|
अग रात्री लिहीत होते. आळशी कुठली(मी बाई).
|
Shmt
| |
| Monday, April 28, 2008 - 10:56 pm: |
| 
|
दिनेशदा: मला इथे reply लिहीण्यास उशीर झाला. मला साखरेच्या गाठी जमल्या.पण दुध घालुनही पांढर्या शुभ्र झाल्या नाहीत?? मी एका वाटीला २ चमचे दुध टाकले होते.मी माळा cutting board वर aluminium foil लावुन केल्या त्यामुळे त्या सुकल्यावर पटकन उचलता आल्या.
|
Dineshvs
| |
| Tuesday, April 29, 2008 - 3:09 am: |
| 
|
आभार shmt , हि फ़ॉईलची आयडिया मला सुचली नव्हती. मला वाटले गरम पाकामूळे फ़ॉईल चिकटून बसेल. दूध घातल्यानंतर हळुहळु फ़ेस यायला लागतो. तो काढून टाकला तर बाकिचा पाक शुभ्र असतो. संक्रांतीचा काटेरी हलवापण असाचा पाक, करुन करतात.
|
Ashwini
| |
| Wednesday, April 30, 2008 - 4:59 pm: |
| 
|
Burlington मध्ये कुठल्या दुकानात पाहिलेस असाम्या? देशातल्या हापूसची quality चांगली होती का?
|
Asami
| |
| Thursday, May 01, 2008 - 3:36 pm: |
| 
|
राज राणा ग. Quality चांगली होती. Not great
|
Wel123
| |
| Friday, May 02, 2008 - 5:18 pm: |
| 
|
तुरीची दाल ताकून जो दोसा बनवतात त्याची क्रुति कोनी सागेल का.
|
Sonchafa
| |
| Saturday, May 03, 2008 - 5:52 pm: |
| 
|
घरी खूप जांभळं आणली होती.. खरं तर ती तशीच खायची पण तरी जास्त आहेत. इथे देता येत नाहीत म्हणून त्याचे काय करता येईल? जेली, सरबत किंवा जॅम असे काही बनवतात का?
|
Aashu29
| |
| Sunday, May 04, 2008 - 3:00 am: |
| 
|
चवळिच्या उसळची तयारी केली ओल्या खोब्राचे वाटण केले पण चवळी जास्त शिजली आता त्याएवजी या वाटणात आयत्या वेळी काय घालु? संध्याकाळी पाहुणे येणारेत. आणी ते वेज खाणारे आहेत.बटाटे सोडुन काहितरी सांगा ना आणि जरा लवकर प्लीज.
|
Sonchafa
| |
| Sunday, May 04, 2008 - 4:31 am: |
| 
|
आशु, तुझ्याकडे काय काय भाज्या आहेत ते बघ. उंधियो करण्याजोगी तयरी असेल तर तो करू शकतेस. तू म्हणशील की ते म्हणजे वेळकाढू काम सांगितलस. पण सोपा उंधियो कर. नॉर्मल उंधियो करताना सुद्धा मी सगळ्या भाज्या; म्हणजे सुरण, रताळी, पापडी, पापडितले दाणे, छोटे बटाटे (भरल्या वांग्यासारख्या मधे अर्धवट खाचा पाडलेले) ह्यापैकी ज्या असतील त्या भाज्या धुवुन, चिरुन त्याला हे वाटण लावून जरा वेळ मॅरिनेट होऊ देते. कुकरमधून अर्धकच्च वाफवून घेते. मेथीची मुटकुळी करताना त्याच तेलात कोन सोनेरी रंगावर तळून घेते(कारण तो शिजवला तर बुळबुळीट असतो, आणि तळलेला खायला तसाही चांगला लागतॉ आणि तळलेला असल्याने खाताना खाजत नाही.) भाजी करताना, थोड्या तेलावर बर्यापैकी ओवा घालून तो तडतडला की थोडी ठेचलेली लसूण घालते. त्यावर चिरा दिलेले बटाटे घालते. ते जरा परतले की वांगी घालून परतते. त्याचवेळी धणेपावडर, आवडत असल्यास थोडी जिरेपावडर घालते. हे बर्यापैकी शिजलं की त्यात वाफवलेल्या भाज्या घालून सगळे एकत्र करून घेते. त्यात चवीप्रमाणे मीठ आणि लाल तिखट घालते. खोबर्यात मिरच्याही असतातच.. त्यामुळे गरजेप्रमाणे लाल तिखट घालावे. सगळ्यात वर मुटकुळी व कोनचे तुकडे घालते. त्यावर भाजी लागू नये म्हणून उरलेल्या खोबर्याच्या वाटणात पाणी घालुन चक्क ते भाजीवर सगळीकडे घालते. त्यावर झाकण ठेवून छान वाफ येऊ देते. मी हा उंधियो खूप कमी तेलात करते. मला एकदाच उंधियो खाऊन समाधान होत नाही आणि एवढी मेहेनत करायची तर मी तो अगदी कमी कधीच करत नाही. पण जास्त तेलाचा आणि धनेपावडरीचा उंधियो किमान मला तरी घशाशी येतो..त्यमुळे भाज्या पूर्ण तेलात न शिजवता मी वाफवून घेते. तसेच नन्तर शिजताना भाजी लागू नये म्हणून जास्त तेल न ठेवता वाटणाचे पाणी (मिक्सरच्या भांड्यात सुद्धा पाणी घालून बाजूला ठेवते.)घालते. पाण्यात शिजलेला उंधियो टिकणार नाही अशी समजूत असते. पण हा उंधियो आठवडाभर फ़्रीजमध्ये सहज टिकतो.. मात्र उंधियो केल्यावर थंड झाला की आत टाकायचा उंधियो मी लगेच छोट्या डब्यांमध्ये घालून रूम टेंपरेचरला आला की फ़्रीज मध्ये ठेवते. मी असा उंधियो फ़्रीझर मध्ये ठेवून महिन्याने सुद्धा थॉ करून खल्लेला आहे. (वेड्यात काढलत तरी चालेल, मला उंधियो खूप आवडतो. आणि साग्रसंगीत उंधियो करायला मेहेनत आणि वेळ भारी लागतो. ते सारखे सारखे करणे शक्य नाही.) तू म्हणशील की विचारल्या प्रश्नाला भलतेच उत्तर काय दिले म्हणून. पण तुझ्या ओल्या खोबर्याच्या वाटणात कोथिंबिर, मिरच्या, मीठ, लिंबू तर असणारच तर ते वाटण किती आहे त्या प्रमाणात भाज्या घेऊन (ज्या घरात असतिल त्या.. म्हणजे फ़रजबी, फ़्लॉवर, कोबी, बटाटा, वांगी, मटार ह्यातलं तुला आवडेल ते कॉंबिनेशन घेऊन वरच्या पद्धातीने तू भाजी करू शकतेस. ज्या भाज्या कुकरमध्ये शिजवून घेऊन चालणार असेल त्याच वाफवून घे. बाकीच्या फोडणीत घालूनच शिजव.
|
Aashu29
| |
| Sunday, May 04, 2008 - 5:45 am: |
| 
|
धन्स ग, मी या वाटणात आलु, मटार, बिन्स आणि फ़्लावर घालेन वेगले परतुन.
|
Dineshvs
| |
| Sunday, May 04, 2008 - 3:27 pm: |
| 
|
या वाटणापासून हा अवियल पण चांगला पर्याय आहे. कृति आहे इथे. रुपाली, जांभळाचे सरबत, जेली वगैरे करता येते. पण त्याला ताज्या जांभळाची चव येत नाही. जांभळे पाण्यात कुस्करुन शिजवावी लागतात, आणि त्यावेळी थोडा कडवटपणा येतो. लगेच संपणारी नसतील तर थोडेसे मीठ लावुन फ़्रीजमधे ठेवायची. खुप टिकतात. माठात मीठ व जांभळे घालून चुरुन त्याचा रस पण काढतात. पण तो कडवट तुरट लागतो.
|
Chinnu
| |
| Sunday, May 04, 2008 - 4:51 pm: |
| 
|
अग सोनचाफ़ा , काही जांभळांचा गर काढून साखरेचा पाक करून घालून पहा. मी प्रयोग केला नाही पण ऐकून आहे. जांभळाचे आइस्क्रीम पण ऐकीवात आहे. मला पाठव थोडी, मीठ लावून गट्टम करते!
|
Sonchafa
| |
| Sunday, May 04, 2008 - 4:52 pm: |
| 
|
धन्यवाद दिनेश, मी वेगळाच प्रयत्न करून पाहिला. सगळी जांभळे धुवून निथळून घेतली. मग सुरीने त्याचा गर बी पासून वेगळा काढून घेतला.. हे करताना अर्थातच दोन-चार बिया इथे-तिथे उडाल्या. आणि चार थेंब रस जमिनीवर पडला. त्यानंतर तो गर तसाच सालीसकट मिक्सरमधून पाणी न घालता बारीक फ़िरवून घेतला. नॉन-स्टिकच्या भांड्यात जांभळाच्या गराच्या अंदाजाने साखरेचा पाक करुन घेतला. त्यात ही वरची प्युरी घातली. सगळे नीट एकत्र केलं. चव पाहिली.. थोडी तुरट लागली त्यामुळे सरबत करण्याचा विचार सोडून दिला. थोडी साखर कमी वाटली म्हणून ती घातली आणि मग तसेच मंद गॅस वर ठेवलं. ढवळणं चालू ठेवलं. नंतर त्याची कन्सिस्टन्सी पाहून मला चॉकलेटसॉसची आठवण झाली.. घरात व्हॅनिला आईस्क्रीम नव्हते.. पिस्ता होतं.. पण हे कॉंबिनेशन खायचं धाडस होईना म्हणून शेवटी ते अजून आटवलं आणि आता त्याचा छान जॅम तयार झाला आहे. अशा तर्हेने सगळीच्या सगळी जांभळं मार्गी लागली. जॅमचा रंग खूप सुंदर आला आहे. चव कशी आहे हे उद्या खाऊन बघून सांगेन.
|
Dineshvs
| |
| Monday, May 05, 2008 - 2:43 am: |
| 
|
मग त्या रसाचे थेट आईसक्रीम करता आले असते. ठाण्यात मिळते जांभळाचे आईसक्रीम.
|
Sonchafa
| |
| Monday, May 05, 2008 - 4:59 am: |
| 
|
जॅम मस्त झाला आहे. पावाला लोणी लावून त्यावर जॅम फासून टोस्ट करून खाल्ला. छान लागतोय.. गम्मत सांगू का? आज सकाळी परत आमच्या काकू आणि पिशवीभर जांभळं घेऊन आल्या आहेत. (हताश चेहेर्याचा स्मायली!) पण आता दिनेशच्या म्हणण्याप्रमाणे आईसक्रीम करून पहावे म्हणते. :P पण दिनेश जमलं तर सांगा हो की त्याने दूध फाटणार नाही का? काय करु? आणि रस गरम करून घेऊ की तसाच?
|
Bee
| |
| Monday, May 05, 2008 - 6:31 am: |
| 
|
दिनेश आणि इतर, मी कोळशाची शेगडी आणली आहे. काय काय करता येऊ शकतं त्यावर? मी खास म्हणजे भाकरी आणि भरीत ह्या दोन गोष्टी करता याव्यात म्हणून ही शेगडी विकत घेतली. सोबत कोळशाचा एक भला मोठा पॅक पण आणला. आता घरभर धुर होईल.. मग भारतातच आहोत आपण असा भास होईल. फ़क्त छान जमली पाहिजे भाकरी. जय चुलमाते!
|
Dineshvs
| |
| Monday, May 05, 2008 - 8:26 am: |
| 
|
त्यावर भरतासाठी वांगे भाजता येईल. तुरीची डाळ, राजमा वगैरे शिजवता येईल. बटाटे, कांदे वगैरेही भाजता येतील.
|
Shonoo
| |
| Monday, May 05, 2008 - 11:57 am: |
| 
|
कणसं भाजता येतील. अननसाची साल काढून पाऊण ते एक इंच जाड गोल चकत्या कापुन त्या भाजत येतील. त्या गरम असतानाच त्यावर एक मोठा चमचा भरून व्हनिला आइसक्रीम घालून खायचं. मोठ्या भोपळी मिरच्या काळसर होई पर्यंत भाजता येतील. गार झाल्या की साल काढून त्यावर थोडे मीठ मिरपूड, ऑलिव्ह चे तेल घालून खाता येईल. अस्परगस भाजता येइल. निखार्यावर पापड भाजता येतील. असे भाजल्यावर एखादा थेम्ब खोबरेल तेल घालून खायचे. आता इतकंच पुरे
|
बी, पनीर टिक्का पण करता येइल.
|
बी, कोळशाची शेगडी मिळाली? वा. पण सिंगापूर मध्ये चालते का रे indoor grill ?. एखादे मातीचे भांडे मिळाले ना तर मस्त माशाची आमटी मस्त लागेल चुलीवर slow cooking करोन. no jokes,seriously सांगतेय. नाहीतर सुखा बांगडा भाजून.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|