Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
दाल बाटी

Hitguj » Cuisine and Recipies » आमटी, कढी, पिठले » दाल बाटी « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through May 29, 200720 05-29-07  2:00 pm

Karadkar
Tuesday, May 29, 2007 - 4:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बट्या आणि बाटी एकच की वेगवेगळी? मी भुसावळ मधे खाल्ली वरण आणि अमसुलाच्या कढीबरोबर. तो हाच पदार्थ का?

Shyamli
Tuesday, May 29, 2007 - 5:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

daal baatee

ही घ्या डाळ बाटी :-)

वाटीत डाळ,(म्हणजे आमटी):D बाजुला दिसतायत त्या बाट्या or बट्ट्या
दुस-या वाटीत रबडी आहे वाटत :P

सुनीती तू म्हणतीयेस ते चकोल्या किंवा वरणफळ ग! :-)

Prajaktad
Tuesday, May 29, 2007 - 6:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कराडकर ! हो बाटी आणी बट्ट्या एकच...करायच्या पद्धती बर्‍याच आहेत..
सुनितीने लिहलेल्या तुपाच्या बट्ट्या हया जास्त करुन नाष्त्याला केले जातात...पार्टी किंवा मोठ्या प्रमाणात करायला दिनेशदाने लिहलेय तस किंवा दालवाफ़ले पद्धतिने कराव्या.
श्यामलीनेपण छान माहिती लिहलय..बट्ट्या खुस्खुशित होणे मह्त्वाचे..कडक झालिच तर सरळ मिक्सर मधुन काढावे..तुप आणी साखर किंवा गुळ घालुन लाडु वळावे.


Karadkar
Tuesday, May 29, 2007 - 7:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद शामलि!! हेच खाल्ले होते मी. इथे BBQ मधे करुन पहायला हरकत नाही.

Dineshvs
Wednesday, May 30, 2007 - 5:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्यामली फोटो कुठला आहे ? वाटीत तुप आहे असे वाटतेय. बाट्यांबरोबर तुप देतातच. मला साधे वरण आणि हिरव्या मिरचीची चटणी, या बरोबर बाट्या आवडतात.
मी उदयपुरजवळच्या एका ढाब्यावर बाट्या कुस्करुन त्यात साखर घालुन केलेला एक प्रकार खाल्ला होता. त्याला तो ढाबावाला चुरमा म्हणाला होता. खुपच छान लागतो तो प्रकार.
पण एक वाटीभर खाल्ला तर पापण्या जड होतात.


Shyamli
Friday, January 18, 2008 - 8:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भाजायची सोय नसेल तर
एका मोठ्या पातेल्यात पाणि उकळत ठेवायच आणि रोवळीला तूप लावून त्यात या बट्ट्या ठेवायच्या वर झाकण ठेवून वाफवून घ्यायच्या. नंतर अर्ध्या करून तेलात तळून घ्यायच्या. या बट्ट्याही छान लागतात.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators