|
Milindaa
| |
| Friday, January 30, 2004 - 12:44 pm: |
| 
|
मक्याच्या दाण्यांची (ओल्या खोबर्याची) चटणी घालून उसळ इथे गृहीत धरले आहे की हे मक्याचे दाणे उकडलेले आहेत ( Tinned पण चालतात) खोबर्याची चटणी ः ओले खोबरे, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, चवीपुरते मीठ आणि साखर घालून नेहमीप्रमाणे चटणी वाटावी.. उसळ ः जीर्याच्या फोडणीत हिरवी मिरची ( याचे प्रमाण तुमची चटणी कितपत तिखट आहे यावर ठरवावे), कढीपत्ता (कढीलिंब), हळद, हिंग घालून त्यावर मक्याचे दाणे (sweet corn) घालावेत.. मग त्यात खोबर्याची चटणी (आधी वाटलेली), मीठ व थोडे पाणी घालून वाफ आणावी.. एकदम सोपा, पटकन होणारा आणि स्वादिष्ट प्रकार आहे
|
... याcआ अर्थ काय नक्की? तू कृती आम्हाला देणार आहेस की तुला याcई कृती आमcयाकडून हवी आहे
|
Milindaa
| |
| Friday, January 30, 2004 - 12:54 pm: |
| 
|
जरा दम धरा की काकू
|
आजोबा या वयात मका आववेल का आणि सोसेल का हो त्रास झाला तर सांगा बरे
|
Milindaa
| |
| Friday, January 30, 2004 - 1:13 pm: |
| 
|
काकू, नीट वाचा की.. उकडलेले corn चाववणार नाहीत का
|
अहो पण दात लावायला विसरु नका कृत्रिम हो नाही एव्हढा अविष्ट पदार्थ पाहून पाणी सुटेल आणि घाईने तोंडात टाकल्यावर आठवेल अरेcया दात लावायcए राहिले. Jokes Apart , chhan aahe kruti . Karun pahate lagech.
|
Wakdya
| |
| Saturday, January 31, 2004 - 11:44 am: |
| 
|
मिलिंदा, अगदी अस्से होते बघ, पोरीत पोरगा लांबोडा की काय से से! अरे तो दिनेश चा प्रांत आहे, आपल्यासारख्याचे काम नाही रे बाबा! BTW इकडे देशात स्वीट कॉर्न्स खुपच महाग मिळतात रे बेबी कॉर्न्स तर फ़क्त एक दोन ठिकाणी मिळतात
|
Chafa
| |
| Tuesday, February 17, 2004 - 4:30 am: |
| 
|
मिलिंदा, मी ही उसळ आज try केली. छान झाली.
|
Moodi
| |
| Saturday, January 07, 2006 - 6:29 pm: |
| 
|
मका डिलाईट साहित्य : पावशेर मक्याचे दाणे किंवा मक्याच्या २ कणसाचे काढलेले दाणे, २ कांदे, २ टॉमेटो, १ वाटी दही, १ चमचा लाल तिखट, प्रत्येकी १ चमचा धणे व जीरे पुड, १ चमचा गरम मसाला पुड, कोथिंबीर, मीठ, आले लसुण पेस्ट. कृती : मक्याचे दाणे वाफवुन घ्या. कांदे बारीक चिरुन घ्या. टॉमेटो गरम पाण्यात २ मिनिटे ठेवुन साल काढुन चिरा. दही फेटुन घ्या. तेलाची नेहेमीप्रमाणे फोडणी करुन आधी कांदा टाकुन पारदर्शक होईपर्यंत परता. मग टॉमेटो टाकुन दाटसर होऊ द्या, आले लसुण पेस्ट, धणे जीरे पुड, ग.मसाला पुड टाकुन परत परता,तिखट अन मीठ टाकुन परता मग फेटलेले दही टाका, परतुन मग मक्याचे वाफवलेले दाणे घाला, मंद आंचेवर २ मिनिट उकळु द्या. उतरवुन मग कोथिंबीर घालुन सजवा.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|