|
Dineshvs
| |
| Thursday, April 17, 2008 - 2:58 am: |
| 
|
भेंडी दो प्याजा आहे वाटते इथे. दो प्याजा, म्हणजे कांदा दोन प्रकारे घालतात. एकतर आधी उभा कापून, तळून वाटून घ्यायचा आणि दुसरा परत फ़ोडणीच्या वेळी उभा कापून परतून घ्यायचा. आता शोधतो आणि नसली तर लिहितो /hitguj/messages/103383/124234.html?1145198650 वरती एक प्रकार आहे. बटाट्याच्या चिप्स घालुन करायचा. त्यातच वरच्याप्रमाणे आधी तळून वाटून घेतलेला कांदा घालुन करता येईल. अख्खे पांढरे कांदे सोलून, भेंडी बरोबर परतून घेता येतील. हवे तर त्याचे उभे चार तुकडे करायचे, किंवा भरल्या वांग्याप्रमाणे चिरा द्यायच्या, आणि तेलात परतायचे.
|
Deepant
| |
| Thursday, April 17, 2008 - 6:08 pm: |
| 
|
थॅंक्यू मनुस्विनी,मी देखील यूएस ला आहे. इथे लाल विटा कुठे मिळतील? विटा नसतील तर दुसरा काहि पर्याय आहे क? प्लीज सुचवाल का? मेथी पण धण्यासारखी पेरायची का? साॅरी इतके प्रश्न विचारतेय पण माझा हा पहिलाच प्रयत्न आहे.मला बागकामाची जास्त माहिती नाही.
|
Pratika
| |
| Thursday, April 17, 2008 - 6:42 pm: |
| 
|
मधे एका हॉटेल मधे चिकन अकबरी म्हणून पदार्थ खाल्ला. क्रिमी आणि किन्चित गोडसर आणि तिखट ग्रेव्ही मधे चिकन चे तुकडे, ड्राय फ़्रुट्स काजू बेदाणे होते. फ़ारच मस्त लागत होते. कोणाला माहिती आहे काय कसे करायचे ते
|
Tonaga
| |
| Friday, April 18, 2008 - 2:07 am: |
| 
|
दो प्याजा हा प्रकार अकबराच्या दरबारातील मुल्ला दोप्याजा याने शोधून काढला.तो दरबारातील नवरत्नापैकी एक होता....
|
मने, धने पेरण्याआधी चेचून घेतेस का? की कोथिंबीर तशीच उगवली? टोणग्या, अशी माहिती चारचौघात सांगु नये. आता किती लोकांना 'दोप्याजा' प्रकार खाणं बंद करावं लागेल ह्याची कल्पना आहे का?
|
जराशी धणे ओले केले नी हातानेच चिरळून पेरले. येते आपोआप. कोणीतरी विटा कुठे मिळतात विचारले, मिळतात ना. एकदम विटा अश्या नसतात पण लाल दगड असे. ते lowes मध्ये एखाद्या spanish ला सांगायचे किंवा home depot सुद्धा मिळेल. जरा आणखी चांगले हवेच असेल तर कुठल्यातरी महगड्या nursery मध्ये जावून buy करायचे
|
Vrushs
| |
| Friday, April 18, 2008 - 8:42 pm: |
| 
|
मी जितकं शोधता येईल तितकं शोधण्याचा प्रयत्न केला पण कांदा-खोबरं वाटण काही सापडलं नाही.कोणी प्रमाण सांगू शकेल काय?
|
मी मालवणी का तिखट कोंबडीत लिहिले आहे बघ.(मलाच लक्षात नाही) ही घे, /hitguj/messages/103383/93122.html?1180126014
|
Deepant
| |
| Friday, April 18, 2008 - 9:20 pm: |
| 
|
थंक्स मनुस्विनी,मला होम डेपो जवळ आहे. आता कोथिंबीर लावायचा प्रयोग करुन बघतेच.
|
Vrushs
| |
| Saturday, April 19, 2008 - 12:22 pm: |
| 
|
धन्स मनुस्विनी. आता करून ठेवते.ग्रील नाही आहे त्यामुळे तेलावरच परतून घ्यावे लागेल.
|
Ami79
| |
| Monday, April 21, 2008 - 4:38 am: |
| 
|
रस्सम ची पावडर घरी बनवता येते का? त्या ऐवजी सांबर मसाला पावडर चालेल का? आणखी एक. आमचे हे साधा रवा आणण्या ऐवजी इडली रवा घेऊन आले. त्याचे झट्पट असे काय बनवता येईल? माझ्या कडे इडली पात्र नाही
|
Ami, कुकर मधे चाळण ठेऊन त्यात वाट्या ठेऊन इडली करू शकतेस
|
Ami79
| |
| Monday, April 21, 2008 - 10:28 am: |
| 
|
एवढी मोठी चाळण नाही गं माझ्याकडे उपमा करता येतो का त्याचा?
|
खांडवी (हा एक कोकणातील खाद्यप्रकार आहे.) साहित्यः २ वाट्या तांदळाचा रवा (इडली साठी आपण विकत आणतो तो रवा घ्यावा) २ वाट्या भरून गुळ ४ वाट्या पाणी १/४ टी.स्पून मीठ १ टे.स्पून तेल १/२ टी.स्पून वेलची पूड १/२ वाटी ओल्या नारळाचा चव १ मोठा तुकडा आलं किसून २ टी.स्पून साजुक तूप ताटाला लावून घ्यावे. १.प्रथम तांदळाचा रवा भाजून घ्यावा. तो गार होऊ द्यावा. २.पातेल्यात पाणी घेऊन ते गॅसवर ठेवावे. ते चांगले गरम झाले की त्यात मीठ, तेल, गूळ्,आल्याचा कीस, थोडा नारळाचा चव घालुन चमच्याने ढवळावे ३.गॅस बारीक करून त्यात भाजलेला तांदळाचा रवा घालून चांगले ढवळावे व वर झाकण ठेऊन मंद गॅसवर शिजू द्यावे. ४.दोन-तीन वाफा येऊ द्याव्यात, म्हणजे झाकण काढून मधूनच ढवळावे. ५.शिजून घट्टसर गोळा झाला कि तूप लावलेल्या ताटात तो गोळा सारखा पातळसे थापून घ्यावा व वरती उरलेले खोबरे घालून हाताने दाबावे. ६.गार झाले की सुरीने वड्याकापून ट्रे मधे सजवून ठेवाव्यात व वाढतात खांडवी वर साजूक तूप वाढावे. करायला अगदी सोपे आणि कोणी पाहूणे येणार असतील तर आधी करून ठेवता येते.
|
ह्याला आम्ही टोपसांजा(गोव्यात) म्हणतो, मातीच्या भांड्यात झकास लागतो. तोही चुलीवर. आजी तो टोप उपडा पाडून त्याच्या चौकोनी तुकडे पाडायची म्हैसूर पाकासारखे. कुठेतरी लिहिला आहे मी वाटते. ह्या मध्ये तांदूळ सुवासीक वासाचा घ्यायचा नी धूवून जरासा वाळवून घेवून जाडा रवा करायचा नी तूपात परतायचा.यम्मी
|
Dineshvs
| |
| Tuesday, April 22, 2008 - 2:53 am: |
| 
|
कलिंगडाच्या आत जो पांढरा भाग असतो, तो किसून या पदार्थात घालायची पद्धत आहे. त्याचा एक छान वेगळा स्वाद येतो. पुर्वी कलिंगडात हा पांढरा भाग बराच जाड असे, तो वाया न घालवता, सार्थकि लागत असे.
|
Dineshvs
| |
| Tuesday, April 22, 2008 - 2:58 am: |
| 
|
अमि, रसम पावडर इथे मसाल्याच्या बीबीवर असायला हवी. त्याच्या जागी सांबार पावडर वापरता येते, पण कमी वापरावी.
|
Ami79
| |
| Tuesday, April 22, 2008 - 8:31 am: |
| 
|
/hitguj/messages/103383/117911.html?1161014509 या लिंक वर रस्सम कसे बनवावे ते दिले आहे. पण तयार पावडर वापरायला सांगितली आहे
|
Anjut
| |
| Tuesday, April 22, 2008 - 11:43 am: |
| 
|
रसम पावडर बनवायची कृती ४ टेबलस्पून धणे,६ लाल मिरच्या,१०-१२ मिरी दाणे,२ टे.स्पू. तूर डाळ,१ टी स्पून चणा डाळ,१ टेबल स्पून जिरे,१५-२० कढीपत्याची पाने,१०-१२ मेथी दाणे. हे सर्व वेगवेगळे कोरडेच भाजून घ्यायचे.मग जरा थंड झाल्यावर मिक्सर मधून पूड करून घ्यावी. नंतर १ चिमूट हळद घालवी. ही पावडर साधारण २-३ ग्लास रसम साठी ३ टेबल स्पून लागते. अधिक मसालेदार रसम साठी वरून जास्त मिरी पूड घालावी व लाल मिरच्यांचे प्रमाण वाढवावे.
|
Wel123
| |
| Thursday, April 24, 2008 - 4:54 am: |
| 
|
koni egg biryani chi recipe deil ka...ithe mala bhetat nahi aahe
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|