Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
तिळगूळ

Hitguj » Cuisine and Recipies » गोडवा » तिळगूळ « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through January 24, 200630 01-24-06  5:35 am

Parijat30
Tuesday, January 24, 2006 - 5:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हाय जयावी, मी ते परत गरम केल्यावर झाली चिक्की नीट आणि माझा पहिला प्रयोग अयशस्वी होता होता यशस्वी झाल्याने आता मी दाण्याची चिक्की करायच्या विचारात आहे.

मी आता
US मध्ये आहे आणि माझे माहेर नागपुरचे आहे. तु नागपुरला कुठे असते?

Admin
Wednesday, January 25, 2006 - 4:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इथल्या नागपूरच्या गप्पा
इथे हलवल्या आहेत

Moodi
Tuesday, February 07, 2006 - 10:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ही गुळाबद्दलची संमिश्र माहितीची लिंक इथेच देतेय.

http://www.esakal.com/static/ruchiplt395.html .

Dineshvs
Thursday, January 11, 2007 - 1:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दोन कप शुभ्र साखर एक कप पाण्यात भिजत घालावी. अर्ध्या तासाने तिचा मंद आचेवर पाक करायला घ्यावा. त्यात अर्धा कप दुध घालावे व अर्धा कप ताक घालावे. असे केल्याने सर्व मळी वर येईल. पाक गाळुन सर्व मळी काढुन टाकावी.
पाक गोळीबंद व्हायला हवा. हलवा पहाटेच करायला घ्यावा. म्हणजे काटा चांगला येतो.
दुसर्‍या एका कढईत दोन चमचे तीळ भाजायला घ्यावे. पाक सतत गरम राहिल असे बघावे. या तीळावर अर्धा अर्धा चमचा पाक घालत रहावे. हा पाक तीळावर जमत जातो. तीळ सतत हलवत रहावेत. एकमेकाना चिकटु देऊ नयेत.
पाकाचा थर जर कढईत बसला तर कढई धुवुन घ्यावी. व परत सुरवात करावी. हळु हळु तीळावर पाक चढत जातो व काटा येतो.
थोड्या वेळाने अर्धे तीळ बाजुला करावेत. व पुढे पाक चढवत रहावा.
मग पाकात हवा तो रंग घालुन उरलेल्या तीळावर पाक चढवावा.
तीळाबरोबर खसखस, काकडीच्या बिया, वेलचीचे दाणे, लवंगा यावर पण पाक चढवता येतो.
तयार झालेला हलवा, थोडावेळ कोवळ्या उन्हात ठेवावा. म्हणजे त्याला चमक येते.


Arch
Wednesday, January 16, 2008 - 6:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जयावी, काल तुझ्या recipe ने तिळाची चिक्की केली. फ़ारच पटकन आणि एकदम मस्त झाली. Thanks ग. आणि ते भरपूर तूप लावणं खरच महत्वाच आहे.

Dineshvs
Thursday, January 17, 2008 - 2:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आर्च, जयु सध्या भारतात आहे, आणि बरिच व्यस्त आहे.
निरोप पोहोचवीन मी.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators