|
Vidyat
| |
| Saturday, November 12, 2005 - 11:10 am: |
| 
|
mi tandulachi pithi vaprun kheer karate. Dudh microwave madhe atwun tyat 2-3 spoon tandulachi pithi changli mix karun boil karate.Kheer chan dat hote.
|
Moodi
| |
| Tuesday, November 29, 2005 - 9:51 am: |
| 
|
उडीदाच्या डाळीची खीर. २ मोठे टेबलस्पुन उडदाची डाळ, ( आवडत असल्यास अर्धी वाटी वगैरे असे अन व्यक्तींच्या प्रमाणात घ्यावे), 5-6 चमचे साखर, 3-4 बदाम, २ खारका, दुध. उडदाची डाळ, बदाम अन खारका धुवुन घ्याव्यात. खारकांचे बी काढुन २ तुकडे करावेत. ( कीड वगैरे नाही ना हे पाहून घ्यावे) हे सर्व थोड्या पाण्यात आदल्या रात्री भिजत घालावे. दुसर्या दिवशी सकाळी बदाम सोलुन त्याची साल काढावी नाही काढली तरी चालते). हे सर्व पाण्यातुन निथळून थोड्या दुधात मिक्सरमध्ये अगदी बारीक असे वाटुन घ्यावे. मग परत हव्या त्या प्रमाणात दुध घालुन ती पेस्ट एकजीव करुन ते मिश्रण मग gas वर शिजायला ठेवावे. थोडे शिजत आले की साखर घालुन ढवळावे. आवडत असल्यास केशरही घालावे. अन मग शिजल्यावर खाली उतरवुन बाउलमध्ये काढुन खावी. आवडीनुसार पातळ वा घट्ट ठेवावी. म्हणजे पातळ हवी असल्यास दुधाचे प्रमाण वाढवावे. सध्या थंडी सुरु झाल्याने ही खीर अतिशय चांगली, बलकारक अन पौष्टीक आहे. मी मागच्या वर्षीपासुन करीत आहे. बदाम अन उडीद उष्ण असल्याने थंडीत चांगलीच. मी त्यात सुके अंजीराचे तुकडेही त्या उडीदाबरोबर भिजत घालुन खिरीत घालत होते पण काही वेळेस अंजीर आंबट असल्याने खीर नासते. म्हणून अंजीर बंद केले. सकाळचा हा पोटभर अन पौष्टीक नाश्ता आहे.
|
Mepunekar
| |
| Wednesday, August 09, 2006 - 2:52 am: |
| 
|
Arati, me tu dilyapramane gavhachi khir keli, mast zaliye..javalpas duppat gul lagla..thanks
|
Vnidhi
| |
| Saturday, August 26, 2006 - 3:43 pm: |
| 
|
गव्हाच्या खीरीची नीट recipie द्याल का pls .. प्रमाण पण द्या..
|
Dineshvs
| |
| Sunday, August 27, 2006 - 6:26 am: |
| 
|
अख्खे गहु शिजायला खुप वेळ जातो. तरिही साधारण दोन वाट्या गहु घेतले तर ते चार पाच तास भिजत घालायचे. मग पाणी काढुन घ्याचे. हे पाणी दुसर्या कश्यातहि वापरायला हरकत नाही. मग कुकरमधे डायरेक्ट ते गहु आणी चारपाच वाट्या पाणी घालुन मध्यम आचेवर साधारण चाळीस मिनिटे राहु द्यावे. शिट्या मोजायचे कारण नाही. पण शिट्या दमदार होत नसल्या तर,किंवा शिटीतुन फेस येत असला तर, गॅस बंद करुन आणखी थोडे पाणी घालावे लागेल. कुकर आपोआप थंड होवु द्यावा. आता गहु शिजुन फुटलेले असायला हवेत. मग त्यात दोन वाट्या दुध व एक वाटी साखर घालुन उकळावे. गुळ घालायचा असेल तर नारळाचे दुध वा खोबरे घालावे. वरुन साजुक तुप घालावे. यापेक्षा लापशी, वा दलिया ची खीर करणे सोपे आहे. तो तुपात परतुन मग शिजवावा. प्रमाण हेच, फ़क्त शिजायला वीस मिनिटे पुरेत. या खिरीत केळे कापुन घातले तर छान लागते. गोडाचे प्रमाण माझ्या आवडीप्रमाणे लिहिलेय, कमीजास्त करता येईल. तामिळ लोक नुसता गुळ घालुन घट्ट खीर करतात. मला ती अजिबात खाववत नाही.
|
Vnidhi
| |
| Sunday, August 27, 2006 - 4:02 pm: |
| 
|
धन्यवाद,दिनेश...गणपतीचे ५ दिवस मला ५ नैवेद्य करायचे आहेत.. आपण २ गोड पदार्थांची छान recipie दिलीत...
|
Moodi
| |
| Thursday, September 14, 2006 - 11:09 am: |
| 
|
ही या पद्धतीची पण खीर मला आवडते. तांदळाचे आणि साखरेचे प्रमाण कमी केले तरी चालते. साहित्य : १ वाटी खपली गहू ( किंवा मग दलिया घ्या, बाहेर हे गहू मिळणार नाहीच), पाव वाटी सुगंधी तांदूळ, १ वाटी गूळ, पाव वाटी साखर, जायफळ वेलची पूड, १ किंवा अर्ध्या नारळाचा चव(ओले खोबरे), खसखस अर्धा टीस्पुन. कृती : गहू आदल्या रात्री पाण्याचा हात लावुन ते एकदा मिक्सरमधून फिरवा. पाखडुन कोंडा काढावा व ते पाण्यात भिजवावेत. सकाळी उपसुन गहु( वा दलिया) व तांदूळ कुकरला ३ शिट्ट्या करुन शिजवावे. नंतर गार झाले की काढुन पळीने वा डावाने घोटुन एकजीव करावे. त्यात किसलेला वा चिरलेला गूळ, साखर व नारळाचा चव( हा मिक्सरवर एकदा वाटुन घ्यावा) व थोडे गरम पाणी घालुन शिजायला ठेवावे. खसखस भाजून कुटुन घालावी. जायफळ व वेलची पूड घालुन मग आवडत असल्यास ओल्या खोबर्याचे पातळ काप घालावेत आणि शेवटी दूध घालुन परत उकळावी. की झाली चविष्ट खीर तयार. 
|
Sayuri
| |
| Wednesday, October 18, 2006 - 7:03 pm: |
| 
|
मला पायसम ची कृति हवी आहे. मी शोधून पाहिलं इथे पण कुठे दिसली नाही. असल्यास कोणी लिंक सांगेल का?
|
Prr
| |
| Thursday, January 31, 2008 - 6:40 pm: |
| 
|
i tried this recipe http://www.pachakam.com/recipe.asp?id=2632 चव खुपच छान होते. करुन बघ easy recipe आहे. /hitguj/messages/103383/104275.html?1160000675 इथे आहे तांदळाची खीर Manuswiniने लिहीलेली. तशीच करायची ... मला तरी फरक नाही जाणवला recipeमध्ये. केरळमध्ये ओणम सणाला ही खीर केली जाते. तिथे खिरीला 'पायसम' म्हणतात. मी कित्येक वर्षांपासुन ही खीर/पायसम खाते ओणमला.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|