Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through May 06, 2008

Hitguj » Cuisine and Recipies » झटपट पाककृती » डब्यात नेता येइल असे झटपट आणि पौष्टिक » Archive through May 06, 2008 « Previous Next »

Chioo
Monday, April 28, 2008 - 7:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनु, धन्यवाद. :-) हे करून ठेवायला सोपे आहे. :-) इथे खूप मस्त मस्त कल्पना आहेत. सही.

Cinderella
Monday, April 28, 2008 - 5:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रव्याप्रमाणे शेवया पण भाजुन ठेवायच्या...पटकन उपमा किंवा खीर करता येते....आणि कच्चा कोबी, कांदा, कोथींबीर बारिक चिरुन ठेवल्यास धीरडे, पिझा किंवा दोस्यावर टॉप्पिंग होते...


बाकी मस्तच टिप्स दिल्यात सगळ्यांनी....



Princess
Tuesday, April 29, 2008 - 1:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी, गाकरचे प्रमाण श्रला विचारुन सांगते.
शोनु, इडली डोस्याचे पीठ इथे मुबलक मिळते. पण तेच तेच खाऊन प्रचंड कंटाळा यायला लागलाय आजकाल :-)
मने, मस्तच ग... खुप धन्यवाद. तुझ्यासारखी पुर्वतयारी करुन ठेवली तर मल वाटते तीनतीन डब्बे बनवणे खुपसे कठिण जाणार नाही.
सिंड्रेला, धन्यवाद.


Bee
Tuesday, April 29, 2008 - 3:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पूनम, धन्यवाद.. अनायासे मी आज गाकरच आणलेत पण फ़क्त साध्या कनकेचे. रवा घालणार होतो पण तो साधाच की भाजलेला हे माहिती नव्हते. गाकर भाजताना त्याला दोन्हीकडून तुप लावायला हवे का? कारण नाही लावले तर व्हायला खूप वेळ घेतात आणि जरा जास्तच टणक होतात.

Ami79
Tuesday, April 29, 2008 - 10:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मलाही या टीप्स खूप आवडल्या. मी दोन्-तीन दिवसाच्या पोळ्या बनवून त्या घट्ट झाकणाच्या डब्यात भरून (ताज्या असतानाच) फ्रीझ मधे ठेवते. हवे तेव्हा काढून त्या थोडे तूप लावून तव्यावर गरम करते. त्या अगदी ताज्या पोळ्यांसारख्या होतात. पण पोळ्या केल्याबरोबर थोड्या थंद झाल्या की लगेच आत ठेवून द्याव्यात. अर्थात हे मी निव्वळ सोय म्हणून करते. ताज्या पोळ्या खायला अर्थात कोणाला आवडणार नाही?

Manuswini
Tuesday, April 29, 2008 - 5:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी, मला तुला एक साधासा प्रश्ण विचारावासा वाटतो,( तिरसट उत्तर देणार नसशील अशी खात्री बाळगून)
तु एवढा जेवण करतोस तरी तुला बेसीक प्रश्ण कसे पडतात रे?
म्हणजे एखाद्या पदार्थात साधारण काय नी कसे घातले असतील ह्याचा अंदाज तरी एवढे जेवण करण्यार्‍या माणसाला येतो असे मला वाटते. पदार्थ तोंडात घातल्यावर साधारण कल्पना येते की काय नी कीती प्रमाण असेल.
फोडणीला हिंग घालायचे असे मी माझ्या एका(जेवणाबाबतीत अती मठ्ठ ) मैत्रीणीला सांगीतले,ती बाई पहिल्यांदाच (मराठी पद्धतीची)आमटी करत होती. आता ते कीती हिंग कशाला सांगायला हवे. तर ते सांगीतले न्हवते म्हणून तीने ते बाकी मसाल्याच्या प्रमाणात घालून मला कौतुकाने जेवायला बोलवले की तु सांगीतले ना तशीच आमटी केली. (मी कपाळावर हात मारला, वयाच्या २५ व्या वर्षी इतका मट्ठपणा की हिंग हा प्रकार काय असु शकतो ही माहीत नाही? ही काय कधी कीचन मध्ये गेलीच नाही की काय एखाद्या राजकन्येसारखी.)
बाकी चालु दे,
आवडले नसेल तर दिवे आहेतच.

तो रवा माझ्या मते गाकर मते कच्चा घालायचा असतो.

mods,sorry विषय बदलला.


Shonoo
Tuesday, April 29, 2008 - 5:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ही काय कधी कीचन मध्ये गेलीच नाही की काय एखाद्या राजकन्येसारखी.)

मने मी स्वत: २७ वर्षांची होई पर्यंत उकडलेली अंडी, मॅग्गी नूडल्स अन चहा एवढेच प्रकार केले होते. त्यानंतर सुद्धा सहा वर्षं अगदी सुगरण रुममेट होती त्यामुळे फारतर चिरणे, किसणे अन भांडी आवरणे येवढाच माझा किचनमधे हातभार होता:-)

अन बर्‍याच लोकांकडे रोजच्या जेवणात हिंग वापरत नाहीत. तेंव्हा तिला कसा अंदाज यावा? सगळ्याच मुली सुद्धा स्वैपाकघरात आईच्या हाताखाली अप्रेंटिसशिप करत नाही, मुलांचं तर दूरच. बीने सुद्धा कधी घरी या बाबतीत लक्ष नसेल घातलं! त्यामुळे आता विचारतो इथे! माझीही तीच परिस्थिती आहे- सुदैवाने मला फोनवर tech Support मिळू शकतो बरेचदा. त्यामुळे इथे प्रश्न कमी विचारले जातात.


Swaatee_ambole
Tuesday, April 29, 2008 - 5:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>> तु एवढा जेवण करतोस तरी तुला बेसीक प्रश्ण कसे पडतात रे?
मनू, इतकी वर्षं मायबोलीवर असून तुला इतके बेसिक प्रश्न कसे गं पडतात?

Jokes apart, पण पूर्वानुभव असो नसो, स्थळकाळानुसार पदार्थ, त्यांची नावं, त्यांत वापरले जाणारे घटकपदार्थ (ingradients) , त्यांचं प्रमाण, पाककृती यांत खूप फरक पडतो. तेव्हा विचारण्यात काहीच गैर नाही. 'There is no such thing as dumb question' हे ऐकलं असशीलच.

शिवाय हे इतके मूलभूत प्रश्न पडणारे बरेच जण असतात. सगळ्यांनाच जाहीरपणे ते विचारायचं धैर्य होतंच असं नाही. एकाने विचारलं की दहा जणांचा प्रश्न सुटतो.


Prajaktad
Tuesday, April 29, 2008 - 6:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गाकर विषयी अधिक इथे लिहले आहे..
/hitguj/messages/103383/108880.html?1209493454

Manuswini
Tuesday, April 29, 2008 - 6:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वाती,जसा तुला कसा माझ्याविषयी बेसीक प्रश्ण पडला तसाच.
मी कुठे म्हटले विचारण्यात काही गैर आहे.

बरे मी प्रश्ण तर बीला विचारला जो जेवण बरेचदा करतो, म्हणून त्याला विचारले.

बीने तुझ्या मनातला प्रश्ण विचारला की काय? कारण भारीच तुला लागले का?
मी सुद्धा कधीच देशात केले नाही किंवा करायचा प्रश्णच आला नाही. नी US मध्ये पण आई वडीलांबरोबर रहाताना गरज पडली नाही. बराचसा काळ शिक्षणातच गेला.
पण साधारण पदार्थ हे माहीती असतातच ना. हिंग काय नी मिठ काय.

ती माझी मैत्रीण मद्रासी होती. तीने हिंग खाल्ले नसेल हे मला तरी वाटत नाही. म्हणून सांगायची गरज वाटली नाही.
डोळे नी कान बर्‍यापैकी उघडे असले नी common sense आणि मुख्य म्हणजे 'आवड' असेल तर cooking मधल्या बर्‍याच गोष्टी माहीती होतात. त्यात भलेही तुम्ही master नसाल.
आणि त्यात काही मोठी हुशारी लागते असेही नाहीये. तसेच जेवण करणे हे सुद्धा असेच मला वाटते. हे येते म्हणून जर कोणाला मोठेपणा वाटत असेल तर काही करु शकत नाही.:-)

पण थोडे फार जेवण करत असलेल्याला थोडासा अंदाज हा येतोच. नाहीतर how to boil water त्यातले असतात ना आजू बाजूला ह्यात नवल नाही. नाहीतर बोटभर आल्याचा तुकडा घ्या म्हटल्यावर, scale घेवून कीती इंच आले घ्यायचे असेच होणार


Bee
Wednesday, April 30, 2008 - 1:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनु, हो मला जेवन बनवता येतं आणि अमुक पदार्थात काय बरे असेल ह्यांचा सर्वसाधारण अंदाज पण बांधता येतो. तरीही काही गोष्टी अंदाजावर उतरतातच असे नाही. म्हणून एक खात्री करून घ्यावी म्हणून गाकर किंवा इतर कुठल्याही पदार्थाबद्दल शंका असेल तर मी विचारून घेतो. तुम्ही सर्व जण तत्परतेने मदत करता मग विचारायला अजिबात काही वाटतं नाही. (बघ तिरसट उत्तर नाही दिले. मी कधीच तसे उत्तर देत नाही असे मला वाटते :-))

प्राजक्ता, आभारी आहे.


Dineshvs
Wednesday, April 30, 2008 - 2:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी, मी गाकर करताना त्यात जास्त पिकलेले केळे घालतो. एक छोटे केळे, अर्धी वाटी कणीक, अर्धी वाटी न भाजलेला रवा, एक चमचा कच्च्या बडिशेपेची पूड, एक हिरवी मिरची, अर्धा चमचा मीठ, एक चमचा दहि, एक चमचा तेल आणि हवीच असेल तर थोडी साखर, या प्रमाणात करुन बघ.
ही माझ्या अंदाजाप्रमाणे उत्तरेकडच्या राज्यातली रित आहे. आधी भिजवायची गरज नाही, आयत्यावेळी भिजवून केले तरी चालते. तसेच मी हे पिठ जरा पातळ करुन एका भांड्यात अगदी मंद आचेवर ठेवून भाजतो. लक्ष द्यावे लागत नाही. चव छान येते.


Bee
Wednesday, April 30, 2008 - 4:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश मी तुमच्याच उत्तराची आतूरतेने वाट बघत होतो.. आप आये चैन आ गया.. अर्थात योग्य हवे असलेले उत्तर मिळाले. आभारी आहे.

मध्यंतरी मी 'थंड / उष्ण' असलेले घटक असा एक बा. फ़. उघडला होता पण दिनेशदा तुम्ही तिथे लिहायला हवे होते. बहुतेक तुमच्या नजरेस तो बा. फ़. आला नसेल.


Ami79
Wednesday, April 30, 2008 - 5:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इथे बेसिक प्रश्नाबाबत चर्चा सुरू आहे म्हणून सांगते. मी सुगरण वगैरे मुळीच नाही. अंगावर जबाबदारी पडली आहे म्हणून स्वयंपाक करते. कधी खुप छान, कधी ठीक तर कधी अगदीच टाकाऊ असे काही बनवते.त्यामुळे मलाही बरेचसे बेसिक प्रश्न पडायचे आणि आताही पडतात. तेही बर्‍याचदा प्रमाणाबाबत. आले आणि लसूण वाटायचे झाले तर त्यान्चे परस्पर प्रमाण किती असावे? कांदा खोबरे तळून वाटायचे झाले तर ते किती प्रमाणात घ्यावे? इत्यादी. पण त्यांचे नीरसन स्वानुभवातुन होत जाते.

Princess
Wednesday, April 30, 2008 - 5:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मन:स्विनी, बीने विचारलेले प्रश्न तुला खरच बेसिक वाटलेत का? कारण मी पण तेच प्रश्न आजच फोन करुन माझ्या आईला विचारलेत. रवा कच्चा की भाजुन, दही किती वगैरे...
अग, सगळ्यानाच पटकन सगळेच जमुन जाईल असे नसते. आपण आईला विचारतो तसेच बी इथे विचारतो.
बी तुझे कौतुक आहे बरे का... स्वयंपाक करणे बुद्धीचे नसले तरी कष्टाचे आणि बरेच वेळा बोरिंग काम आहे :-) पण तरीही तू करतोस खरच कौतुकास्पद आहे.

बरे ते असो, बी माझी आई भाजलेला रवाच घालते. त्याने काही खुप फरक पडत नाही असे तिचे म्हणणे. गाकर आमच्याकडे कधीच करत नाहीत. हा प्रकार श्रनेच मला पहिल्यांदा सांगितला. पण आई बट्टी करते त्यात भाजलेला रवाच घालते.
अमि७९, सेम टू सेम :-) मी पण पडत पडतच शिकलेय


Dineshvs
Wednesday, April 30, 2008 - 8:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी, खुप छान वाटले वाचून.
मी तो बा फ़ बघितला होता पण तो गरम आणि थंड प्रकार ना मला पटत नाही. आणि मला शाकाहारी काहिही वर्ज्य नाही. तसेच अमुक एखादी वस्तू खाऊन मला त्रास होतो असेही नाही. पण मी प्रमाणाबाहेर काहिच खात नाही.


Bage
Monday, May 05, 2008 - 4:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दीनेश तुमच्या recipe प्रमाणे गाकर केले मस्त झाले होते :-) thanks


Dineshvs
Monday, May 05, 2008 - 4:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे वा, अति पिकलेली केळी सत्कारणी लावायचा एक छान प्रकार आहे हा.
शिवाय आपण बडिशेप फ़ारशी वापरत नाही ना जेवणात, त्यामूळे हा स्वाद वेगळाच लागतो.


Bee
Tuesday, May 06, 2008 - 1:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी अर्धा डझन कच्छी केळी विकत आणलीत आणि आता वाट बघत आहेत कधी एकदाची खूप खूप पिकतील त्याची. मगच गाकर करणार..

Arch
Tuesday, May 06, 2008 - 2:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कच्छी नाही रे. कच्ची.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators