Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through May 13, 2008

Hitguj » Cuisine and Recipies » Looking For Recipes » Archive through May 13, 2008 « Previous Next »

Dineshvs
Thursday, May 08, 2008 - 2:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दूध, अंडी, बदाम, खारीक, गहू, उडीद, सोयाबीन आणि अर्थातच कुठलेही मटण, प्रथिनासाठी उत्तम. चीजहि उत्तम. डब्यात चीज आणि अंड्याचे सॅंडविच देता येईल. पण हे सगळे इतर आहाराबरोबरच घ्यावे.
सुदृढ शरिर कमावण्याची घाई नको. ते हळुहळुच व्हायला हवे. तंदुरुस्त असणे महत्वाचे. भूक लागली कि मिळेल ते जंकफ़ुड खाण्याची इच्छा होते. तसे होवू नये म्हणून आधीच वेळच्या वेळी आहार घ्यावा.


Aashu29
Thursday, May 08, 2008 - 4:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अमि मी हे वाटण जनरली उसळी आणि प्रॉन करीला वापरते

Akhi
Thursday, May 08, 2008 - 4:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दर माणशी दर दिवशी आवश्यक कमीत कमी पदार्थ प्रमाण:
पालेभाज्या १ मध्यम वाटी शिजवुन
सालसकट उसळी १ मध्यम वाटी शिजवुन
मोड आलेल कच्च धान्य १ मध्यम वाटी शिजवुन
कोशिंबीर आणी लिंबाची फ़ोड
नाचणी + बाजरी १ भाकरी
स्निग्ध पदार्थ १ चमचा
सोयाबीन दाने/पीठ १ चमचा

Chinoox
Thursday, May 08, 2008 - 5:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अखी, सोयाचं आपण दिलेलं प्रमाण खूप जास्त आहे..ते आरोग्यास घातक ठरू शकते..सोया प्रोटीन्सबद्दल विकीपिडीयावर वाचा..

Shonoo
Thursday, May 08, 2008 - 6:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दाद
त्याला युनिव्हर्सिटीमधे लॉकर मिळतो का? त्यात तिथे बदाम, अक्रोड, काजू, पिस्ते, शेंगदाणे खजुर, मनुका असं मिक्स करून ठेवायला देता येईल.

डब्यात पीनट बटरचे सँडविच देता येतील. उकडलेलं अंड, चीझ यांचं सँडविच देता येईल. तुमच्या ग्रोसरी मधे कोल्ड कटस मिळत असतील. ते नुसतेच किंवा त्यांचं पण सँडविच बनवता येइल. आजकाल चिकनचे पण वेगवेगळ्या चवीचे कोल्ड कट्स मिळतात. चिकनचेच हॉट डॉग तर इथली मुलं प्रेमाने खातात. टोफू वापरता येइल स्वैपाकात. वेगवेगळे प्रकार देउन त्याला काय आवडतं सोयीचं पडतं ते पहा.

देशी प्रकारा मधे डाळींची धिरडि, डोसे, इडल्या, वडे, छोले राजमा करता येइल. दक्षिण अमेरिकन पद्धतीने ब्लॅक बीन्स, रेड बीन्स वगैरे करुन पहा.


Daad
Thursday, May 08, 2008 - 11:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेशदा, अखी, शोनू धन्यवाद. बरच काही करून बघण्यासारखं सांगितलत.

Akhi
Friday, May 09, 2008 - 6:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

४ किलो गव्हामधे १ किलो सोयाबीन टाकतात. मात्र सोयाबीन भाजुन मगच दळणामधे टाकावे. आणी वरिल पोस्ट आणी हे प्रमाण मी मालती कारवारकर यांच्या पुस्तकातुन सांगितले आहे.

Bee
Friday, May 09, 2008 - 8:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सोया बीनच दुध कसं काढायच कुणाला माहिती असेल तर लिहा ना इथे. मी इथे जे विकत मिळत डब्यात तेच आणतो पण जर घरीच काढता येत असेल तर ताज दुध केंव्हाही चांगलं..

शाकाहारी माणसाला B complex ची सतत गरज भासते. ती गरज काही प्रमाणात फ़क्त सोया बीनच पुर्ण करू शकतो. नाहीतर न धुतलेल्या भाज्यांच्या Bacteria मधुन.


Dineshvs
Friday, May 09, 2008 - 8:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी, घरी सोयाबीनचे दूध काढण्यासाठी ते भिजवून वाटून घ्यायचे आणि त्याचा रस घ्यायचा. ( शेंगदाण्याचे पण असे दूध करता येते ) पण असे दूध पचायला जड असते व त्याला उग्र वास येतो. जे दूध तयार मिळते, किंवा जे चंक्स मिळतात, त्या प्रक्रियेत, पचायला जड असलेले घटक, काढून टाकलेले असतात. त्यामुळे तेच घेणे जास्त सोयीस्कर.

Vidyat
Friday, May 09, 2008 - 8:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बीटच्या पाल्याचा काही उपयोग आहे का?

Prajaktad
Saturday, May 10, 2008 - 1:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ईथे जांभळाचे सरबत आहे

http://www.loksatta.com/daily/20080508/viva08.htm

Amayach
Saturday, May 10, 2008 - 4:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी या लिंक वरचे सोया मिल्क मी करुन पाहिले होते एकदा. चान्गले होते.
http://www.nandyala.org/mahanandi/archives/2006/04/03/home-made-soymilk/

Arch
Saturday, May 10, 2008 - 6:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश, एकदा माझं दही जरा जास्त दिवस fridge मध्ये राहिलं तेंव्हा त्यावर एक गुलाबी layer तयार झाला होता. is this different strain of yeast? त्या खालच दही चांगल स्वच्छ पांढर होत.

Dineshvs
Sunday, May 11, 2008 - 2:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Vidyat बीट, फ़्लॉवर, अलकोल आदी सगळ्याच्या भाज्यांच्या पाल्याची भाजी करता येते. कमला सोहोनी, हा पाला वाया घालवू नये, असे आवर्जून सांगत असत. हा पाला, चण्याची डाळ कूकरमधे हळद मीठ हिंग घालून शिजवून घ्यावी. आणि मग नुसती मिरचीची फ़ोडणी दिली कि झाले.

आर्च,असा गुलाबी किंवा पिवळा थर, बुरशीमुळे होतो. बुरशी आली म्हणजे पदार्थ खराब झाला असा नव्हे, पण मानसिक कारणांमुळे खाल्ले जात नाही.
नारळाच्या ओल्या कवडीवर पण असे होते.
फ़्रीजमधे ठेवायचे बुरशीनाशक औषध मिळते, ते वापरल्यास असे होत नाही.


Dineshvs
Sunday, May 11, 2008 - 2:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Amayach सोयामिल्कमधे व्हॅनिला घालायची आयडिया छान आहे.
टोफ़ूसाठी पण असेच करावे लागते. पण ते घट्ट होण्यासाठी पुढे प्रक्रिया करावी लागते.


Arch
Monday, May 12, 2008 - 1:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Thanks दिनेश. ते काय औषध आहे?

Dineshvs
Monday, May 12, 2008 - 1:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आर्च, नाव लक्षात नाही आता, पण फ़ंगस हा शब्द नावात होता.
तसे अधूनमधून, फ़्रीज रिकामे करुन जर व्हीनीगर किंवा खायचा सोडा घातलेल्या कोमट पाण्याने आतून पुसून काढले, तरी असा त्रास होत नाही.
खुपदा आपण कोमट पदार्थ फ़्रीजमधे ठेवतो, तेवढ्यात या बुरशी, बॅक्टेरियांची वाढ होते, आणि मग जरा संधी मिळाली कि त्यांची भराभर पैदास होते.


Cinderella
Monday, May 12, 2008 - 5:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इथे (अमेरिकेत) बरेच लोक अनसॉल्टेड बटर चे तुप करतात. अर्थात मी पण करते. पण मला नेहेमी असा प्रश्न पडतो कि ह्या तुपाचे गुणधर्म भारतीय पारंपारिक पद्धतिने केलेल्या तुपासारखेच असतील का ? आता तर प्रत्येक वेळी मुलाच्या भातात वगैरे तुप घालताना हे मनात येते. कोणी सांगु शकेल का ?

Aashu29
Tuesday, May 13, 2008 - 4:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दही लावताना माझे दही नेहमि जरा पातळ होते, विरजण कमी पडते का?आणि मी दुध कोमट करुन चांगला फ़ेस येइस्तोवर एका भांड्यात्तुन दुसर्या असे करते. काय चुकत असेल?

Dineshvs
Tuesday, May 13, 2008 - 8:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सिंड्रेला, आपल्या पद्धतीने विरजण लावुन, ते घुसळून लोणी काढलेले तूप चवीला वेगळे लागतेच शिवाय तेच तूप आदर्श असे जुने ग्रंथ सांगतात. बाजारात मिळणारे बटर, हे थेट दूधाच्या क्रीमपासून केलेले असते.
तसे ते वाईट नसते. त्यामूळे खायला काहिच हरकत नाही.

Aashu29 विरजण लावल्यानंतर इतके घुसळायची गरज नाही, आधी भांड्याला आतून दहि लावुन, मग हळूच कोमट दूध त्यात ओतले तरी चालते. असे एकदा करुन बघा, तरिही दहि पातळ झाले तर आणखी उपाय सूचवीन.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators