|
Saj
| |
| Tuesday, February 28, 2006 - 3:18 am: |
| 
|
aamchyakade methichi bhaji ashi kartat. methi (fresh/frozen asel tar poornapane thaw karavi) barik chirun,bharpur lasun, hirvi mirchi andajane aani dane. dane chan khamang bhajun ghyayche, mag tyach garam kadhait mirchi aani thoda lasun thodasa bhajaycha. danyache sal kadhun dane ,mirachi aani lasun betache pani ghalun chan paste karaychi. fodnit laun ghalun lalsar hot aala ki methi ghalun partaychi, mith ghalayche aani thode pani ghalun zakan theun shiju dyavi. hot aali ki danya-mirachiche vatan ghalayche aani changali ukali yeu dyavi. garam garam bhakari barobar kiva chapati baro bar ekdam mastach lagte. aani palebhaji (fresh/frozen) mala tari vatte cooker madhye shijavu naye.
|
Nalini
| |
| Saturday, July 22, 2006 - 12:46 pm: |
| 
|
मेथीची सुकी भाजी: मेथी निवडुन घेऊन स्वच्छ धुऊन घ्यायची. कढईत तेल टाकुन त्यात जिरे आणि लसणाची फोडणी द्यायची. त्यात भाजी टाकुन परतवुन घ्यायची. मंद आचेवर झाकण घालुन शिजु द्यायची. तोवर मिक्सर मध्ये हिरवी मिरची आणि मीठ बारिक करुन घ्यायचे. त्यात हवे त्या प्रमाणात भाजलेले शेंगदाणे घालून ते जाडसर राहातील अश्या बेताने वाटायचे. हा मसाला भाजीत घालुन चांगले परतवुन घ्यायचे. पाणी आटेपर्यंत भाजी गॅसवरच ठवायची. पाणी आटले की थोडेसे तेल टाकुन परतवुन घेऊन गॅस बंद करायचा. मेथीची पातळ भाजी: मेथी निवडुन, धुऊन चिरुन घ्यायची. कढईत तेल टाकुन त्यात जिरे आणि लसणाची फोडणी द्यायची. त्यात भाजी टाकुन परतवुन घ्यायची. मंद आचेवर झाकण घालुन शिजु द्यायची. मिक्सर मध्ये हिरवी मिरची, मीठ आणि भाजलेले शेंगदाणे बारिक करुन घ्याचे. ही पेस्ट भाजीत घालुन परतवुन घ्यायचे. पाहिजे त्या प्रमाणात पाणी घालुन चांगली ऊकळी येऊ द्यायची. भाजी तयार. ज्वारीच्या भाकरीसोबत चुरुन खायला छान लागते. बाळंतिणीसाठी हिच भाजी एक किंवा अर्धीच मिरची घालुन करतात.
|
Dineshvs
| |
| Saturday, July 22, 2006 - 5:26 pm: |
| 
|
नलिनी, चार्याची भाजी लिहिणार होतीस ना ?
|
Savani
| |
| Sunday, July 23, 2006 - 12:29 pm: |
| 
|
नलिनी, काल मी तुझ्या पद्धतिने मेथीची पातळ भाजी केली होती. छान झाली होती. मी पातळ भाजी नेहेमी बेसन लावून आणि लसणाची वरून फ़ोडणी देऊन अशी करते. पण हा प्रकार सुद्धा छान वाटला. धन्यवाद.
|
Nalini
| |
| Tuesday, July 25, 2006 - 2:29 pm: |
| 
|
घासाची(चार्याची) भाजी. दिनेशदादाने काढलेल्या एका फोटोत घासाचा फोटो आहे. हा प्रकार खास दुभत्या जनावरांसाठी असतो. तर साधारण घासाच्या पहिल्या २ ते ३ कापण्या झाल्यानंतरच भाजीसाठी वापरला जातो. तर कापणी नंतर ४-५ दिवसांनी उगवलेला कोवळा घास खुडून घेतला जातो. त्यावर मावा नाही तसेच अळया नाहीत ह्याची खात्री करुन घ्यावी. हि भाजी स्वच्छ धुवून घ्यावी. कढईत तेल तापवून त्यात जिरे, लसणाची फोडणी द्यावी. भाजी घालावी. परतवुन झाकण घालुन ठेवावी. तोवर हिरवी मिरची, मिठ व भाजलेले शेंगदाणे पाणी न घालता जाडसर वाटुन घ्यावे. हा मसाला भाजीत घालुन चांगले परतवुन घ्यावे. पाणी पुर्णपणे आटेपर्यंत भाजी एकदोनदा परतावी. पाणी आटले की त्यात वरुन चमचाभर तेल घालुन परतुन घ्यावे. गॅस बंद करावा. भाजी तयार. ही भाजी खुपच चवदार लागते. आवडली म्हणुन खुप खाऊ नये कारण हि ऊष्ण असते. ग्रामीण बोलीभाषेतले काही शब्द न कळाल्यास्: खुडणे: २ बोटात पकडुन तोडणे. मावा: आभाळ(काळे ढग) आले की हा रोग सर्वच पालेभाज्यांवर पडतो. हिरव्या रंगाचे बारीक बारीक किडे भाजीला चिकटुन बसलेले असतात. कापणी: घास कापण्याची क्रिया. दुभते जनावर्: दुध देणारे जनावर. ह्यावेळी भारत भेटित घासाची भाजी खाण्याची ईच्छा व्यक्त केली तर मामी म्हटल्या तुम्हाला सहन होणार नाही, उन्हाळ्यात शक्यतो नाही करत भाजी. मामीला म्हटले आईने मला आवडते म्हणुन न विसरता केली असती भाजी. रात्रीच्या जेवणाला न विसरता माझ्या ताटाला भाजी लावलेली होती. माझी आवडती भाजी समोर होती पण घास गिळत नव्हता.
|
Dineshvs
| |
| Tuesday, July 25, 2006 - 5:15 pm: |
| 
|
आता परत भेटीचा योग आला कि तुलाच करायला लावणार आहे हि भाजी मी. अश्या ऊष्ण वाटणार्या भाज्यांबरोबर दहिताक आणि नाचणीची भाकरी खाल्ली तर नाही त्रास होत.
|
Bee
| |
| Wednesday, July 26, 2006 - 7:00 am: |
| 
|
नलिनी, तुला शेतातली कामे जमतात का.. म्हणजे जसे निंदणे, खुरपणे, डवरणे, पेरणी करणे आणि बरेच असतात ना.. दिनेश, तो फोटो बघायला मिळेल का.. त्यामुळे घासाची भाजी कशी असते ते तरी कळेल हो.. नाहीतर कोण अशी माहिती सांगते आजकाल.. बघा पटत असेल तर.. नलिनी, ही भाजी मेथीची आहे म्हणतेस तर ती उन्हाळ्यात कशी? हिवाळ्यात असतो ना मेथीचा हंगाम..
|
Nalini
| |
| Wednesday, July 26, 2006 - 10:10 am: |
| 
|
बी, अरे वरती कृती लिहिलिय ती घासाच्या भाजीची, मेथीच्या नव्हे. दिनेशदादाच्या पानावर आहे बघ फोटो. दिनेशदादा, अगदी नक्की. मी नाचणीची भाकरी आजतागयात खाल्ली नाहिये. आता तिकडे आल्यावरच.
|
Dineshvs
| |
| Wednesday, July 26, 2006 - 5:05 pm: |
| 
|
नाचणी सहसा डोंगरी भागातच होते. हलक्या जमिनीतले पिक ते. चार पाकळ्यांच्या फुलासारखे कणीस असते त्याचे. लाल मोहरीसारखी दिसते ती. नाचणी आहारात असल्याने, आदीवासींची प्यायच्या पाण्याची गरज फारच कमी असते. आपल्या आहारातील प्रथिने, मीठ आणि साखर यामुळे आपल्याला फार पाणी प्यावे लागते. आणि Bee नलिनीला काय येत नाही, याची यादी करणे सोपे असेल.
|
Kalidas
| |
| Tuesday, April 13, 2010 - 6:40 am: |
| 
|
Kardaichi palebhaji kashi kartat? Maya
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|