|
Nkashi
| |
| Wednesday, January 16, 2008 - 6:29 am: |
| 
|
ठिक आहे मी try करुन बघते.... ठान्कु प्राजक्ता....
|
Mrinmayee
| |
| Wednesday, January 16, 2008 - 4:32 pm: |
| 
|
Nkashi , मलती कारवारकरांच्या 'वंशवेल' मधे खालीलप्रमाणे लिहिलंय: तीसर्या महिन्यापासुन वरचं दूध देताना दूध २ : पाणी १ असं प्रमाण असावं. हे प्रमाण नंतर ३:१ आणि पाचव्या महिन्यात ४:१ असं हवं. सातव्या महिन्यात वरचं दूध पाणी न घालता द्यावं. पण तुझ्या बाळाला सवय नाही. तेव्हा आधी जरासं डायल्युट करून मग पचंत असेल तर पूर्ण दूध द्यायला हरकत नाही. सातव्या महिन्यात मऊ भात, वरण, भाज्यांचा रस, मऊ भाक्या कुस्करून देता येतात. भाकरी किंवा पोळीतला मऊ भाग दुधात कुस्करून देता येतो. (वंशवेल)
|
Prajaktad
| |
| Wednesday, January 16, 2008 - 6:44 pm: |
| 
|
हो!पण दुधात मिसळायचे पाणी उकळुन गाळुन घेतलेले असावे..
|
Dineshvs
| |
| Thursday, January 17, 2008 - 3:03 am: |
| 
|
मी आधी लिहिले असेन तरी परत एकदा आठवण करुन देतो. बाळासाठी आईचेच दूध सर्वोत्तम असते. ते निर्जंतुक असते, योग्य त्या तपमानाला असते, त्यात मानवी बाळासाठी हवे ते अन्नघटक योग्य त्या प्रमाणात असतात, ते हवे त्या वेळी उपलब्ध असते आणि ते साठवुनही ठेवता येते. ते दिल्यास बाळाला पाणी द्यायचीही गरज नसते. ते उपलब्ध नसल्यासच, बाकिच्या दूधाचा विचार करावा.
|
Nkashi
| |
| Thursday, January 24, 2008 - 9:10 am: |
| 
|
ओह, प्राजक्ताच्या पोस्टनंतर बाकीच्यांच्या पोस्ट आजच बघत आहे. दिनेशदा / इतर जाणकार लोकहो, मी परवाच नाचणी सत्व घरी बनवण्याचा प्रयत्न केला but somehow तो साका अजुनही पुर्ण सुकला नाही आणि मह्त्वाच म्हणजे त्याला कसलासा वास येत आहे. I mean आपण गव्हाच्या कुरडया करताना जसा वास येतो (गहु आंबल्याचा) तसा वास येत आहे. माझे preparation काही चुकले का? actually ती नाचणी २ दिवस पाण्यात होती. मला वेळ नाही मिळाला immediate वाटायला...
|
Dineshvs
| |
| Friday, January 25, 2008 - 8:01 am: |
| 
|
नक्षी, तो साका उन्हात किंवा फ़्रीजमधे ठेवला तरच सुकतो. बाहेर तो आंबत जाणार. तसे नाचणी आंबवुनदेखील आंबिल सारखे पदार्थ करतात. बुरशी वगैरे नसेल तर खायला हरकत नाही.
|
Nkashi
| |
| Friday, January 25, 2008 - 8:40 am: |
| 
|
ठिक आहे मी घरी गेले कि चेक करते त्याचा आंबुस वास बघुन मी अजुन तरी त्याचे काही केले नाही धन्यवाद दिनेशदा....
|
Dhanu66
| |
| Saturday, February 09, 2008 - 8:57 am: |
| 
|
नाचणिची आंबिल कशी करतात?
|
Savani
| |
| Saturday, February 09, 2008 - 2:10 pm: |
| 
|
धनु, इथे आहे बघ. /hitguj/messages/103383/59982.html?1086068476
|
Nkashi
| |
| Thursday, March 27, 2008 - 9:55 am: |
| 
|
जाणकारांनो, मदत करा......... माझी मुलगी दुध पिताना खुप त्रास देते.... तिला दुधात कुठले फ़्लेवर टाकुन ( add )दिले तर चालेल का? ती आता साडे नऊ महिन्याची झाली आहे
|
Dineshvs
| |
| Thursday, March 27, 2008 - 11:45 am: |
| 
|
साडेनऊ महिन्याची म्हणजे इथले बाकिचे पदार्थ खाऊ शकेल. कृत्रिम फ़्लेव्हर टाकण्या ऐवजी, वेलची, केशर, जायफळ, कोको वापरुन बघता येईल. सर्दीचा त्रास नसेल तर दहि आणि योगहर्ट देखील चालेल. या बीबी वर बरेच पर्याय आहेत. अर्थात मातेच्या दूधाला पर्याय नाही.
|
Nkashi
| |
| Thursday, March 27, 2008 - 12:23 pm: |
| 
|
हो दिनेशदा, तिला तसं वरच खाण चालू केले आहे पण दुध must आहेच ना... कल्शियम साठी. तिला अजुन दात आलेले नाहित त्यामुळे बराच problem होतो. बाकी दुधात केशर, जायफ़ळ नाही टाकू शकत कारण तिची मूळ प्रकृती उष्ण आहे. केशर गरम पडेल, जायफ़ळाने शी आणखी घट्ट होईल काय करु....
|
Dineshvs
| |
| Thursday, March 27, 2008 - 12:54 pm: |
| 
|
कॅल्शियमसाठी रागी उत्तम. दूधातून तिला आवडेल ते कुठलेही सरबत दिले तरी चालेल. पण रोज एकच नको, त्याने मुले कंटाळतात.
|
Nkashi
| |
| Friday, March 28, 2008 - 11:02 am: |
| 
|
सरबतात / फ़्लेवर मध्ये preservatives असतील ना? ते इतक्या लहान बाळाला चालेल का? काहीच सुचत नाही.... पण तुम्ही सांगितल्याप्रमाणे रागी ट्राय करते
|
Dineshvs
| |
| Friday, March 28, 2008 - 11:40 am: |
| 
|
अलिकडे नैसर्गिक असे ज्युसेस फ़ारच कमी मिळतात. मान्यताप्राप्त प्रिझरव्हेटिव्ह्ज तसे आरोग्याला धोकादायक नसतात.
|
Maitri
| |
| Thursday, April 17, 2008 - 4:39 am: |
| 
|
माझ बाळ ५ महिन्याच आहे. त्याला आत्ता राईस सिरियल चालु केले आहेत. आणि गर्बर च गाजर १स्टेज देतीय. घरगुती पदार्थ सान्गेल का कोणी? त्याची क्रूती पण सान्गा. धन्यवाद.
|
Nkashi
| |
| Thursday, April 17, 2008 - 10:19 am: |
| 
|
मैत्री, इथलच archive वाचुन बघ खुप छान छान रेसिपी आहेत... (स्वानुभव )
|
Maitri
| |
| Thursday, April 17, 2008 - 6:55 pm: |
| 
|
nkashi, aga itheale archive wachatiy pan jara savistav sangu shakel ka? Bhajya chalu karu ka mayza mulala? ani ukadun ghayachya ani mash karayachya ka?ani fal pan mash karun dyayachi ka? mi ghari mixer mdhye tandul dalun jara bharad keliy tyat bharapur pani ghalun tyala mau bhat dyayacha vichar karatiy, te chalel ka? ani daliche pani kas dyayacha? mhanaje toor dal shijavun mag waracha pani ka? mazya mulala jara lavakracha daat aalet(iti mazya maitrini). tyala 2 pudhache khalache daat alet mhanaje ajun yetahet halu halu pan hatala laganya itapat baher aalet. tyacha kahi tras nahiye pan mhanaje taap wagaire kahi nahi. Ani to 5 mahinyacha aahe pan ajun palatha padat nahi, rangat nahi , basat nahi kahicha nahi pan barecha shabd bolayala lagalay barehca. yalahi kuni kahi upay sangu shakel ka? sorry jara jastacha motha post takalay
|
Dineshvs
| |
| Friday, April 18, 2008 - 3:07 am: |
| 
|
मैत्री, बाळ अजुन खुपच लहान आहे. तो इतक्यात पालथा वगैरे होणार नाही. कुशीवर वळत असेलच, त्याची इतर प्रगति पण हळुहळु होईलच. त्या बाबतीत खास प्रयत्न करायची गरज नाही. पालथे पडणे, पुढे सरकणे, रांगणे, बसणे या क्रिया नैसर्गिक उर्मीनेच होवू द्या. भाज्या फळे याबाबत सविस्तर चर्चा आहे इथे. सर्वच फ़ळे उकडून द्यायची गरज नाही. पिकलेली फळे पचनाला सुलभ असतात. बाळाची आवड बघून चमच्याने मॅश करुन कुठलेही फळ देता येईल. या फ़ळात साखर वगैरे घालु नये, नैसर्गिक चवच आवडायला हवी. भाज्या, डाळी याबाबत, इथे लिहिलेले आहेच.
|
Lajo
| |
| Friday, April 18, 2008 - 4:13 am: |
| 
|
मैत्री, मी माझ्या मुलीला ५ महिन्यांची असताना, पीकलेले केळे मॅश करून द्यायचे. त्यात थेंबभर साजुक तूप घालायचे. तिला उकडुन मॅश केलेला भोपळा, बटाटा पण थोडे साजुक तूप घालुन द्यायचे. पीकलेले पेअर, गोड सफरचंद सुद्धा नीट मॅश करून, अगदी १२-१४ सेकंद मायक्रोव्हेव मधे गरम करून दे. देताना टेम्प. चेक करायला विसरू नकोस.... दीनेशदा म्हणतात तस बाळाची प्रगती नैसर्गीक होतच असते. आपण फक्त त्यला मदत करायची. त्याला पालथे पडण्यासाठी, पुढे सरकण्यासाठी त्याच्या आवडीचे एखादे खेळणे पुढे ठेवायचे, त्याच्या तळपायाला थोड पुश करायच. आणि हे कायम लक्षात ठेवायच की प्रत्येक बाळ वेगळ असत. दुसर्या बाळांशी आपल्या बाळाची कधीच बरोबरी करायची नाही.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|