|
Rupantar
| |
| Monday, April 14, 2008 - 3:08 am: |
| 
|
DINESH DA, I HAVE A REQUEST FOR YOU .I REALLY LIKE ALL YOUR RECIPES. I AM 13 WEEKS PREGNANT AND MAKE SURE THAT I HAVE HEALTHY FOOD.. PLEASE SUGGEST ME RECEIPES USING NACNI FLOUR ,BUCHWHEAT FLOUR ,SOY FLOUR AND HEALTHY COMPLIMENTS WITH IT.
|
Dineshvs
| |
| Monday, April 14, 2008 - 7:21 am: |
| 
|
नमस्कार रुपांतर. प्रतिक्रिया वाचून खुप छान वाटले. या दिवसात भूक नैसर्गिकरित्याच चांगली लागते व अन्न अंगी पण छान लागते. हि सर्व पिठे वापरता आहात ते छानच आहे. हि पिठे वापरुन पराठे, चपात्या, ढोकळा असे सर्व प्रकार करता येतील. हे सर्व करताना बहुतेक प्रकारच्या भाज्या वापराव्यात. पण तेल तूप जास्त नको तसेच मसालेही जास्त नकोत. मसाल्यात, हिंग, मिरे आले, धणे, बडिशेप वगैरे प्रमाणात घालावे पण मिरचीचा अतिरेक टाळावा. हे सर्व प्रकार इथे आहेतच. जेवणात तोचतोचपणा टाळावा. थोडे थोडे सतत खावे पण वजन प्रमाणाबाहेर वाढू देऊ नये. मिठ नियंत्रणात असावे. जेवताना आनंदी रहावे आणि जेवणाच्या वेळा आवर्जून पाळाव्यात. एखादा पदार्थ खास आवडीचा असेल तर त्याची कृति देऊ शकेन.
|
Leenas
| |
| Monday, April 14, 2008 - 11:21 am: |
| 
|
थैन्क यु दिनेशदा आणि मॉड
|
Chioo
| |
| Monday, April 14, 2008 - 11:40 am: |
| 
|
मला कोणी बिना कांदा-लसूण-आल्याची भाजी सांगेल का? १०-१५ जण जेवायला येणार आहेत आणि त्यातले २-३च कांदा-लसूण न खाणारे आहेत. पण फ़क्त त्यांच्यासाठी करता नाही येणार. सगळ्यांसाठीच करावी लागेल. तेव्हा सोपी किंवा आदल्या दिवशी करून ठेवता येणारी असेल तर जास्त बरं होईल.
|
Dineshvs
| |
| Monday, April 14, 2008 - 12:03 pm: |
| 
|
आपल्याकडे उपवासाच्या अनेक भाज्या तश्या करतात. त्यापैकी कुठलीही चालेल.
|
चिऊ, बघ ह्या भाज्या पटतात का.. पालकाची पातळ भाजी. (वरून चरमरित फोडणी देताना लसुण न घालता वाळवलेल्या मसाला मिरच्या घालून) किंवा दह्यातला पालक मसाला भेंडी (शेंगदाण्याचा तीळाचा कूट, गरम मसाला, आमचूर पावडर घालून.) वरच्याप्रमाणेच वांगी मटर्- मसाला (मीरं, लवंग, दालचिनी, भरपूर कोथिंबीर, हिरवी मिरची आणि ओल्या नारळाचं वाटण लावून.) दह्यातलं वांग्याचं भरीत आचारी मसाला घालून अख्ख्या छोट्या बटाट्यांची भाजी आणि अश्या बर्याच भाज्या करता येतात आलं लसूण कांद्याशिवाय.
|
Chioo
| |
| Monday, April 14, 2008 - 2:59 pm: |
| 
|
मृण्मयी, खूप छान प्रकार सांगितलेस. इथे भेंडी, वांगी फारशी मिळत नाहित तेव्हा ते करता येणार नाही. बाकीपैकी काहितरी जमेल. मला मटर-मसाला सविस्तर सांगणार का? पालक आहे इथे बहुदा. बटाटेपण आहेत. एकदा करून बघेन. दिनेशदा, मी बुद्दू आहे हो स्वयंपाकात. उपवासाच्या भाज्या म्हटल्यावर मला फक्त उकडलेल्या बटाट्याची भाजी आठवली.
|
Pinku
| |
| Monday, April 14, 2008 - 3:22 pm: |
| 
|
चिऊ, बिना कान्दा, आले-लसूण "नवरतन कोर्मा" ची हि रेसिपी पहा. http://www.youtube.com/watch?v=oSJBiL5dsNI मी १-२ वेळा केली होती. मस्त झालि. पनीर आवडत असेल तर ह्यात थोडे पनीरचे तळलेले तुकडे घालत येतील.
|
Dineshvs
| |
| Monday, April 14, 2008 - 4:58 pm: |
| 
|
खसखस मिळत असेल तर बंगाली पोश्तो प्रकारच्या भाज्या हा चांगला पर्याय आहे. ( वाटणात खसखस आणि हिरवी मिरचि ) स्वीट कॉर्न मिळत असेल तर त्याची भाजी हा छान पर्याय आहे. नुसती मिरी आणि जिरे घालून भाजी करता येईल. ग्रेव्हीसाठी क्रीम वा दूध वापरायचे. सजावटीसाठी गाजर बटाटे मटार वगैरे. हिरवी मिरची, जिरे,हिन्ग, कढिपत्ता फ़ोडणीला आणि ओले खोबरे घालुन मटाराची साधी उसळ. लाल भोपळ्यची भाजी क्रीम घालून, पण करता येईल.
|
Bee
| |
| Tuesday, April 15, 2008 - 1:59 am: |
| 
|
Mru, aachaaree masaalaa haa braanD aahe kee prakaar?
|
Rupantar
| |
| Tuesday, April 15, 2008 - 2:29 am: |
| 
|
Dinesh da, thanks for your delicious reply please if you could suggest me any combination with nachni flour and green leafy veg ( palak, shepu,math). In Australia we do not get fresh methi. And please suggest me healthy dry snacks to munch while travelling or in between small breaks.
|
Dineshvs
| |
| Tuesday, April 15, 2008 - 3:34 am: |
| 
|
रुपांतर, आपल्या आवडीची कुठलिही पालेभाजी बारिक चिरुन त्यात आले लसुण पेस्ट, धणे जिरे पावडर, मीठ, थोडी साखर, घालुन थोडी चुरायची. दोन तीन पालेभाज्या मिसळून केल्या तरी चालेल. त्यात थोडे डाळीचे पिठ घालायचे, थोडे दहि आणि नाचणीचे पिठ घालायचे. हे पिठ फ़ार सैल नाही होवु द्यायचे, मग या पिठाचे पराठे किंवा थालीपिठ करायचे आणि वरणाबरोबर खायचे. हे पराठे अधुन मधुन देखील खायला चालतील. यात कुठलिही फळभाजी किसुन घालता येते. भाज्या आधी शिजवुन घ्यायची गरज नाही. पराठा वा थालीपिठ मात्र मंद आचेवर नीट भाजून घ्यायचे. मी दोदोल नावाचा एक प्रकार लिहिला आहे. तो नाचणीच्या पिठाचा करता येईल. गोड आवडत असेल तर एक छान मधल्या वेळेचा प्रकार आहे. नाचणीच्या पिठाचा डोसा, ढोकळा देखील करता येतो. या पिठाचा शिरा, उपमाहि करता येतो. रव्याच्या जागी हे पिठ वापरायचे. बाकि कृति तीच. या पिठाची उकड काढुन त्याच्या शेवया करता येतील, त्या दूधाबरोबर किंवा नुडल्सप्रमाणे भाज्या वगैरे घालून खाता येतील.
|
Lajo
| |
| Tuesday, April 15, 2008 - 4:32 am: |
| 
|
हाय रुपंतर, नाचणीच पीठ घालुन मी मऊभात कराते. भात नेहमीसारखा शिजवुन घ्यायचा. त्यात शिजवतानाच आवडत असेल तर एखादी पालेभाजी, भोपळा, गाजर असे काहीतरी घालायचे. तूपात हिंग आणि थोडा ओवा (अगदी वासाला)घालुन किंवा जीरे पण चालेल, फोडणी करायची, त्यात नाचणीच पीठ घालुन जरा भाजायचे मग शिजलेला भात त्यात घालायचा आणि दूध किंवा पानी घालुन चांगले माऊ गीरगीट शिजवायचे. गरम गरम खायला छान लागते आणि जरा कोमट झाले की दह्या बरोबर पण छान लागते. तुला मेथी घरी पण लावता येईल. मेथी दाणे १ तासभर पाण्यात भिजवायचे आणि चांगले ऊन मिळेल अश्याजागी पेरायचे. ३-४ आठवड्यात ताजी मेथी तय्यार..
|
Rupantar
| |
| Tuesday, April 15, 2008 - 5:18 am: |
| 
|
Special thanks to all. Maaiboli is the blessing for all the people and especially to married girls who are staying overseas away from parents and elders. I’ll try all your suggestions.
|
चिऊ, इथे बघ मटर मसाल्याची रेसिपी: /hitguj/messages/103383/104554.html?1208267578 बी, आचारी मसाला हा मसाल्याचा प्रकार. मी 'शान' हा ब्रँड वापरते ह्या मसाल्यासाठी. जरा आंबट तिखट असतो. आचारी गोश्त किंवा बाटाट्यासाठी वापरते.
|
Lalu
| |
| Tuesday, April 15, 2008 - 2:26 pm: |
| 
|
त्याऐवजी केप्र चा लोणच्याचा मसाला वापरला तर चालेल का? ~D ** ते 'अचारी' असावे, म्हणजे 'लोणचे टाईप'
|
Chioo
| |
| Tuesday, April 15, 2008 - 2:29 pm: |
| 
|
मृ, दिनेशदा आणि पिंकु, तुम्हाला खूप धन्यवाद. खूप idea मिळाल्या. आता यातलीच एखादी करेन. दिनेशदा, स्वीट कॉर्नची भाजी एकदा केलीच पाहिजे. मला तो कसाही, कोणत्याही रूपात आवडतो.
|
Vrushs
| |
| Tuesday, April 15, 2008 - 5:05 pm: |
| 
|
कोणी भेंडी दो प्याजा ची रेसिपी सांगू शकेल का?
|
Vrushs
| |
| Wednesday, April 16, 2008 - 4:54 pm: |
| 
|
दिनेशदा सांगणार का भेंडी दो प्याजाबद्दल please?
|
Manuswini
| |
| Wednesday, April 16, 2008 - 6:40 pm: |
| 
|
धणे पेरले तर आरामात कोथींबीर येते. त्यासाठी सर्वात खाली कुंडीत निचरा होईल अशी माती एक थर, मग लाल वितांचा थर मग काळी माती एक थर मग पुन्हा लाल वितांचा थर मग काळी माती हा सर्वात वरचा थर. आता धणे जरास ओले करून घालावे. मी इथे US ला केली होती मस्त कोथींबीर. छान लागते. तीला आधार द्यायला इथे छोट्या काड्या मिळतात specially . मेथी पण easy आहे लावणे.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|