|
Bee
| |
| Wednesday, January 16, 2008 - 5:32 am: |
|
|
अर्च, मग त्या पोळीला Brown Sugar ची पोळी म्हणावी लागेल :-) नाव झक्कास आहे
|
गुळाच्या पोळीत मी सारणात गुळ..पंढरपुरी डाळं[त्याचं मिक्सरवर केलेलं पीठ] खसखस तीळ आणि सुकं खोबर घालते त्यात थोडसं तेलही घालते. मग चुन्याची गरजच नाही पडत आणि पारीसाठी कणिक थोडंसं चणापीठ [बेसन] आणि तांदुळाच पीठ वापरते...पोळी एकदम छान होते. कोणाला हवी असेल तर सप्रामाण कृती देईन.
|
Manuswini
| |
| Wednesday, January 16, 2008 - 6:14 pm: |
|
|
मी केली होती गेल्या वर्षी पण मनिषा लिहूनच टाक बघू तू कृती.
|
Arch
| |
| Wednesday, January 16, 2008 - 6:55 pm: |
|
|
मनु, अग चव नाही गुळाची येणार. पण माझ्याकडे गूळ नव्हता. म्हणून brown sugar वापरून कराव्यात असा विचार होता. शेवटी तिळाच्या वड्या केल्या जयावीच्या recipe ने फ़टाफ़ट काम झाल आणि एकदम first class झाल्या.
|
Manuswini
| |
| Wednesday, January 16, 2008 - 11:14 pm: |
|
|
आर्च, तु पण एकदम सुगरणच बाकी. जयवीची रेसीपी, बघायला हवी. मला गुळाच्या पोळ्या आवडतात पण हल्ली गोड कमी केलय. कायच्याकाय कॅलरीस वाढतात. जयवीची ती लिंक देते का pls ,मला मिळाली नाही कुठे.
|
मी लिहिते थोड्या वेळानी कृती पोळ्यांची... तोपर्यंत ही घे जयुच्या तिळगुळाची लिंक /hitguj/messages/103383/136421.html?1138080934 आणि ही तीची कृती .: Jayavi Saturday, January 21, 2006 - 11:20 pm: प्राजक्ता, अगं साखरेची चिक्की अगदी सोपी आहे. साधारण जितके भाजलेले तीळ असतील ना त्यापेक्षा थोडी जास्त साखर घे. जाड बुडाच्या कढईत चिमूटभर मीठ थोडंसं भाजून घे अणि मग त्यात साखर घाल. सारखी ढवळत रहा. वितळून थोडासा golden रंग आला की त्यात तीळ घालायचे. थोडंसं परतायचं. हे करत असताना ओट्यावर भरपूर तूप लावायचं किंवा मी ४-५ ताटांना उलटं करुन तूप लावून घेते. प्रत्येक ताटाच्या मागे थोडं थोडं हे तीळ आणि साखरेचं मिश्रण घालायचं. लाटण्याला भरपुर तूप लावून त्याची अगदी पातळ पोळी लाट. थंड होऊ दे. आणि मग आपलं उलथणं म्हणतो ना किंवा आम्ही नागपुरी लोक त्याला सराटा म्हणतो, तो ह्या पोळीखाली घालून सबंध पोळी काढून घ्यायची आणि त्याचे हातानेच तुकडे करायचे. इतकी मस्त कुरकुरीत चिक्की होते ना की बस. पाणी अजिबात घालायचे नाही हं. असंच तीळ न घालता फ़क्त साखरेला brown होईपर्यंत पातळ करुन हे मिश्रण सुद्धा ताटाच्या मागे तूप लावून पसरवायचं. थंड झाल्यावर ते जाड कुटून घ्यायचं Icecream किंवा पुडिंगवर मस्त topping घालून खायचं. crunchy आणि मस्त लागतं आणि दिसतंही सुरेख
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|