Dineshvs
| |
| Thursday, April 06, 2006 - 1:02 pm: |
| 
|
Prady त्या चटणीला मुळगापुडी म्हणतात. त्याची कृति आहे ईथेच. त्या चटणीत तेल वा तुप घालुन, ईडली डोश्याबरोबर खातात. त्यासाठी कॉकटेल ईडल्या चांगल्या. कॉकटेल म्हणजे छोट्या ईडल्या, याचे वेगळे साचे बाजारात मिळतात.
|
Junnu
| |
| Thursday, April 06, 2006 - 1:45 pm: |
| 
|
कुठे दिलीये ती चटणी? मी चटण्यांचा बीबी पाहीला पण सापडली नाही.
|
Dineshvs
| |
| Thursday, April 06, 2006 - 4:17 pm: |
| 
|
आत्ता लिहिली ईथे /hitguj/messages/103383/106142.html?1144340000 कोरदी च्या जागी कोरडी असे वाचावे.
|
Junnu
| |
| Thursday, April 06, 2006 - 5:49 pm: |
| 
|
thanks. ह्या week-end करेन मी. कशी झालेली ते सान्गते.
|
Mai
| |
| Sunday, April 09, 2006 - 11:40 pm: |
| 
|
थॅंक्स दिनेश मसाला इड्ली ची सविस्तर रेसिपी दिल्याबद्दल
|
Miseeka
| |
| Saturday, July 29, 2006 - 7:53 pm: |
| 
|
Palak Idli(Spinach Idli )kashi karaychi?
|
Prady
| |
| Monday, July 31, 2006 - 5:29 pm: |
| 
|
पालक ईडली साठी मी पालक blanch करून आलं, मिरची बरोबर वाटून ती paste इडलीच्या पीठात घालते. बरोबर थोडे ओले मटारचे दाणे अक्खे पण पीठात घातले तर छान लागते. Mrinmayee पालक आयत्या वेळी घालायचा.
|
Miseeka
| |
| Tuesday, August 15, 2006 - 10:08 pm: |
| 
|
मि पालक इडलि try केली आणि इडलि ला मस्त pista color आला आणि चव पण छान लागलि इडलिला मि सोबत म्हणुन coconut चटणी न घेता tomato sauce घेतले पण तुम्ही color combination म्हणुन लाल, yellow color ची कोणति पण चटणी घेवु शकता.
|
Manuswini
| |
| Wednesday, September 27, 2006 - 2:57 am: |
| 
|
हमखास soft इडली बनवायचा उपाय करून बघा माझी आई करायची इडली करण्या-आधी शिजवलेला नरम भात नाहीतर पातळ पोहे भिजवून mix करायचे. इडली soft होते एक्दम.
|
Rajasi
| |
| Monday, October 02, 2006 - 3:43 pm: |
| 
|
इडली stand न्यु जर्सीला (newport area) कुठल्या इन्डीयन दुकानात मिळतो कोणला माहित आहे का?
|
Swa_26
| |
| Thursday, March 15, 2007 - 11:56 am: |
| 
|
इडली करताना त्यात dry यीस्ट केव्हा आणि किती प्रमाणात घालायचे, कोणी सांगेल का??
|
Dineshvs
| |
| Thursday, March 15, 2007 - 1:13 pm: |
| 
|
एक वाटी उडदाची डाळ दोन वाटी तांदुळ या मिश्रणाला, अर्धा चहाचा चमचा यीस्ट पुरते. ड्राय यीस्ट वापरण्यापुर्वी. अर्धा कप कोमट पाण्यात अर्धा चमचा साखर घालावी. व त्यावर यीस्ट पसरावी. दहा ते पंधरा मिनिटात मिश्रण फ़सफ़सुन आले पाहिजे. ( तसे झाले नाही तर यीस्ट खराब झालीय असे समजावे. ) मग ते मिश्रण ढवळुन, ईडलीच्या ( वाटुन झालेल्या ) मिश्रणात मिसळावे व रवीने नीट घुसळुन घ्यावे. डाळ व तांदुळ वाटुन झाल्याबरोबर हे मिसळावे. काहि काहि मिक्सरमधे वाटताना मिश्रण फार गरम होते. तसे असेल तर मिश्रण जरा निवु द्यावे. यीस्ट घातल्यानंतर चार सहा तासात पिठाचे आकारमान फ़ुगुन निदान दुप्पट झाले पाहिजे. पण मुंबईच्या सध्याच्या हवेत, आठ दहा तासात तसेहि मिश्रण तयार होतेच.
|
मायबोलीकरान्च्या सुचना पाळून ईडलीचे पीठ छान फ़रमेन्ट व्हायला लागले आहे. पण ईडल्या ईडलीपात्राला चिकटतात, तेल लावले तरी. काय चूकत असावे बर? मी ३:१ असे प्रमाण घेते.
|
Dineshvs
| |
| Thursday, April 12, 2007 - 5:20 pm: |
| 
|
पीठ फार पातळ होतेय का ? वाटताना पाणी जास्त झाले का ? तसेच जर कमी शिजवले तर असे होईल. चालत असेल तर एक स्वच्छ रुमाल. किंवा फ़ॉईलचे तुकडे वा केळ्याच्या पानाचे तुकडे त्या कप्प्यात ठेवले आणि वर पिठ टाकुन वाफवले तर असे होणार नाही.
|
Meggi
| |
| Friday, April 13, 2007 - 4:26 am: |
| 
|
मस्तानी, इडल्या झाल्यावर त्यावर पाणी टाक, लगेच निघतात. गरम असताना पण काढू शकतो.
|
धन्यवाद दिनेशदा आणि मेग्गी. कदाचित पातळ होत असेल. मी पुढच्यावेळी लक्षात ठेवीन.
|
मेग्गी किती आणि कसे पाणी टाकायचे?
|
Meggi
| |
| Monday, April 16, 2007 - 8:52 am: |
| 
|
मस्तानी, इडल्या झाल्या की लगेच कूकर मधुन काढ, आणि नळाचि छोटी धार करुन २ सेकंद धरलस तरी पुरे. इडल्या थंड किंवा पिचपिचित होत नाहित. लगेच निघतात. करुन बघ.
|
Ksmita
| |
| Friday, May 04, 2007 - 8:49 pm: |
| 
|
मायक्रोवेव इडली स्टन्ड मधे इडल्या दडदडीत झाल्या गरम असताना नरम मऊ होत्या काही उपाय ?
|
Prady
| |
| Thursday, May 17, 2007 - 7:12 pm: |
| 
|
स्मिता मला microwave इडली स्टँडचा अनुभव नाही पण तु त्या ईडल्यांवर थोडं पाणी स्प्रे करून आणी मग झाकून परत एकदा microwave करून पहा. कदाचित soft होतील असं केल्याने.
|