|
Dineshvs
| |
| | Wednesday, March 19, 2008 - 4:54 pm: |
| 
|
या आमटीसाठी शक्यतो कच्ची कैरी घ्यावी. एक वाटी तूरडाळ, नेहमीप्रमाणे, हिंगहळद घालुन शिजवुन घ्यायची. कैरीची साले काढुन वाटीभर फ़ोडी घ्यायच्या. दोन पिकलेल्या टोमॅटोच्या बिया काढुन फ़ोडी करायच्या. दोन हिरव्या मिरच्या, दोन तीन लाल मिरच्या, थोडा कडीपत्ता, मुठभर कोथिंबीर, दोन चार लसुण पाकळ्या, हे सगळे बारिक चिरुन ठेवायचे. कढईत थोडे तेल गरम करुन, त्यात हिंग, जिरे, मिरच्या, कडिपत्ता, लसुण हे घालुन खमंग परतायचे. मग कोथिंबीर घालुन आणखी परतायचे. मग त्यात कैरी व टोमॅटोच्या फ़ोडी घालुन परतायचे. सगळे नीट शिजले कि त्यात थोडे पाणी घालायचे. मीठ घालायचे, आणि मग शिजलेली डाळ घालायची. उकळु द्यायचे. आवडीप्रमाणे डाळ घोटुन घ्यावी नाहीतर तशीच ठेवावी. मूळ कृतीत गूळ वा साखर नाही, पण घातली तर छान चव येते, तसेच साजूक तूप घातले तरी छान चव येते.
|
|
| हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
| चोखंदळ ग्राहक |
 |
| महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
| व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
| पांढर्यावरचे काळे |
|
| गावातल्या गावात |
|
| तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
| आरोह अवरोह |
|
| शुभंकरोती कल्याणम् |
|
| विखुरलेले मोती |
|
|