२ कप गव्हाचे पीठ
१/३ कप किसलेला गुळ
१ चमचा दुध
१/२ चमच खसखस
१/४ चमचा वेलची पावडर
४ चमचे तुप
क्रुती
एका ताटाला तुप लावुन घ्यावे. त्यावर खसखस पसरावी.
एका भांड्यात तुप , गव्हाचे पीठ घेवुन ३ ते ४ min साठी MV मध्ये golden brown होईपर्यंत ठेवाव. मधुन मधुन हलवत रहाव.
आता mv मधुन काढुन mixture गरम असे तोवर त्यात किसलेला गुळ,दुध,वेलची पावडर घालाव.
गुळ विरघळला कि हे mixture खसखसिच्या plate वर पसरावे. वाटीन एक सारख करुन घ्याव.
आता चौकोनी तुकडे करुन गार झाल्य्वर खायला घ्याव.
...................................
source :- तरला दलाल च पुस्तक.


Arch
Wednesday, July 12, 2006 - 2:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सीमा, कालच ह्या पध्दतीने वड्या केल्या. छान झाल्या आणि अगदी पटकन. मी तूप खूप कमी घातल आणि गुळाऐवजी brown sugar वापरली. Thanks ग.

Deepa_s
Monday, May 28, 2007 - 7:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश दादा, तुम्ही लिहील आहेत,लहान मुलांना दात यायच्या वेळी गुळपापडीच्या वड्या देतात.
त्यचि रेसिपी द्या ना!



Dineshvs
Tuesday, May 29, 2007 - 3:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दीपा, वरच आहेत कि गुळपापडीच्या वड्यांची कृति.

Deepa_s
Tuesday, May 29, 2007 - 6:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पण त्या खुसखुशीत होतील ना! मला कडक वड्यांची रेसिपी हवीये. माझ्या मुलाला खाता आली नाही पाहिजे. चघळण्यासारखी हवी.

Dineshvs
Tuesday, May 29, 2007 - 7:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कडक होण्यासाठी गुळाचा पाक करावा लागेल. वरील प्रमाणात गुळात थोडे तुप घालुन पाक करायचा. पाणी घालायचे नाही. गुळ वितळला कि पिठ घालायचे. मग ताटात थापुन वड्या कापायच्या.

Deepa_s
Tuesday, May 29, 2007 - 8:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ठांकू. करून सांगते कश्या झाल्या ते.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators