|
Bee
| |
| Tuesday, May 06, 2008 - 1:41 am: |
| 
|
वा काय छान माहिती मिळाली. मी आज उठल्या उठल्या कणस भाजता येतील असा विचार केला. काय खायच तेच डोक्यात जास्त असत :-)) मनु, हो इथे शेगडी मिळते हा शोध मला नव्यानीच लागला आणि मग मी लगेच जाऊन घेऊन आलो शेगडी दुकानातून. कांडी कोळसा मी कधी वापरला नाही तोही वापरून बघणार आहे. दिनेश ह्यांना कांडी कोळशावर लिहिता येईल. मी विदर्भात दगडी कोळसा वापरला आहे, काय काळेभोर हात होतात. इथे मडकी पण विकत मिळतात. आपल्याकडे मकरसंक्रातीला वाणात जी मडकी देण्याची प्रथा आहे ना काही भागात तेवढी मोठी मिळतात मडकी. पण त्यात शिजवले तर चालते का हे मात्र माहिती नाही. अजून नसतील असतील तितक्या कृती सुचवा मला. मला तर वाटतं माझ घर किंचित काळपट व्हाव तितकच ते खेडूत भारतीय वाटेलं.
|
Dineshvs
| |
| Tuesday, May 06, 2008 - 2:56 am: |
| 
|
कांडी कोळसा म्हणजे निर्धूर कोळसा का ? भाताच्या तूसापासून इथे कोळसा करतात. त्याचा अजिबात धूर होत नाही. जर तो मिळत असेल तर अवश्य वापर, त्याने घराचे छतही काळे होणार नाही. साध्या कोळश्याने तो धोका असतो. तसेच शेगडी नेहमी उघड्या जागी म्हणजे बाल्कनीमधे वगैरे पेटवत जा. धूर कोंडून त्रास होतो, नाहीतर. केनयात, शेगडीला दार असते. ते बंद केले तर ती अगदी मंद आच देत राहते. अश्या आचेवर तुरीची डाळ छान शिजते. मडक्यात शिजवण्यासंबंधी मी आधी लिहिले होते.
|
Bee
| |
| Tuesday, May 06, 2008 - 3:48 am: |
| 
|
दिनेश, उसाच्या पाचोट्यापासून कांडी कोळसा तयार करतात. निखारे लालभडक होतात आणि भांडी घासायला आयती राख पण मिळते. मी आता हीच राख भांडी घासायला वापरणार आहे, जशी लागेल तशी. घरात बालकनी आहे आणि शेगडी पेटवायला चांगली जागा आहे. त्यामुळे ऐसपैस बसून, मांडी घालून रांधता येईल. एक गोणपाटासारखे पोते पण मिळाले बसायला. धूर बाहेर पडायला काहीच अडथडा नाहीये. कधीतरी रोडगे पण करणार आहे. शोनू, अमेरिकेतील अंगण ऐसपैस असते तेंव्हा तुम्ही अशी एखादी शेगडी बिगडी वापरू शकत नाही का? की धूर आला की सायरन वाजते
|
Ami79
| |
| Tuesday, May 06, 2008 - 7:22 am: |
| 
|
इथे ओल्या खोबर्याच्या वाटणाचा उल्लेख आला आहे. आमच्या कडे ओल्या खोबर्याची दोन वाटणे करतात. एक म्हणजे खोबरे, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर यांचे वाटण, जे फिशसाठी वापरतात. दुसरे वाटण म्हणजे खोबरे आणि जीरे एकत्र वाटणे. हे शाकाहारी पदार्थात वापरतात. वर उल्लेख केलेले वाटण यापैकीच एक आहे कि आणखी काही वेगळे आहे?
|
Aashu29
| |
| Tuesday, May 06, 2008 - 7:39 am: |
| 
|
माझ्या वाटणात ओले खोब्रे, लाल मिरचि, लसुण आले, धणे होते.
|
Aashu29
| |
| Tuesday, May 06, 2008 - 7:40 am: |
| 
|
आणि भाजलेला कांदा पण
|
Ami79
| |
| Tuesday, May 06, 2008 - 8:24 am: |
| 
|
आशु, तू हे वाटण कोणकोणत्या पदार्थांमध्ये वापरतेस?
|
Sonchafa
| |
| Tuesday, May 06, 2008 - 9:03 am: |
| 
|
मी उंधियो साठी जे वाटण वापरते त्यात ओला नारळ, कोथिंबिर, हिरव्या मिरच्या, लिंबू, मीठ आणि जिरं असते. आम्ही फ़िश खात नाही त्यामुळे कधी जिर्या ऐवजी लसूण घालून वाटतो. आणि ती चटणी म्हणून घावन किंवा पोळ्यासोबत खातो.
|
Shonoo
| |
| Tuesday, May 06, 2008 - 11:55 am: |
| 
|
बी हा काय प्रश्न झाला. अमेरिकेत सार्वजनिक बागांमधे अनेकदा अशी कोळसा वापरण्याची ग्रिल लावलेली असतात. कोणीही आपापले कोळसे, कणसं अन इतर काय हवं ते आणावं ग्रिल करावं. शक्य असल्यास आजू बाजूच्या झाडांना hammock बांधून एक ताणून द्यावी, खेळ खेळावेत! सुट्टीचा दिवस सत्कारणी लावावा. घरी सुद्धा पुष्कळ जण कोळशाचे ग्रिल वापरतात ( अंगणात हो, घरात नाही.) पण ( आमच्यासारखे) बरेच जण घरी प्रोपेन गॅस चं ग्रिल अन पार्क मधे गेले तेंव्हा कोळशाचं ग्रिल असं ही करतात. पुढच्या वर्षी जुलै मधे फिलाडेल्फिया मधे मराठी सम्मेलन आहे त्याला ये तू. मग तुला दाखवीन व्यवस्थित
|
Bee
| |
| Tuesday, May 06, 2008 - 3:01 pm: |
| 
|
इथे कधीच मला तुम्ही शेगडी किंवा तत्सम चुलींबद्दल चर्चा करताना दिसले नाहीत म्हणून विचारून पाहिले. कधीही पहाव तर पहिला नंबर माईक्रोवेव्हचा
|
Daad
| |
| Tuesday, May 06, 2008 - 11:01 pm: |
| 
|
मला ना, प्रोटीनयुक्त आहाराविषयी माहिती हवी आहे. शाकाहारात आपल्या डाळी (विशेषत: उडीद) प्रोटीन देतात इतपत माहिती आहे. पण असे काही खास पदार्थ आहेत का, जे प्रोटीन्स पुरवण्यासाठी म्हणून खाता येतील? विशेषत: मधल्या वेळचे पदार्थ. मांसाहारात चिकन आणि अंडी, मासे चालतिल पण बाकी नाही. आपल्या हितगुजवर लिन्का, रेसिपीज असल्यास प्लीज सांगा रे आणि गं.
|
Sashal
| |
| Tuesday, May 06, 2008 - 11:43 pm: |
| 
|
सोयाबीन्स चे पदार्थ (सोयामिल्क, tofu इ.) किंवा दही ( yogurt ) मध्ये भरपूर proteins असतात असं ऐकून, वाचून आहे .. 
|
Dineshvs
| |
| Wednesday, May 07, 2008 - 2:46 am: |
| 
|
दाद. इथे चर्चा झाली आहे. पण माझा भर नेहमी चौरस आहारावर असतो. आपल्या सवयीचा नेहमीचा आहार आपली गरज भागवतोच, अगदी खास गरज असलीच तर बाजारात मिळणारे प्रोटिन्स सप्लिमेंट्स घ्यावेत. पण ते अंगी लागायला मूळात पचनशक्ति नीट हवी. आपला रोजचा आहार, चपाती, भाजी, वरण, भात, तूप, कोशिंबीर, लिंबु, पापड, पारंपारिक लोणची, चटण्या, अधुनमधुन गोडाचे पदार्थ ( खिरी, पुरणपोळी, लाडु ) डांगर, मेतकुट, भरीत, दहि, ताक, हा सगळा आहार अगदी योग्य असा आहे.
|
बी इथे चिक्कार चर्चा झालिय BBQ विषयी.. /hitguj/messages/103383/110438.html?1118419763
|
Bee
| |
| Wednesday, May 07, 2008 - 10:33 am: |
| 
|
मी आज one stove recipe वर एक कोरीयन धिरडे पाहिले. त्यात झुचिनी आणि शिमला मिरची घातली आहे. मला जरा शंका आहे की धिरडे इतक्या लवकर होतात की झुचिनी आणि शिमला मिरची नीट शिजेल का इतक्या कमी वेळात? आभार.. (शिमला मिरची सर्वत्र उपलब्ध असताना, मान फ़क्त 'शिमला' ला लाच का?) प्राजक्ता, आभारी आहे.
|
Shonoo
| |
| Wednesday, May 07, 2008 - 11:07 am: |
| 
|
दाद ही लिंक बघ. http://www.nal.usda.gov/fnic/foodcomp/search/ यात बर्याच पदार्थांच्या Nutrition values सापडतील. तुला नक्की काय माहिती हवी आहे? डॉ. अट्किन्स वगैरे डायेट बद्दल म्हणत असशील तर ते डॉक्टरांशी बोलून मगच करावे. अजून एक चांगला लेख webmd वर आहे ही त्याची लिंक http://www.webmd.com/diet/guide/high-protein-diet-for-weight-loss?page=3 . msn वर पण बरेच लेख सापडतील. पण वर दिनेशनी लिहिल्या प्रमाणे संतुलित आहारा कडे लक्ष असावं. अतिशय हाय प्रोटीन डायेट्स नी लिव्हर वर परिणाम झाल्याची उदाहरणं आहेत. ते बॅडमिंटनच्या सरांनी काही उणं दुणं बोललं असेल तर जास्त मनाला लावून घेऊन नकोस बलं
|
Bsk
| |
| Wednesday, May 07, 2008 - 5:55 pm: |
| 
|
दाद, ओटमील मधे प्रोटीन्स असतात भरपूर असं मी ऐकले.. शिवाय त्याने खूप एनर्जी पण येते. व्यायाम करायच्या आधी दुधात घालून घेतल्यास फ्रेश वाटते. पोटासाठी सुद्धा चांगले..सगळी ऐकीव माहीती.. चु.भु.द्या.घ्या.
|
कोणी मला खाकरा ची क्रुती देइल काय?
|
Chinoox
| |
| Wednesday, May 07, 2008 - 7:38 pm: |
| 
|
हो, ओटमील मधे भरपूर प्रथिनं असतात. पण सोयाबीनचा वापर मात्र फ़ार जपून करावा.. म्हणजे भिजवून आणि भाजून..कणकेत जर सोयाबीनचं पीठ टाकायचं असेल तर किलोभर कणकेत २ चमच्यांहून अधिक नको..प्रोटीन सप्लिमेंट्ससुद्धा डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्याव्यात..
|
Daad
| |
| Wednesday, May 07, 2008 - 11:24 pm: |
| 
|
दिनेशदा, आणि सगळ्यांचे आभार. संतुलित आहाराविषयी अगदी मनातलं बोललात. शोने, माझा इथला प्रश्नं आणि फुलं गेंदवा... चा काहीही संबंध नाही . तो लेख बर्याच आधी लिहिला होता. लेकाने व्यायामाच्या बर्याच गोष्टी तडाक्यात सुरू केल्यात. आणि त्याचं खाणं थोडं अधिक प्रोटीन्स युक्त हवय. मी स्वत: सप्प्लीमेन्ट्सच्या विरोधात असल्यानेच हा प्रश्न. की, आपल्या मधल्या वेळच्या खाण्यात काही खास 'प्रोटीन्सयुक्त' पदार्थ त्याला देता येतील का? युनीव्हर्सिटीत बराच वेळ जातो त्याचा, म्हणून मधल्या वेळच्या पदार्थांची चौकशी, जे डब्यात देता येतील.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|