|
धन्यवाद दिनेशदा. मी सकाळीच म्हंटले नवर्याला, दिनेश देतिलच उत्तर माझ्या प्रश्नाला 
|
Aashu29
| |
| Wednesday, May 14, 2008 - 2:39 am: |
| 
|
thanks हं दिनेशदा, ट्राय करून बघते.
|
Bee
| |
| Thursday, May 15, 2008 - 8:04 am: |
| 
|
ब्राऊन राईसच्या इडल्या कशा होतात? माहिती असेल तर सांगा.. कारण करून पहायच्या आहेत.
|
Sonchafa
| |
| Thursday, May 15, 2008 - 4:58 pm: |
| 
|
प्राजक्ता धन्यवाद! मी लिंक वर जाऊन पाहिले पण मला नीट काही दिसत नाही. काही फ़ॉंट्स ची भानगड दिसते. युनिकोड वापरूनही दिसत नाही
|
Sonchafa
| |
| Thursday, May 15, 2008 - 5:01 pm: |
| 
|
प्राजक्ता धन्यवाद! मी लिंक वर जाऊन पाहिले पण मला नीट काही दिसत नाही. काही फ़ॉंट्स ची भानगड दिसते. युनिकोड वापरूनही दिसत नाही
|
अजुनही असेल तिथे तर टाईपते इथे...
|
दिनेश, तुम्हाला एक प्रश्ण विचारचा आहे, हे Amaranth नक्की काय आहे? कुठे बघितले तर ते grain like आहे असे सांगते तर कुठे ती भाजी पालकासारखी फक्त मध्ये लाल शीरा. तुम्हाला माहीती आहे का ह्याच्याविषयी? त्याचे फायदे नी रेसीपी सांगाल का please ? मराठीत नाव काय आहे? एखादे चित्र टाकले तर उत्तम.
|
मने, Amaranth म्हणाजे राजगीरा! ह्यात पण बरेच प्रकार असतात. आपण लाल आणि हिरव्या पानांची भाजी करतो, भरपूर कांदा आणि लसणीची फोडणी घालून! कधी तुर्यासगट बघीतल्याची आठवतेय का ही भाजी? (हिरवी पानं आणि लाल शीरा हा त्यातलाच आणखी एक प्रकार.) काही वेळा कडु पण असतात ही पानं.फोटो आहेत नेटवर. शोधून टाकते.
|
ही बघ, लाल शीरांची पानं, हिरवी (जी आपण सहसा खातो ती पानं) आणि एक तुरा...  
|
अच्छा हीच का ती? ही भाजी(लाल शीरा without तूरा) मी रोज बघते indian grocery त. राजगीरा म्हणजे तोच ना जो चिक्की साठी वापरतात? तो उष्ण असतो(इती आई). पण भाजी चांगली असे एकलेय ते कितपत खरेय? thanks मृणमयी.
|
Dineshvs
| |
| Wednesday, May 21, 2008 - 2:42 am: |
| 
|
इथे जी भाजी मिळते त्याची पाने खुप मोठी असतात. चवीला छान लागते. राजगिरा म्हणजे आपण ज्याच्या लाह्यांचे लाडु, चिक्की खातो तोच. हे पिठ उपवासाला चालते. आणि हि भाजी पण. तसा हा माठ प्रकारच. या प्रकारातल्या ५० च्या वर भाज्या खाल्ल्या जातात. कोवळ्या पानांच्या भाज्या जास्त चवदार लागतात. कच्चा राजगिरा असेल तर अवश्य पेरावा, सहज उगवतो आणि भराभर वाढतो. भाजी नुसत्या कांदा, मिरची लसणावर फ़ोडणी देऊन करता येते. या भाजीचे जाड देठहि सोलून भाजीत वापरता येतात.
|
Aashu29
| |
| Wednesday, May 21, 2008 - 4:00 am: |
| 
|
चिकन लझानिया कसा करतात, हे लसुण जास्त असल्याने असे नाव पडलेय का?
|
मागे एकदा ईथे camping साठी काय काय पदार्थ नेता येतील याची चर्चा झाली होती, पण आत्ता लिन्क सापडत नाहिये..... अजून एक प्रश्न होता... आम्ही ३ दिवस camping ला जाणार आहोत, आणी बरोबर बरेच vegeterians आहेत. मी तिखटामिठाच्या पुर्या, धपाटे. ठेपले वैगरे नेणार आहे. ते मी कसे नेऊ म्हणजे जास्त टीकेल? ice cooler मध्ये बर्फ़ केवळ एकच दिवस राहू शकेल... ( परत मिळण्याचे chances नाही आहेत) एक दिवस आधी करुन complete frezze करुन नेले, तर जेव्हा केव्हा ते normal temp. ला येतील ( next day ) ... तेव्हा त्यानन्तर ते टिकतिल का??
|
Boli
| |
| Wednesday, May 21, 2008 - 6:48 pm: |
| 
|
Suggestions For grilling Paneer, Capsicum, Tomatos, Onions + Skewers + some sauce to marinate You can cut these at the campsite and marinate overnite. Banana (+ any other fruits) Corn Backup Maggi (yes, better to have some easier backup in case you run out of regular stuff)
|
thanks boli for maggie idea ,ते सगळ तर नेणारच आहे मी फ़क्त अन्न गाडीत किन्वा bear proof containers मध्येच ठेवावे लागेल म्हणजे extra उबदार जाग़ी, म्हणून खराब व्हायची भीती वाटते.
|
http://www.walmart.com/catalog/product.do?product_id=7941681#Features+%26+Specifications मधुरा, इथे जाऊन बघा. असे बरेच प्रॉडक्टस् बाजारात मिळतील. ह्यातलाच एखादा प्रकार आम्ही विकत घेतोय. (वापरल्यावर सांगेन कसा निघाला ते.)
|
जो वरती मृणने दीलाय ना तो मस्त आहे. आमच्या मैत्रीणीने आणला होता बरोबर. boston to main पर्यन्त आम्ही प्रवास केला गाडीने तर दही,दूध(मद्रासी असल्याने ह्याच्याशिवाय मैत्रीणीला भात खाणे त्रासदायक) सगळे मस्त राहीले होते. त्याच्याशीवाय regular cooler असतात ना लाल रांगाचे ते पण बाकी सोडा वगैरे साठी.
|
मी ना चूकून मोठीच्या मोठी organic पपई कापली जी बाहेरून मला पिकली असे भासले. आता एवढी मोठी पपई कापली तर मध्ये पिकलेली पण बाजूला एकदम कडक. फेकायला जीवावर आलेय कारण मरमरून एवढ्या ला.ब drive करून organic घेतली. कोणी सुचवेल का ह्या पपईचे काय करु शकते? आता गुजराती असते तर किसून पपई चटणी केली असती पण अगदीच किलोच्या भावात होईल एवढा कीस होईल. नी मी फाफडा,गाठीया खात नाही. काय करावे?
|
Dineshvs
| |
| Thursday, May 22, 2008 - 2:41 am: |
| 
|
पपई, शिजवुन नारळ आणि साखर घालून वड्या करता येतील. थाई पद्धतीचे सलाड करता येईल. तुकडे करुन पाकात शिजवून टृटी फ़्रुटी करता येईल. पातळ कापा करुन,उकडून, तेलाच्या फ़ोडणीत हिरवी मिरची, जिरे, हिंग हळद घालुन परतायच्या, मग बेसन पेरून भाजी करायची. वरून लिंबू पिळायचा. हि भाजी शिजून कमी होते. चौकोनी फ़ोडी करून, बटाट्यासारखी भाजी करता येईल. बारिक चौकोनी फ़ोडी करून लोणचे करता येईल. कैरी प्रमाणेच करायचे, वरून भरपूर लिंबू पिळायचे. ( जामनगार्च्या एका लग्नात हे लोणचे खाल्ले होते, अगदी कैरीच्या लोणच्यासारखेच लागते. ) काहिच नाही जमले तर एक फोटो काढून डेस्कटॉप वर ठेवायचा, म्हणजे पुढच्या वेळी आठवण राहिल. |-)
|
Lajo
| |
| Thursday, May 22, 2008 - 4:27 am: |
| 
|
वरती मनुस्विनी ने लिहीलय की राजगिरा उष्ण असतो. मी माझ्या १ वर्षाच्या मुलीला कणिक अणि त्यात चमचाभर राजगिरा पीठ घालुन पोळ्या किन्वा थालिपीठ करते. कुणी सांगाल का की त्याचा काही त्रास तर होणार नाही ना? मी ऐकले होते की राजगिरा पीठ चांगले असते म्हणून... दिनेशदा please help
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|