Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through April 24, 2008

Hitguj » Cuisine and Recipies » Looking For Recipes » Archive through April 24, 2008 « Previous Next »

Dineshvs
Thursday, April 17, 2008 - 2:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भेंडी दो प्याजा आहे वाटते इथे.
दो प्याजा, म्हणजे कांदा दोन प्रकारे घालतात.
एकतर आधी उभा कापून, तळून वाटून घ्यायचा आणि दुसरा परत फ़ोडणीच्या वेळी उभा कापून परतून घ्यायचा.
आता शोधतो आणि नसली तर लिहितो

/hitguj/messages/103383/124234.html?1145198650
वरती एक प्रकार आहे. बटाट्याच्या चिप्स घालुन करायचा. त्यातच वरच्याप्रमाणे आधी तळून वाटून घेतलेला कांदा घालुन करता येईल.
अख्खे पांढरे कांदे सोलून, भेंडी बरोबर परतून घेता येतील. हवे तर त्याचे उभे चार तुकडे करायचे, किंवा भरल्या वांग्याप्रमाणे चिरा द्यायच्या, आणि तेलात परतायचे.


Deepant
Thursday, April 17, 2008 - 6:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

थॅंक्यू मनुस्विनी,मी देखील यूएस ला आहे. इथे लाल विटा कुठे मिळतील? विटा नसतील तर दुसरा काहि पर्याय आहे क? प्लीज सुचवाल का?
मेथी पण धण्यासारखी पेरायची का?
साॅरी इतके प्रश्न विचारतेय पण माझा हा पहिलाच प्रयत्न आहे.मला बागकामाची जास्त माहिती नाही.


Pratika
Thursday, April 17, 2008 - 6:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मधे एका हॉटेल मधे चिकन अकबरी म्हणून पदार्थ खाल्ला. क्रिमी आणि किन्चित गोडसर आणि तिखट ग्रेव्ही मधे चिकन चे तुकडे, ड्राय फ़्रुट्स काजू बेदाणे होते. फ़ारच मस्त लागत होते. कोणाला माहिती आहे काय कसे करायचे ते

Tonaga
Friday, April 18, 2008 - 2:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दो प्याजा हा प्रकार अकबराच्या दरबारातील मुल्ला दोप्याजा याने शोधून काढला.तो दरबारातील नवरत्नापैकी एक होता....

Mrinmayee
Friday, April 18, 2008 - 2:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मने, धने पेरण्याआधी चेचून घेतेस का? की कोथिंबीर तशीच उगवली?

टोणग्या, अशी माहिती चारचौघात सांगु नये. आता किती लोकांना 'दोप्याजा' प्रकार खाणं बंद करावं लागेल ह्याची कल्पना आहे का?


Manuswini
Friday, April 18, 2008 - 5:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जराशी धणे ओले केले नी हातानेच चिरळून पेरले. येते आपोआप.

कोणीतरी विटा कुठे मिळतात विचारले, मिळतात ना. एकदम विटा अश्या नसतात पण लाल दगड असे. ते lowes मध्ये एखाद्या spanish ला सांगायचे किंवा home depot सुद्धा मिळेल.

जरा आणखी चांगले हवेच असेल तर कुठल्यातरी महगड्या nursery मध्ये जावून buy करायचे :-)


Vrushs
Friday, April 18, 2008 - 8:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी जितकं शोधता येईल तितकं शोधण्याचा प्रयत्न केला पण कांदा-खोबरं वाटण काही सापडलं नाही.कोणी प्रमाण सांगू शकेल काय?

Manuswini
Friday, April 18, 2008 - 8:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी मालवणी का तिखट कोंबडीत लिहिले आहे बघ.(मलाच लक्षात नाही)
ही घे,
/hitguj/messages/103383/93122.html?1180126014

Deepant
Friday, April 18, 2008 - 9:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

थंक्स मनुस्विनी,मला होम डेपो जवळ आहे. आता कोथिंबीर लावायचा प्रयोग करुन बघतेच.

Vrushs
Saturday, April 19, 2008 - 12:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्स मनुस्विनी. आता करून ठेवते.ग्रील नाही आहे त्यामुळे तेलावरच परतून घ्यावे लागेल.

Ami79
Monday, April 21, 2008 - 4:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रस्सम ची पावडर घरी बनवता येते का? त्या ऐवजी सांबर मसाला पावडर चालेल का?

आणखी एक. आमचे हे साधा रवा आणण्या ऐवजी इडली रवा घेऊन आले. :-)
त्याचे झट्पट असे काय बनवता येईल? माझ्या कडे इडली पात्र नाही


Swati_rajesh
Monday, April 21, 2008 - 8:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Ami,
कुकर मधे चाळण ठेऊन त्यात वाट्या ठेऊन इडली करू शकतेस

Ami79
Monday, April 21, 2008 - 10:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एवढी मोठी चाळण नाही गं माझ्याकडे :-)

उपमा करता येतो का त्याचा?


Swati_rajesh
Monday, April 21, 2008 - 2:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खांडवी (हा एक कोकणातील खाद्यप्रकार आहे.)
साहित्यः
२ वाट्या तांदळाचा रवा (इडली साठी आपण विकत आणतो तो रवा घ्यावा)
२ वाट्या भरून गुळ
४ वाट्या पाणी
१/४ टी.स्पून मीठ
१ टे.स्पून तेल
१/२ टी.स्पून वेलची पूड
१/२ वाटी ओल्या नारळाचा चव
१ मोठा तुकडा आलं किसून
२ टी.स्पून साजुक तूप ताटाला लावून घ्यावे.

१.प्रथम तांदळाचा रवा भाजून घ्यावा. तो गार होऊ द्यावा.
२.पातेल्यात पाणी घेऊन ते गॅसवर ठेवावे. ते चांगले गरम झाले की त्यात मीठ, तेल, गूळ्,आल्याचा कीस, थोडा नारळाचा चव घालुन चमच्याने ढवळावे
३.गॅस बारीक करून त्यात भाजलेला तांदळाचा रवा घालून चांगले ढवळावे व वर झाकण ठेऊन मंद गॅसवर शिजू द्यावे.
४.दोन-तीन वाफा येऊ द्याव्यात, म्हणजे झाकण काढून मधूनच ढवळावे.
५.शिजून घट्टसर गोळा झाला कि तूप लावलेल्या ताटात तो गोळा सारखा पातळसे थापून घ्यावा व वरती उरलेले खोबरे घालून हाताने दाबावे.
६.गार झाले की सुरीने वड्याकापून ट्रे मधे सजवून ठेवाव्यात व वाढतात खांडवी वर साजूक तूप वाढावे.

करायला अगदी सोपे आणि कोणी पाहूणे येणार असतील तर आधी करून ठेवता येते.


Manuswini
Monday, April 21, 2008 - 5:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ह्याला आम्ही टोपसांजा(गोव्यात) म्हणतो, मातीच्या भांड्यात झकास लागतो. तोही चुलीवर. आजी तो टोप उपडा पाडून त्याच्या चौकोनी तुकडे पाडायची म्हैसूर पाकासारखे. कुठेतरी लिहिला आहे मी वाटते. ह्या मध्ये तांदूळ सुवासीक वासाचा घ्यायचा नी धूवून जरासा वाळवून घेवून जाडा रवा करायचा नी तूपात परतायचा.यम्मी

Dineshvs
Tuesday, April 22, 2008 - 2:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कलिंगडाच्या आत जो पांढरा भाग असतो, तो किसून या पदार्थात घालायची पद्धत आहे. त्याचा एक छान वेगळा स्वाद येतो. पुर्वी कलिंगडात हा पांढरा भाग बराच जाड असे, तो वाया न घालवता, सार्थकि लागत असे.

Dineshvs
Tuesday, April 22, 2008 - 2:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अमि, रसम पावडर इथे मसाल्याच्या बीबीवर असायला हवी. त्याच्या जागी सांबार पावडर वापरता येते, पण कमी वापरावी.

Ami79
Tuesday, April 22, 2008 - 8:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

/hitguj/messages/103383/117911.html?1161014509
या लिंक वर रस्सम कसे बनवावे ते दिले आहे. पण तयार पावडर वापरायला सांगितली आहे

Anjut
Tuesday, April 22, 2008 - 11:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रसम पावडर बनवायची कृती
४ टेबलस्पून धणे,६ लाल मिरच्या,१०-१२ मिरी दाणे,२ टे.स्पू. तूर डाळ,१ टी स्पून चणा डाळ,१ टेबल स्पून जिरे,१५-२० कढीपत्याची पाने,१०-१२ मेथी दाणे. हे सर्व वेगवेगळे कोरडेच भाजून घ्यायचे.मग जरा थंड झाल्यावर मिक्सर मधून पूड करून घ्यावी. नंतर १ चिमूट हळद घालवी.
ही पावडर साधारण २-३ ग्लास रसम साठी ३ टेबल स्पून लागते. अधिक मसालेदार रसम साठी वरून जास्त मिरी पूड घालावी व लाल मिरच्यांचे प्रमाण वाढवावे.


Wel123
Thursday, April 24, 2008 - 4:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

koni egg biryani chi recipe deil ka...ithe mala bhetat nahi aahe

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators