Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through June 06, 2008

Hitguj » Cuisine and Recipies » Looking For Recipes » Archive through June 06, 2008 « Previous Next »

Dineshvs
Thursday, May 22, 2008 - 7:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लाजो, खरे तर हे उष्ण आणि थंड प्रकरण मला नीटसे समजलेले नाही. पण राजगिरा प्रकृतिला चांगला एवढे नक्की. त्यामुळे, एवढ्या प्रमाणात खाल्यास, काहि त्रास व्हायची शक्यता कमी आहे.


Lajo
Friday, May 23, 2008 - 3:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद दिनेशदा. तसा तिला काही त्रास झालेला नाही त्यामुळे मी याच प्रमाणात continue करेन. शिंगाडा आणि साबूदाणा पीठ पण चालेल का? पीठ आधी भाजुन घ्यायला पाहिजेत का?

Dineshvs
Friday, May 23, 2008 - 8:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शिंगाडा एकवेळ ठिक आहे, पण साबुदाणा नको. त्यात स्टार्चशिवाय काहिच नसते.
उकडलेला वा भाजलेला बटाटा, रताळे, केळे चालेल. लाह्याचे पिठ, सत्तूचे पिठ, खजूर वगैरे चालेल.


Cinderella
Friday, May 23, 2008 - 3:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

The word "lasagna" is derived from the Greek word "lasanon" meaning chamber pot. The word was later borrowed by the Romans as "lasanum" to mean cooking pot. The Italians then used the word to refer to the dish in which what is now known as lasagna is made -
http://en.wikipedia.org/wiki/Lasagna
.
लसुण हा काय इटालिअन शब्द आहे का ?

Madhura_d
Friday, May 23, 2008 - 4:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

mrinmayee and manuswini, thanks for your inputs, but I still have a same q,
tikhatamithachya purya aani methiche theple 3 diwas tikawayache aahet, te fakta aluminum foil madhe gheu, ki freeze karun barfat thevu? ( barfa far tar did-don diwas tikel ) , tyanantar room temp. la purya, theple tiktil ka?, car charger - cooler cha upyog naiyye karan 3 days car chalu nai thevu shaknar aani electricity outlets naiyyet

Manuswini
Friday, May 23, 2008 - 5:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ओके मधुरा,

पुर्‍या ह्या तळलेल्या असतात त्यामुळे त्यात पाण्याचा प्रश्ण येत नाही. आधी तळून थंड करायला नी extra तेल काढायला paper towel वर काढून ठेव मग त्या aluminium foil मध्ये गुंडाळून ziploc च्या बॅगेत भर.

थेपले हे दही नी थोडे पाणी नी बर्‍यापैकी तेल टाकून मस्त भाजले की छान रहातात बाहेर सुद्धा.
ते आधी गरम असताना paper towel वर काढ कारण ती वाफ़ निघून जाईल. मग तो आधीचा पेपर काढून नवीन पेपर मध्ये गुंडाळ नी मग फ़ॉईल मध्ये गुंडाळ. अर्थात हात कोरडे असावे तेव्हा. :-)
ओल्या मेथी एवजी सुखी कोरडी कसूरी टाक जर खात्री नसेल तर. तसे ताज्या मेथीचे पण अश्या पद्ध्तीने टीकलेत माझे.


Madhura_d
Friday, May 23, 2008 - 5:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

so you are saying, keep it outside and freeze vaigare karayachya bhangadit padu nako, right? cool ,thanks, bahutek me fakta theple ghein, purya nai karat, telkat nai aawadat, tikayachya drushtine mhanat hote fakta

Manuswini
Friday, May 23, 2008 - 5:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

millet flor म्हणजे नक्के कुठले मराठीत?
finger millet म्हणजे नाचणी ते कळले.

आणि spelt म्हणजे मराठीत काय?
ऑफ़ीसमध्ये एकीने गव्हाची allergy आहे म्हणून त्याचे केक ( mini cakes/muffins )आणले होते healthy option म्हणून. यम्मी लागले.
फक्त aaple sauce टाकून नी पिठे ferment केले नी अगदी आपल्या आप्प्यासारखे बनवले होते. जाळी पण मस्त पडली होती. उद्या मला करायचे आहेत. whole foods मध्ये जान्याआधी विचारते नक्के कसले पिठ आहे ते मराठीत? कोणी सांगेल का?


Vrushs
Friday, May 23, 2008 - 9:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Millet flour म्हणजे बाजरीचे पीठ एवढे मला माहिती आहे. बाकीची माहिती जाणकार पुरवतील.

Dineshvs
Saturday, May 24, 2008 - 2:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Spelt ला मराठीत प्रतिशब्द नाही. हि एक गव्हाची जात आहे. आपण सध्या जो गहू खातो, तो मानवी प्रयत्नातून बनलेला आहे. अगदी मूळ जात जी होती, त्यातले दाणे हलके असत आणि ते वार्‍यानी सहज उडुन त्याचा प्रसार होत असे, पण आपला आताचा गहू असा उडु शकत नाही,
या दोन प्रकाराच्या मधला प्रकार म्हणजे हा Spelt
सध्या तरी तो फ़क्त युरपमधेच होतो.

तसेच मिलेट, म्हणजे बाजरी तर आहेच, पण बाजरीसारख्या अनेक दाण्याना हे कॉमन नाव आहे. बाजरी करड्या रंगाची असते पण बाकिचे दाणे पांढरे किंवा पिवळे असू शकतात.


Manuswini
Saturday, May 24, 2008 - 6:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

थॅन्क्स दिनेश....
... चार शब्द


Swatu
Monday, May 26, 2008 - 6:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Hi,

Kunala, Hapus aambya cha (mhanaje fodi) mooramba kasa kartat te mahit aahe ka?

thank you.

Dhanu66
Monday, May 26, 2008 - 9:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

टोफ़ू म्हणजे सोया पनीर च्या काही पाकक्रुती कळतील काय?

Dineshvs
Tuesday, May 27, 2008 - 2:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आपण जसे पनीर वापरू तसेच हे वापरायचे. पनीर काय किंवा टोफ़ू काय, शक्यतो डीप फ़्राय करु नये.
सूपमधे वगैरे, टोफ़ू, नुसतेच घालून खाता येते.


Savani
Tuesday, May 27, 2008 - 3:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उपासाचे बटाट्याचे पापड कसे करायचे?

Dineshvs
Tuesday, May 27, 2008 - 6:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इथे वाळवण साठवण असा एक विभाग होता, तिथे सापडतील.

Savani
Tuesday, May 27, 2008 - 2:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेशदा, तो विभाग चेक केला मी. पण त्यात पोह्याच्या पापडावरच बरीच चर्चा आहे. बटाट्याचे पापड नाही सापडले.


Prajaktad
Tuesday, May 27, 2008 - 8:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सावनी इथे लिहलेत बटाट्याचे पापड
/hitguj/messages/103383/138930.html?1211918955

Sai
Thursday, June 05, 2008 - 9:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला फ़णसाच्या आठल्याँ (बीया) भाजी कशी करतात ते हवे होते....


Dineshvs
Friday, June 06, 2008 - 5:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आठळ्या कच्च्याच ठेचुन त्यांची साले काढुन टाकायची. हि साले बिया उकडूनही काढता येतात, पण ते जरा कठिण जाते.
मग या बिया आणि थोडे कच्चेच भरडलेले शेंगदाणे कूकरमधे उकडून घ्यावे.
मग तूपाची जिर्‍याची फ़ोडणी करुन त्यावर हिरव्या मिरच्या घालाव्यात. वरती या बिया आणि शेंगदाणे घालावेत. झाकण ठेवुन वाफ़ आणावी. चवीनुसार मीठ, साखर व ओले खोबरे घालावे.
यात भरीला म्हणुन शिंगाडे किंवा बटाटे घालता येतात. हि भाजी उपवासाला चालते.
या बिया नेहमीच्या डाळीच्या आमटीत, वा मायाळुच्या आमटीत घालता येतात. काही कडधान्याच्या उसळीत म्हणजे काळे वाटाणे, मसुरा यांच्या उसळीत घालता येतात. तोंडल्याच्या भाजीत पण घालतात.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators