|
Wel123
| |
| Thursday, January 31, 2008 - 6:55 pm: |
| 
|
Thanks chinnu aadhi karun thewate mhanje time wachel.
|
Wel123
| |
| Thursday, January 31, 2008 - 7:35 pm: |
| 
|
20 janansathi kiti palak lagel ani paneer kiti lagel(2 block paneer bas hoel ka je store madhe milte te),rajma kiti lagel.please help.
|
Supermom
| |
| Tuesday, February 05, 2008 - 8:57 pm: |
| 
|
मला सगळ्या यशस्वी पाक कलाकारांची मोठ्ठी मदत हवीय. मला मुंजीचा तीन दिवसांचा मेनू ठरवायचा आहे. १. पहिला दिवस. हळद आणि इतर कुळाचार. पंचवीस लोक. २.दुसरा दिवस मुंज. मुख्य मेनू- (पन्नास लोकांसाठी) ३. तिसरा दिवस सत्यनारायण. पंचवीस लोक. मला तिन्ही मेनू खास महाराष्ट्रीयनच हवेत कारण नंतर रिसेप्शनला पंजाबी प्रकार असणारच आहेत.(का तिथेही मराठी जेवण छान वाटेल?) सगळे contract च देणार आहे पण मेनू मनात ठरलेले असले की कॅटररला सांगायला बरे... प्लीज मदत करा मला...
|
Dineshvs
| |
| Wednesday, February 06, 2008 - 2:52 am: |
| 
|
सुमॉ, ते विशेषण मला लागू नाही, तरी खास मराठी पदार्थ सुचवतोय. मटकीची उसळ, पंचामृत, शेवयाची खीर, मसाले भात, भरली वांगी, मटार पॅटिस, बटाट्याच्या रस्सा, पांढर्या चवळीची भाजी, बटाटा भजी, खमंग काकडी, कोबीची कोशिंबीर, कोथिंबीर वड्या, कोबीच्या वड्या, गोळ्यांची आमटी, मेथीची गोळा भाजी, लाल भोपळ्याचे भरित, ओल्या नारळाच्या करंज्या, पुरणपोळी, दुधी हलवा, तांदळाची खीर, हिरव्या मिरच्यांची चटणी, आवळ्याचे लोणचे, भाजणीचे वडे, लाल भोपळ्याचे घारगे, नारळीभात, पालक डाळ, वाटली डाळ, बासुंदी. रोजच्या जेवणात, एक रस्सा भाजी, एक सुकी भाजी, एक गोड पदार्थ, एक कोशिंबीर व एक तळलेला प्रकार, अशी विभागणी करायची.
|
Prajaktad
| |
| Wednesday, February 06, 2008 - 3:53 am: |
| 
|
उकडुन बटाटा भाजि,कोबि-बटाटा भाजि,पालक / मेथि / अळु पातळ भाजी,तोंडली भात,मटार भात,मसाले भात,मटार भात, बटाटा भजि,पालक भजि,कोबि भजि,घोसावळे भजी, मिरची भजी, काकडी कोंशिंबिर, डाळिंब कोशिंबिर,पेरु च रायत,कैरिचा तक्कु, मेथांबा,पंचाम्रुत, मटकी उसळ,मटार उसळ,चवळी उसळ, वालाच बिरड,श्रीखंड,आम्रखंड, जिलबी, पुरणपोळी बेसन लाडु, पाकातल्या पुर्या,मठ्ठा जिरे-ताक.
|
Psg
| |
| Wednesday, February 06, 2008 - 6:26 am: |
| 
|
सुमॉ, तिन्ही दिवसांचा गोड पदार्थ आधी ठरव, मग बाकीचं ठरवायला सोपं जातं. ग्रहमख असेल तेव्हा पुरणपोळी असेल तर त्यायोगे बटाटा भाजी, कटाची आमटी, मसालेभात ई. मुंजीला मुलाचं आवडतं पक्वान्न ठेव आणि सत्यनारायणाला अगदी साधं जेवण असलं तरी चालेल, शीरा मात्र भरपूर असू द्यावा प्रत्येक घरातील आवडीनिवडीनुसार पदार्थ बदलतात. तू नागपूरची असल्यामुळे खास तिथले पदार्थ जेवणात असूदेत. असा अनुभव आहे की मुख्य पदार्थ ठरला की बाकीचे आपोआप सुचतात
|
Bee
| |
| Wednesday, February 06, 2008 - 6:53 am: |
| 
|
वर्हाडी ठेचा ठेवायची ती मग सुपरडुपरमॉम तु केळीचे शिकरण वगैरे का नाही ठेवत. हल्ली शिकरण वगैरे मेनू बंदच झाले आहेत घराघरातून.
|
Manjud
| |
| Wednesday, February 06, 2008 - 12:20 pm: |
| 
|
सत्यनारायणाच्या पुजेच्या दिवशी साधाच मेनू ठरव. गोड काही नसले तरी चालेल, प्रसादाचा शिराच पक्वान्न म्हणून ठेवायचा. बाकी भाजणीचे वडे, दही, जीरा राईस / साधा भात, डाळ पालक, खमंग काकडी असं काही ठरवता आलं तर बघ. पहिले दोन दिवस जेवणावर आडवा हात मारल्यावर तिसर्या दिवशी परत चमचमीत काही खायचा कंटाळा आलेला असतो. अर्थात, भाजणीचे वडे सुद्धा चमचमीतच पण मेनू अगदीच मुळमुळीत वाटायला नको. बाकी मुलांना आवडणार्या पक्वान्नात अन्गूर मलई किंवा सिताफळ बासूंदीचा विचार कर. ओल्या काजूची उसळ, छोटे बटाटेवडे, फ्रुट चाट इ. इ. इ. माझ्याच तोंडाला पाणि सुटलंय. सुमॉ, मुंज झाल्यावर तुला समग्र वृत्तांत लिहावा लागेल निदान मेनूचा तरी......
|
Supermom
| |
| Wednesday, February 06, 2008 - 2:04 pm: |
| 
|
अरे वा, आज सकाळी उठले तर मेनूंचा खजिनाच आहे समोर. किती धन्स देऊ तुम्हा सगळ्यांना? मुंजीचं आमंत्रण तर आहेच. बी, मला स्वतःला शिकरण खूप आवडतं पण समारंभात... निदान आमच्या नातेवाईकांमधे नाही appreciate व्हायचं. उलट नावंच ठेवतील... दिनेश, खूप आयडियाज दिल्यात तुम्ही नेहमीप्रमाणे. प्राजक्ता, पाकातल्या पुर्यांची आयडिया मस्त. विशेषत नवरोजींचं हे लाडकं पक्वान्न. (सासूबाई फ़ार उत्तम करीत असत असं ऐकलंय)... त्यामुळे एका दिवशी नक्कीच ठेवू. पूनम, आमच्याकडे मुंजीत मुख्य दिवशी पुरणपोळी असते बहुधा.. मुंज कुठे होणार आहे ते नक्की नाहीय अजून... पण पुडाची वडी... खास नागपुरी... असेलच जेवणात. मंजू, तिसर्या दिवशीचं जेवण हलकं असावं हे उत्तम. (नाहीतर मुखशुद्धीसाठी पाचक चूर्ण ठेवायची वेळ यायची.)धन्स तुला.. ते डोक्यातच नव्हतं माझ्या... तर लागते आता पदर खोचून कामाला (मेनू आयतेच दिलेत तुम्ही) आत माझं (नसलेलं) डोकं लढवते नि फ़ायनल मेनू ( suggestions are welcome again... ) टाकते लवकरच.
|
Chinnu
| |
| Wednesday, February 06, 2008 - 2:25 pm: |
| 
|
सुमॉ पुनमला अनुमोदन. गोडाचा पदार्थ ठरला की बाकीचे सोपे जाते. पाकातले चिरोटे रंग घालून छान दिसतात. वर छान पदार्थ सुचविले आहेत. कोशिंबीरी आणि चटण्या असल्या तर जड जेवण सुसह्य होते. फार जड आणि जास्त पदार्थ एकाच दिवशी येणार नाही ह्याची काळजी घेणे. तुम्हाला आणि चिरंजीवांना शुभेच्छा.
|
Prajaktad
| |
| Wednesday, February 06, 2008 - 3:30 pm: |
| 
|
सुमॉ! मात्रुभोजन आणी भिक्षावळिसाठी छान छान साड्या घेतल्या कि नाही?.. लेकीलाही हौस म्हणुन नवुवार वैगरे घेता येइल तुला.. मुंज मुलाला पेशवे पगडी ही मिळते.. बाकी मुंजीत सगळ्यात जास्त मिरवायला आईलाच मिळते. तो योग सुमॉ ला मुंजिची डिटेल माहीती देणार होता ना?
|
मला १० बायकांसाठी वडापाव आणि चहा करायचा आहे. किती बटाटे लागतील? वाटणात किती मिरच्या घेऊ?
|
Dineshvs
| |
| Thursday, April 03, 2008 - 4:44 pm: |
| 
|
दोन किलो बटाटे पुरतील. साधारणपणे जेवढे वडे संख्येने करायचे तेवढे बटाटे घ्यावेत. मिरचीच्या तिखटपणा नुसार ( वाटलेलेया मिरच्यांचा तिखटपणा जास्त असतो ) दहा ते बारा मिरच्या पुरतील. सगळे वाटण एकदम न घालता, लागेल तसे घालावे व चव घ्यावी. वडे तिखट असले तरी वडापावासाठी गोड आणि तिखट अश्या दोन्ही चटण्या असतातच, त्यामुळे प्रत्येकाला आवडीप्रमाणे चव आणता येते.
|
Manjud
| |
| Friday, April 04, 2008 - 6:56 am: |
| 
|
साधारणपणे जेवढे वडे संख्येने करायचे तेवढे बटाटे घ्यावेत. दिनेशदा, एक किलो बटाट्यांचे मध्यम आकाराचे साधारण ३२ ते ३५ वडे होतात. आणि एका किलोत मध्यम आकाराचे १३ ते १४ बटाटे येतात. बायका आहेत म्हणजे सरासरी दोन वडापावच्या वर काही खाणार नाहीत. त्यामुळे मला वाटतं की १० बायका आणि घरची २ - ४ मंडळी धरून १५ जणांसाठी दिड किलो बटाट्यांचे वडे पुरून उरायला हरकत नाही.
|
Dineshvs
| |
| Friday, April 04, 2008 - 8:42 am: |
| 
|
अरे हो बटाटा वड्याचा आकार हा पण फ़ॅक्टर आहेच कि. !! मुंबईत साधारणपणे वडापावातला बटाटेवडा, जरा आकाराने मोठा असतो.
|
Maitri
| |
| Friday, May 02, 2008 - 7:00 am: |
| 
|
mazyakade 2 jan jevayala yenar aahet , nukatecha bharatatun alet.South indian ani marathi aahet.Kai karava menu? Mi asa vichar karat hote Starter mhanun palak katlets + chutney . main menu sathi paneer butter masala, polya, mix veg raita, Jeera fried rice , tomato saar ani desert mhanun gulabjaam. kasa watatoy menu? ajun ek ithe mi purvi kunitari lihaleli kachhya safarchandachi chutney (aaple) chi recipe wachali hoti pan aata sapadat nahiye, kunitari madat kara please. baki menu madhye gulabjaam aadhicha karun thevin ani ajun kai tayari adalya divashi akrata yeil?
|
Sonchafa
| |
| Friday, May 02, 2008 - 3:54 pm: |
| 
|
मैत्री, तू आदल्या दिवशी टोमॅटोच्या सारासाठी टोमॅटो उकडुन प्युरी करून ठेवू शकतेस. तसेच दुसर्या दिवशी सकाळी पाहुणे येणार असतिल तर आदल्या रात्री कणीक भिजवून ठेवू शकतेस.. अर्थात तिथे तुमच्याकडे मिळणार्या पिठाची कणीक भिजवून फ़्रीजमध्ये ठेवल्यास दुसर्या दिवसाला रेळत नसेल तरच हे कर. पनीर बटर मसाल्यासठी कांद्याची ग्रेवी करून ठेवू शकतेस.
|
Saket
| |
| Wednesday, May 14, 2008 - 8:52 pm: |
| 
|
माझ्याकडे शनिवारी चायनीज कपल जेवायला येणार आहे, तर छानसा मेनू सुचवा नं. मी सध्या ठरवलेला मेन्यू असा आहे, एगकरी, पनीर बटर मसाला, गार्लीक नान, सॅलॅड, पुलाव, गाजर हलवा /श्रीखंड आणि स्टार्टरसाठी समोसे आणि सुप. कसा वाटतोय? पण हा मेन्यू इंडीयन असल्यामुळे त्यांना आवडेल की नाही असे वाटते आहे आणि आम्ही नॉन-व्हेज खात नाही त्यामुळे तेही रेस्ट्रीक्शन आहे.
|
Bsk
| |
| Thursday, May 15, 2008 - 12:44 am: |
| 
|
ha mast vatatoy menu!
|
Karadkar
| |
| Thursday, May 15, 2008 - 5:05 pm: |
| 
|
साकेत, चीनी लोकाना तिखट कदाचित चालेल पण त्यांना आपले मसाले इतके सहन होत नाहीत. त्यामुळे कोणताही पदार्थ करताना कमी मसाल्याचे करावेत. तसेच भात केला तर पुलाव किंवा लेमन राईस वगैरे केलेला बरा. गोडाचे करताना पण खूप दुधाचे पदार्थ करु नयेत. अर्थात हे माझे मत.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|