Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through April 28, 2008

Hitguj » Cuisine and Recipies » Looking For Recipes » Archive through April 28, 2008 « Previous Next »

Bee
Thursday, April 24, 2008 - 6:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खांडवीची कृती आवडली. मला गोड आणि त्यातल्या त्यात गुळाचे पदार्थ प्रचंड आवडतात.

साधे तांदळाचे पिठ चालेल का की रवाच हवा तांदळाचा.

गुळाचे आणखी काही पदार्थ असतील तर लिहा अशी विनंती.


Sneha1
Thursday, April 24, 2008 - 3:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उडदाची डाळ भिजवली,ती खूप जास्त झाली आहे.त्याचे इडली आणि वडे सोडून काय करता येइल?कचोरि केली तर किती दिवस टिकते?

Shonoo
Thursday, April 24, 2008 - 6:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उडदाची डाळ अन राजमा घालून 'मा-राजमा की दाल' करता येईल. गूगल करून सापडतील रेसिपी. तांदूळ भिजवुन वाटून घालून डोसे करता येतील. इडली सारखंच पीठ भिजवुन आप्पम करता येतील.
इडलीचं पीठच नॉन स्टिक तव्यावर जरा सढळ हाताने तेल घालून त्यावर जाडसर ओतायचं( पाऊण इंच जाड तरी ) अन अगदी मंद आचे वर झाकण ठेवून दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घ्यायचं याला 'रोट्टी' म्हणतात. काकवी किंवा मधाबरोबर खायला एकदम मस्त लागतात. पाहिजे तर तव्यावर तेल तापल्यावर चिमूटभर मोहरी, दोन कडिपत्त्याची पानं, एक छोटा सुक्या मिर्चिचा तुकडा कुस्करून टाकायचा अन मग इडलीचं पीठ ओतायचं.

नाहीतर इडलीचं पीठच मैत्रिणीला,शेजारणीला देता येईल :-)


Manuswini
Thursday, April 24, 2008 - 9:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे एकलेय का US मध्ये कढीपत्त्यावर ban आणलय आता सुजाता झाले नी आता हे.
कारण काय तर अचानक US goverment ला ह्या चांगल्या herb चा साक्षात्कार झाला नी हे असे विकणे मंजूर नाही.
परवा मी चक्क छोटेसे पाकीट $2 ला विकत आणले.
काय करणार (मी बाई हौशी अश्या थाटात):-)


Dineshvs
Friday, April 25, 2008 - 2:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भिजवलेल्या उडदाच्या डाळीचे घुटं करता येईल. कृति आहे इथे.
कचोरीचे कोरडे सारण केले तर बरेच दिवस टिकते. ते सारण घालून भरली वांगी, तोंडली वगैरेही करता येतात.


Sneha1
Friday, April 25, 2008 - 3:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद, शोनू आणि दिनेशदा.मी तुम्ही सांगितलेले पदार्थ करून पाहीन.

Prajaktad
Friday, April 25, 2008 - 1:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ईडलिच्या चटणिची रेसिपी देता येइल का कुणाला?


Asami
Friday, April 25, 2008 - 3:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनूस्विनी हि news बरीच जुनी आहे. ban तत्पुरता आहे. तुला हवे असेल तर सरळ घरी झाड लाव.

Swati_rajesh
Friday, April 25, 2008 - 4:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी, गुळाचे पदार्थ आवडत असतील तर, कडबू, सांज्याच्या पोळ्या (गुळ) घालून करता येतात.

Deepant
Friday, April 25, 2008 - 7:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनुस्विनी, तुला कडीपत्ता मिळाला तरी.दुकानात आलाच तरी लगेच संपतो.(असे दुकानदाराचे म्हणणे)
यूएस मधे काही काळासठी ग़व्हाचे पीठ आणी तांदूळ यांच्या कीमती खूप (जवळ जवळ दुप्पट) होणार आहेत.बिगर बासमती तांदुळ कदाचित मिळणार नाही. अशी एक बातमी आहे.
माझ्या मैत्रिणीचे (शेजारणीचे) ग्रोसरी स्टोअर आहे.तिच्याकडुन कळले.


Manuswini
Sunday, April 27, 2008 - 6:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला ना देसी ग्रोसरीत छान हाफ़ूस आंबे मिळाले आज. इथे लिहायचे कारण की ४५ मध्ये १२ आंबे मिळाले. दुसरीकडे कुठे मिळताहेत का?

Prajaktad
Monday, April 28, 2008 - 3:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मने! तुला महाग मिळाले जरा... आमच्याकडे $ ३५ ला आहेत..
ईडलीच्या चटणीची रेसिपी द्या ना कुणी..


Manuswini
Monday, April 28, 2008 - 4:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अग ३५ वाले साधे, नी देवगडवाले ४५(असे दुकनदाराने सागिंतले). मी पेटी उघडून वगैरे बघितली.(म्हणजे दुकानदाराने दीली उघडून बघायला.)
ठीक आहेत. गेल्या वर्षी घरचे आंबे खाल्ले होते. ... असो.

कोणाला नीटशी टीकाउ अंबावडी माहीतीय?

इडलीची चटणी म्हणजे रोजचीच ना?
मी तरी अशी करते,
१ खवलेला खोबरे नाहीतर( frozen grated coconut laxmi brand is good ),
ओली कोथींबीर हवी तेव्ढी,
चवीप्रमाने हिरव्या मिरच्या,
कढेपत्ता,
उडीद डाळ २ चमचे,चणाडाळ २ चमचे(दोन्ही भिजत ठेवून देते १० मिनीटे),
किंचीतसे आले,
एखादी लसूण पाकळी
वरील सगळे वाटून मग मस्त खालील फोडणी द्यावी.
फोडणी: लाल मिरची,उडीद डाळ,चणाडाळ, कढेपत्ता नी राई तडतडून ओतायचे चटणीवर.
मी कढीपत्ता जरासा वाटते देखील,वेगळी चव लागते छान्पैकी. उडीद नको वाटूस पण चण्याची डाळ मात्र खोबर्‍याबरोबर वाट,उडीद फक्त तडक्याला.
authentic हवी असेल तर कोथींबीर,लसूण नी आली टाकू नकोस.
रोज रोज हिरवी चतणी एवजी ही try कर, मुंबईत उडीप्याकडे ह्या दोन चटण्या देतात.
दुसरी एक चटणी:
ओले खोबरे,
चणा डाळ(२ तास भिजवून),
टोमटो puree ,
लाल सुखी मिरची(जरासी कोरडी भाजून घे जमले तर),
किंचीत कोथींबीर,
कढेपट्टा(वाटायला नी फोडणीला सुद्धा),
सगळे वाटून मग त्यावर वरच्या सारखी खमंग फोडणी द्यायची. ह्या फोडणीत उडीद डाळ नी चणाडाळ नाही टाकायची.
मस्त लागते.
Tomato नको असेल तर चिंच टाक. पण मला Tomato आवडतो.
ही तु डोस्याला आत लावायला सुद्धा वापरू शकतेस.
नाहीतर इथे आहे चटणी दुसरी एक
/hitguj/messages/103383/116268.html?1158410634


Prajaktad
Monday, April 28, 2008 - 12:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अग ३५ वाले साधे, नी देवगडवाले ४५(असे दुकनदाराने सागिंतले). >>>आमच्याकडे एकच प्रकारचे आलेत..

Shonoo
Monday, April 28, 2008 - 1:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आमच्या कडे पण एकच आले आहेत ३५ ला बारा. रंग असातसाच आहे अन काही खास सुगंध पण नाही. चव मात्र छान होती. केशर आम्बे ४० ला बारा.

Ashu
Monday, April 28, 2008 - 6:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आमच्याकडे म्हणजे नक्की कुठे कुठे हापुस आम्बे मिळायला लागले?
न्यु जर्सी त मिळत आहेत का?


Prajaktad
Monday, April 28, 2008 - 6:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आमच्याकडे म्हणजे नक्की कुठे कुठे हापुस आम्बे मिळायला लागले?
म्हणजे बॉस्टनला... अजुन आणले नाहीत, आधिचे (साधे बहुधा मेक्सिकन)संपवण चालु आहे.

Asami
Monday, April 28, 2008 - 6:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

म्हणजे बॉस्टनला... अजुन आणले नाहीत, आधिचे (साधे बहुधा मेक्सिकन)संपवण चालु आहे. >> मी तीन प्रकारचे पाहिलेत Burlington मधे. २ देशातून import केलेले हापूस आणी एक south मधली जात आहे. तिसरी standard mexican

Shonoo
Monday, April 28, 2008 - 6:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आमच्या कडे म्हणजे फिलाडेल्फियाच्या सबर्ब मधे. न्यू जर्सी मधे नक्कीच आले असणार.

Shonoo
Monday, April 28, 2008 - 6:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मने प्रीव्ह्यू बघत जा ना गं पोस्ट करायच्या आधी. किती सुद्दलेकन ते? :-)

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators