|
Savani
| |
| Saturday, May 06, 2006 - 10:40 pm: |
| 
|
अगं अळीव म्हन्जे तुळशीचं बी नव्हे गं. सुनिती, मी मागे NJ ला अपना बझार मधे अळीव पाहिले होते. तुझ्याइथे सुद्धा indian store मधे मिळत असणार नक्की. माझ्याकडे बहुदा थोडे आहेत, बघते आणि तुला मेल करते. तुला खिरी साठी हवे आहेत ना.
|
Dineshvs
| |
| Sunday, May 07, 2006 - 2:31 am: |
| 
|
नाहि अळीव म्हणजे तुळशीचे बी नाही. तुळशीचे बी तपकिरी रंगाचे असते व खसखशीपेक्षाहि बारिक असते. अळीव विटकरी रंगाचे असतात, व लांबीला तिळाएवढे असतात, पण तिळासारखे चपटे नसतात. अळिवाची पाने चिनी जेवणात वापरतात. हि पाने तिखट लागतात. त्रिदलीय असतात पण प्रत्येक पान २ mm पेक्षाहि लांबीला कमी असते. ताज्या हर्ब्ज मिळणार्या दुकानात हि पाने मिळु शकतात. हि पाने ईतकी नाजुक असतात कि त्याची रोपेच विकायला असतात. तशी पाने कुठे दिसली तर त्याचे नाव असेल तिथे. मग म्हणायचे ये जो झाड आहे ना, ऊसका बी च मंगताय.
|
कराडकर, भले शाबास, छान! अभिनन्दन!!
|
Deepa_s
| |
| Monday, May 22, 2006 - 1:09 pm: |
| 
|
ते क्रेस मिळतं ना एग सडविच मधे घालायला, ते म्हणजे आळिवाची पानंच असतात. तेव्हा क्रेस सीडस अस विचारून बघ. नाहीतर हलीम असा हे (बहुदा फ़ारसी) शब्द आहे. ते पण विचार भारतीय दुकानात. इंग्लंडला मिळायचे सहज.
|
Raigad
| |
| Tuesday, May 26, 2009 - 3:13 am: |
| 
|
मेथ्यांच्या दाण्यांची भाजी मेथ्या दाणे दूधनिर्मितीच्या द्रुष्टीने फ़ार चांगले. माझी आई यांची भाजी अशी करते मेथ्या दाणे रात्र भर पाण्यात भिजवून सकाळी उपसून ठेवावे. मोड येऊन द्यावेत. भांड्यात तेलावर बारीक कापलेला कांदा परतून त्यात हे मोड आलेले मेथ्या दाणे घालावे. हळद्-तिखट, थोडा तळला मसाला (कांदा व सुकं खोबरं भाजून वाटून घेतलं की त्याला तळला मसाला म्हणतात),मीठ, थोडे पाणी घालून झाकून ठेवावे थोडा वेळ. मग थोडी चिंच व गूळ घालावा. वरून कोथिंबीर घालावी. फ़ार सुंदर भाजी होते. सोडे खाणार्या मंडळींकरीता ह्या भाजीत सोडे घालून तर तिची चव म्हणजे अहाहा. याकरीता सोडे भिजवून, पाणी पिळून काढून, आलं-लसूणाच्या वाटण लावून वेगळे परतून (शिजवून) घ्यावे. व वरील प्रमाणेच भाजी करून त्यात घालावे. व भाजीला एक उकळी येउ द्यावी. सोडे घातल्यास गूळ मात्र घालू नये.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|