Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
पुरण पोळ्या

Hitguj » Cuisine and Recipies » ब्रेड, पोळी, पराठे » पोळ्या » पुरण पोळ्या « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through August 31, 200529 08-31-05  12:55 pm
Archive through March 14, 200625 03-14-06  2:08 pm
Archive through August 21, 200620 08-22-06  3:03 am
Archive through March 03, 200720 03-03-07  9:54 am

Psg
Saturday, March 03, 2007 - 10:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शर्मिला कदाचित तुझा विश्वास बसणार नाही.. पण आज सकाळीच पुरण करताना मला तुझी आठवण झाली होती.. त्या 'तव्यावर' आपण केलेली चर्चा आठवतिये? :-) येत नाहीस इथे जास्त सध्या? होळीच्या शुभेच्छा तुला :-)

Sharmila_72
Saturday, March 03, 2007 - 2:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

I swear पूनम, मलाही आठवण आली तुझी. आणि तुझ्या सासूबाईंची टीप पण आठवली की पुरण गरम असतानाच वाटावे म्हणजे छान वाटले जाते. हो मला चांगलीच आठवते आपली चर्चा. by the way मध्यंतरी एक छोटासा जॉब मिळाला होता म्हणून फारशी येत नव्हते इथे. आता परत रिकामी आहे. तुलाही होळीच्या खूप खूप शुभेच्छा!

Dineshvs
Saturday, March 03, 2007 - 4:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छान आहे टिप, पुरण, भिजवलेल्या पिठापेक्षा थोडे घट्टच असावे लागते.
दुर्गा भागवत म्हणत असत, कि पाट्यावर पुरण वाटताना, एकदा पुढे गेलेले पुरण परत मागे येता कामा नये.
आता नवल वाटते, कि ते चिकट पुरण आई हाताने कसे वाटत होते त्याची.
आई तर पाट्यावर गहु वाटुन त्याचे सत्व करत असे, ईतकेच नव्हे तर इडली दोश्याचे पिठहि ती पाट्यावर वाटत असे.
त्याकाळी पुरणयंत्र म्हणजे फ़ॅशन वाटायची, आता तर तेहि मोडीत निघाले.


Manuswini
Saturday, March 03, 2007 - 7:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सगळ्यांना शुभेच्छा होळीच्या!!

मी सुद्धा आज आताच पुरणपोळ्या केल्या आवडीने.

उद्या फोटो टाकते सहज म्हणुन.

मस्त पातळ,तलम भरपुर पुरणाने भरुन,पुरणात केशर टाकुन. कटाची आमटी तयार होतेय, कोबीची भाजी, मटकीची उसळ,वरण नी भात,चपाती. विश्वास बसत नाही माझे ११:३० जेवण तयार तेही weekend ला १०:०० breakfast करणारी मी. सगळे credit मैत्रिणीला, सकाळीच येणार होती ना.

नैव्यद्याला फक्त पुरणपोळी,शुद्ध तूप नी दूध.



Deepad
Wednesday, April 25, 2007 - 7:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सोपा उपाय म्हणून पूरण मिक्सर मधून काढले गड्बडीत. पातळ झाले. परत घट्टं करण्यासाठी काही इन्स्टन्ट उपाय?

Prady
Wednesday, April 25, 2007 - 1:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

थोडा वेळ microwave करून बघ. घट्ट व्हायला मदत होईल.

Ksha
Monday, May 14, 2007 - 6:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कालच पुरणपोळ्या केल्या होत्या. प्रियाला शंभर टक्के मार्क आणि वर २ गावं बक्षीस ! दिसत नाही आजकाल पण.. अंताक्षरीवर पण नाही दिसली.

आमरस, पुरणपोळी आणि कटाची आमटी.. अहाहा.. स्वर्ग स्वर्ग म्हणतात तो हाच :-)


Manuswini
Thursday, March 27, 2008 - 3:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ह्या होळीच्या पुरणपोळ्या
कॅमेरा हाताशी होता म्हणून फोटो घेतले,भरपूर पुरन भरले होते. :-)

pupo

Manuswini
Thursday, March 27, 2008 - 3:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message



Maitri
Monday, April 07, 2008 - 6:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

puran polya karatana mi harabara dal cooker chya bhandyat shiwajali pan kat urala nahi, asa ka hot, maz kuthe chukatay? Nehamicha mi cooker chya bhandyat dal shivajate ani pani jast ghatala tar ti jast shijate mhanaje agadi puran yantra madhun kadhawicha lagat nahi.ani shivay puran pan khup sail hota, mag parat te kapadat gundalun pani kadhun takav lagat :-(. Kat shillak ranyasathi kai karav? Kunitari madat kara.

Shyamli
Monday, April 07, 2008 - 7:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कट नाही राहिला तर काय फरक पडतो?
शिजलेल्या डाळीतली थोडी डाळ घ्यायची आणि भरपुर पाणी घालून आमटी करायची :-)

Itsme
Tuesday, April 08, 2008 - 5:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जाड बुडाच्या पातेल्यात डाळ शिजवली तर शिजते पण छान आणि कट पण रहातो. शिवाय चकाकी येते ती वेगळीच. नेवेद्याची वाट न बघता वाटीत घेउन डाळींब्या खाण्याचा मोह होतो :-)

Amruta
Tuesday, April 08, 2008 - 3:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

डाळ शिजवताना जास्त पाणि नाहीच घालायच. परवा होळिला पुरणपोळ्या करताना मला पण काहिच कट मिळाला नव्हता पण श्यामली म्हणते तसच मी सरळ थोडी डाळ घेउन तिच्यात पाणि मिक्स करुन कट तयार केला. मस्त झाली आमटी.
उलट आता पुढच्यावेळी थोडीशी डाळ उकडुन घेउन आमटी करायची अस ठरवलय.


Iop123
Saturday, July 19, 2008 - 12:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी काल सन्ध्याकाळी ७ वाजता पुरण केले आणी थन्ड होण्याकरता बाहेर राहू दिले. नन्तर फ़्रिज मधे थेवायला विसरले. सकाळी उथ्ल्यावर लक्शात आले आणी मग फ़्रिज मधे थेवले. पुरण खराब तर झाले नसेल ना?

Manuswini
Monday, September 15, 2008 - 6:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

you tube वर असेच काही शोधता शोधता ही क्लीप मिळाली पुरणपोळी कशी करायची. बरीच मजेशीर वाटली. म्हणजे काय ते प्रकार, मुस्लिन क्लॉथ काय बांधा पोळपाटावर, तो गोल गोल फिरवून लाटणे काय नी काय,टाकताना पेपर काय लावणे, एखाद्या नवीन बाईला शिकताना वाटेल की अरे बापरे बरीच कठीण आहे ही गोष्ट असले अघोरी प्रकार बघून नी मराठी इंग्लीश एकदम मस्त... :-)

तिच्या एक पोळीत चार लाटून झाल्या असत्या माझ्या.

पहा ही क्लीप,बरीच अतरंगी पद्ध्तीने करु शकता पुपो
http://www.youtube.com/watch?v=vmBDmWtziNk&;feature=related

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators