Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through April 23, 2008

Hitguj » Cuisine and Recipies » झटपट पाककृती » डब्यात नेता येइल असे झटपट आणि पौष्टिक » Archive through April 23, 2008 « Previous Next »

Ruchita
Wednesday, May 24, 2006 - 9:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुडी तु सान्गितलास तसाच काहिसा पदार्थ मी मुलांना टिफ़िन साठी करते. सकाळची धावपळ लक्शात घेता मी रात्रीच पोळ्या करुन ठेवते आणि सकाळी कुठली हि पटकन होणारि भाजी (शक्यतो सुकी) करुन त्या चपातिचे अर्धे भाग करुन त्यात भरते आनि ते टोस्टर मध्ये घालुन त्याचे टोस्ट सैन्डवीच करुन सौस बरोबर देते. ( टोस्ट फ़ोइल मध्ये ठेवल्यास क्रिस्पिच रहातात) मुलाना भाजी-चपाती ऐवजी हे जास्त आवड्ते

Dineshvs
Wednesday, May 24, 2006 - 3:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

साप्ताहिक सकाळ मधे वाचलेली कृति.
शिळ्या चपातीचे तुकडे करावे. एका पिकलेल्या केळ्याच्या चकत्या कराव्यात.
तुप तापवुन आधी केळी आणि मग चपातीचे तुकडे घालावेत. जरा परतुन साखर घालावी. प्रखर आचेवर परतत रहावे. साखरेचे कॅरॅमल होवुन चपाती आणि केळ्याला कोट होते. मग वेलची पुड घालायची. आज करुन बघितला. चांगला झाला हा प्रकार. केळ्याच्या जागी दुसरेहि फ़ळ वापरता येईल.


Ruchita
Thursday, May 25, 2006 - 5:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश तुमच्या साहित्याप्रमाणेच पाकक्रुती पण फ़ार खमंग आणि चविश्ट असतात. मी सकाळिच हा पदार्थ करुन पाहिला, पण वेलची केळे वापरुन, मस्तच झाला होता.धन्यवाद

Preesago
Friday, July 21, 2006 - 6:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला थन्डि साठी पौष्टिक आहार कोणी सान्गेल का?

Vidyasawant
Saturday, July 22, 2006 - 7:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

methiche ladoooo, thandisathicha uttam ani paushtic suddha. dinkache ladoo, mugache kadhan, garam garam soups, ani gul asalele padarth.

Vidya_joshi
Thursday, January 04, 2007 - 7:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पोळिचे दोन हाफ़ तुकडे करुन त्यात कोबिची भाजी, बरिक कांदा, साॅस घालून सामोश्यासारखि घडि घालून बटर वर भाजावे. मुलं खुश!!!!!!

Vidya_joshi
Wednesday, January 24, 2007 - 4:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश तुमची केळ पोळीची रेसीपी करुन पाहीली. एकदम मस्त.

Manuswini
Wednesday, January 24, 2007 - 7:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अगदी healthy म्हणजे गंबो.
नाहीतरी आपण सर्व भाज्या कापुन, धुवुन ठेवतोच weekend ला.

मी असा करते, फक्त साहित्य जमवाजमवी करायला वेळ लागेल पण एकदा पातेल्यात घालुन स्लो कूक करत बाहेर movie बघायचा.

गंबो( veggei and chicken, shrimp gumbo )

भेंडी धुवुन गोल कापलेली,
काबुली चणे( canned one ), मी असे can आणुन ठेवते,
रेड बीन्स can ,
fresh corns किंवा frozen corns ,
chicken long pieces,shrimp frozen cleaned and deveined,
chicken hot dogs or turkey hot dogs grill it or bake in oven in olive oil or skrewer ,
frozen mixed veg ,
लांब कांदा कापलेला,
टॉमटो कापलेला,
टॉमटो puree ,
olive oil
भिजत ठेवुन जरासे उकळवलेले मसुर,
italian seasoning,green onions, lemon pepper salt ,

टोपात ऑलीव तेल टाकुन कांद अपरतुन tomato puree टाकुन, लसुन(हवी असल्यास), वरील सर्व टाकावे, नी अर्धा तास भर छान शिजु द्यावे.
चणा, बीन्स वगैरे canned मध्ये बर्‍यापैकी शिजलेले असतात.

थंडीच्या दिवसात one pot meal होते.
हवे असेल तर avacodo mashed करुन corn tortilla वर olive oil spray करुन त्यावर पालक, avacodo , नी three cheez mix टाकुन oven मध्ये १० मिनीटे बेक करुन गंबो बरोबर खायचे.

गंबो दुसर्‍यादिवशी सुद्धा छान लागतो डब्यात.


Prady
Wednesday, January 24, 2007 - 2:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनू भेंडीमुळे चिकटपणा नाही का गं येत.

Manuswini
Wednesday, January 24, 2007 - 6:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नाहे येत तेव्हढा चिकटपणा. actually भेंडी टाकुनच गंबो करायची tradition आहे.
tomato रस नी lemon pepper salt असते ना

मी वरील कृतीत low sodium chicken stock or vegetable stock टाकयचे सांगायला विसरले.

मी हा गंबो रात्री करते नी सकाळी डब्यात घेवुन जाते. complete meal आहे.


Aasavari
Wednesday, September 19, 2007 - 10:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

hich recp veg nahi ka hovu shaat?

Manuswini
Wednesday, September 19, 2007 - 5:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

का नाही होवु शकत. तुला हवे असेल तर नको टाकुस non-veg :-)

मसूर, benas आहेत ना.........


Aasavari
Thursday, September 20, 2007 - 7:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला अजुन रेसिपिज सान्गा.लवकर होतिल अशा.

Manuswini
Thursday, September 20, 2007 - 5:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तु uS ला असतेस?
कारण इथे grilled readymade chicken मिळते,
ती अक्खी कोंबडी माझ्याच्याने संपवत नाही. दुसर्‍या दिवशी तो सुखा रब्बर मी खाऊ शकत नाही. आधीच grill असल्याने ओलसर पण कमी असते. इतकी dry होते.
मी सरळ तुकडे करून त्याच दिवशी उरलेली chicken chilli बनवते.
एकदम authentic style ने नाही. पण दुसर्‍या दिवशी बरी वाटते खायला.
कांदा जाडसर कापायचा,
तीन रंगी bell pepper (सुरेख दिसतो तो तीन रंगी रंग भाज्यात) काप कसा पण,
लसूण बारीक कर,
ओला पाती कांदा,
सुखे शिताकी मशरूम आधी वाफ़वून घे,
वाफ़वलेली brocoli ,
कांदा oliv oil मध्ये परत मग वरील भाज्या Stir कर लसूणाबओर्बर.
थोडाशी आपली लाल मिर्च पॉवडर, मिर्ची मसाला tomato ketchup (नविन आलेय बाजारात). ते टाक. जराशी धणा,जीरा पॉवडर टाक. झाले.

झाली खाणेबल कोंबडी. दुसर्‍या दिवशी हे नुसते protein खा :-).


Akhi
Thursday, October 18, 2007 - 11:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पराठे:
कणीक, तेल, मीठ
सारण्: पत्ता कोबी किसलेला
बडीशोप, आलं लसुण मिरची पेस्ट, चण्याचे पीठ, हिन्ग, कोथिम्बीर

कणके मधे तेल आणि मीठ घालुन थोड सैल भिजवावे फार सैल प्ण नको.

१ चमचा तेला मधे बडीशोप, हिन्ग आणि आलं लसुण मिरची पेस्ट टाकावी. मग त्यात कोबी टाकवा. मीठ घालुन परतावे. आनी मग कोबि शिजल्यावर पाणी सुटेल. मग त्यात मावेल तितके चण्य पीठ टाकावे. पीठ आधी भाजलेले असेल तर उत्तम. ह्या सारणाचे गोले करुन ते कणकेत भरावे. व पुरणपोळी सारखे लाटुन तेलावर परतुन घेणे.
गरम गरम पराठा आणी जोडीला दही आनि १ फळ.
पुरी च्या आकारचे परठे केले तर ते कचोरी सारखे दिसतत आणी लहान मुले आवडीने खातात.


Princess
Wednesday, April 23, 2008 - 9:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इथे अजुन पदार्थ लिहा ना. दिनेशदा, मूडी आणि मृण यांना स्पेशल रिक्वेस्ट.
नवरा सकाळी ६.३० लाच घर सोडतो आणि रात्री ११ला परत येतो. सकाळचा नाष्टा, दुपारचे जेवण आणि रात्री साठी थोडे लाईट जेवण द्यावे लागते. कोणी मला झटपट आणि पौष्टिक अस पदार्थ सुचवाल का? मी सध्या त्याला एकच डब्बा देते दुअपारच्या जेवणाचा. (सिंगापुरमध्ये घरुन जेवण न नेणार्‍याचे हाल इथल्या भारतीयांनाच माहिती :-( )


Mrinmayee
Wednesday, April 23, 2008 - 1:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लाजवलंस गं ऽऽ मुली तु!
काही पदार्थ नक्की सुचवु शकते.

*******झटपट बिसि बेळे भात. (हा पदार्थ म्हणजे one dish meal )
१ वाटी तांदुळ आणि पाउण वाटी तूरडाळ कुकरमधे शिजत ठेवायची. शिजतानाच त्यात सिमला मिरची, मटर, फुलकोबीचे तुकडे, गाजर ह्या भाज्या पण घालायच्या.
कुकरच्या दोन शिट्ट्यांमधे सगळं व्यवस्थीत शिजतं.
एका भांड्यात तेल गरम करून त्यात लाल मिरची, हिंग, मोहरी, उडिद डाळ, कढी लिंब घालायचा. ह्याच फोडणीत गॅस बंद करून मोठा चमचाभर तयार बिसि बेळे भात मसाला किंवा सरळ सांबार मसाला, एक चमचा चिंच कोळ आणि एक छोटं ढेकूळ गुळाचं घालायचं. मीठ घालून नीट एकत्र करायचं. ही फोडणी कुकरमधल्या भात्-डाळ्-भाज्या मिश्रणात ओतून भरपूर ढवळायचं. किंचीत पाणी घालून घट्ट पिठल्याच्या कन्सिस्टन्सीला आणायचं. वरून साजुक तुप घालून पापड किंवा चिप्स बरोबर खायचं.
येव्हडा भात २-३दा पोटभर खायला एका माणसाला पुरतो.

******वेगवेगळ्या थालीपीठांचे गोळे भिजवून ठेवता येतात. (काकडी, कांदा, भाजणी, लाल भोपळा, मिश्र भाज्या..) डब्यात दह्याबरोबर खायला बरी पडतात.

******थालिपिठांप्रमाणेच पराठे, धिरडी, दोसे पण करता येतील.

******ब्रोकन व्हीट्चा भाज्या घालून उपमा

******तांदळाचं पीठ नारळाच्या दुधात भिजवून त्यात यीस्ट घालायचं. तासाभरात पीठ फुगून आलं की त्याचे छोटे, एका पळीचे दोसे (धिरडी) लावायचे. तव्यावर धिरडं गरम असतानाच परतलेल्या भाज्या (मश्रुम, ब्रॉकोली, कांदा, सिमला मिरची वगैरे) घालून सेट होऊ द्यायचं. कोरड्या चटणीशी खायला छान लागतं.

**** मधल्या वेळी खायला सँडविचेस, दडपे पोहे, परतलेली खमंग डाळ (गणपतीच्या प्रसादासारखी), भणंग, कोरडी भेळ, ढोकळे वगैरे देता येतील.

आता आवरतं घेते. :-)


Shonoo
Wednesday, April 23, 2008 - 2:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मृ
तांदळाचं पीठ,नारळाचं पाणी अन यीस्ट्चं प्रमाण सांग ना? Active Dry Yeast मिळतं तेच ना?


Princess
Wednesday, April 23, 2008 - 3:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मृ... कित्ती ग गोड आहेस तू. लगेच उत्तर दिलस त्याबद्दल खुप आभार. शोनुचाच प्रश्न रिपीट :-) आणि शिवाय त्यावर घालायच्या भाज्या आधी परतुन घ्यायच्यात त्या कश्या-तेलावर का की नुसत्याच?
माझा इथला मेसेज पाहताक्षणी मला मेसेंजरवर मदत करणार्‍या श्र आणि प्राचीचे सुद्धा आभार.


Mrinmayee
Wednesday, April 23, 2008 - 7:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शोनु, प्रिन्सेस, प्रमाण असं काही नाही. मी वाटीभर पीठात धिरडी लावण्याची कन्सिस्टंसी येईपर्यंत डब्यातलं नारळाचं दूध घालते. येव्हड्या मिश्रणाला पावापेक्षाही जरा कमीच, साधारण १ / ८ चमचा (चहाचा) बेकर्स यीस्ट (कोरडं) वापरते. किंचित कोमट पाण्यात चिमुटभर साखर घालून त्यात यीस्ट मिसळून २-३ मिनिटं तसंच ठेवायचं. नंतर तांदळाच्या मिश्रणात कालवायचं.घट्ट डब्यात बंद करून तासभर ठेवायचं.
हव्या त्या भाज्या तेलात परतायच्या. कांदा, लाल हिरवी सिमला मिरची, कोथिंबीर, मश्रुम ब्रॉकोली, पालक सगळं तेलात खमंग परतलं की छान लागतं. परततानाच भाज्यांमधे मीठ, मिरपुड किंवा तिखट, हिरव्या मिरचीचे तुकडे हे पण घालता येतं. पेशन्स असेल तर सगळ्या भाज्या वेगवेगळ्या परताव्यात. नाही तर मश्रुम आणि पालक तरी वेगळे परतायला हवे. तेही जमत नसल्यास भाज्या सरळ ब्रॉइल करून घेतल्या तरी चांगल्या लागतात. (पूर्ण कोरड्या होणं महत्वाचं.)
तव्यावर मिश्रण ओतल्यावर फुगायला लागतं. तेव्हाच भाज्या घालून २-३ मिनिटं झाकण ठेवावं. धिरड्याला शिजायला जास्त वेळ लागत नाही. नॉन्स्टिकवर करत असाल तर अर्थातच तेल अगदी कमी.धिरडं उलटावं लागत नाही.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators