Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through March 11, 2008

Hitguj » Cuisine and Recipies » Looking For Recipes » Archive through March 11, 2008 « Previous Next »

Bee
Friday, March 07, 2008 - 8:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एका कोकणी मित्राने सांगितले की थालीपिठात शेवग्याची पाने चिरून टाकली तर ते जास्त छान लागतात. वर ह्या पानात लोह देखील खूप प्रमाणात असतं. कुणी हा प्रयोग करून पाहिला असेल तर आपापल्या प्रतिक्रिया जरूर द्या. मी करून पहातो ह्या सप्तांती.

Bee
Friday, March 07, 2008 - 8:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शेवग्याशी संबंधित ही पहा एक उपयुक्त लिंक..

http://en.wikipedia.org/wiki/Moringa_oleifera

Anjut
Friday, March 07, 2008 - 9:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी आम्ही शेवग्याच्या फुलांची तूर डाळ व जरासे तान्दूळ घालून भजी करतो फार छान लागतात.त्याच प्रमाणे थालीपीठ केल्यास चांगले लागावे.

Anjut
Friday, March 07, 2008 - 9:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मगाशी लिहायला विसरले की ही फुले जराशी कडवट लागतात. तेव्हा वापरताना थोडे मीठ लावून चुरायची आणी मग धुवून उपयोगात आणायची.

Sayonara
Friday, March 07, 2008 - 7:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ट्यु आणि मनु, तुमच्या ह्या होम मेड स्क्रब रेसिपीज स्कीन केअरमध्ये हलवा आणि नवीन रेसिपीज पोस्टा म्हणजे शोधायला सोपं पडेल आणि सहज करुनही बघता येईल.

Marhatmoli
Monday, March 10, 2008 - 6:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला पेसरट्टु आणि उपमा किंवा खाटा ढोकळा (मायबोलिवरचि दिनेश यान्चि authentic recepi ) आणि मक्याच्या दाण्यांचि उसळ यापैकि एक मेन्यु brunch ला ठेवायचा आहे. याबरोबर कुठल्या चटण्या द्याव्यात? दोन्हि साठि चटण्या सुचवा please .

Dhanashri
Monday, March 10, 2008 - 6:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी घरी पिझ्झा बेस करुन पाहिला पण मला तो फ़ारच कडक वाटला.सोफ़्ट
ब्रेड्साठी काय करावे
लागेल?


Dineshvs
Monday, March 10, 2008 - 8:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मैदा, यीस्ट वगैरेचे काय प्रमाण घेतले होते ?
मूळ ईतालियन पित्झाचा बेस पातळ आणि कुरकुरीतच असतो, त्यामूळे अगदीच काहि चुकले असे नाही.


Malavika
Monday, March 10, 2008 - 2:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पिज़्ज़ासाठी पीठ सैल भिजवायचे. पोळीच्या पीठापेक्शा सैल पाहीजे. नन्तर भरपूर तेल लावून मळावे. मळून झाल्यावर चकचकीत दिसले पाहीजे. तसेच तपमान ४२५-४५० एव्हढे पाहीजे. अजुन काही टिप्स पाहिजे तर सांग.

Princess
Monday, March 10, 2008 - 2:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लेमन ग्रास कशा कशात वापरता येईल?

Marathifan
Monday, March 10, 2008 - 2:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला पाहिजे pizza Base च्या टिप्स....बरा विषय निघाला आहे..
घरी केलेल्या pizza base ची चव pizza hut etc च्या चवीसारखी होण्यासाठी काय करावे?


Runi
Monday, March 10, 2008 - 4:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रिन्सेस, तुला लेमन ग्रास म्हणजेच गवती चहा म्हणायचय का?
तो सर्दीवर उपयोगी असतो. आपण चहात जसे आले घालतो ना तसाच या गवती चहाचा उपयोग करता येतो. माझी आज्जी नेहमी घालायची. मी पण घालते.
खुप असेल तर उन्हात सुकवुन ठेवला तरी चालतो.
याचा अजुन उपयोग मला तरी माहित नाही.


Dineshvs
Monday, March 10, 2008 - 4:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

थाई जेवणात हे लेमन ग्रास वापरतात. आपण चहात वगैरे घालतो ते उकळुन त्याचा फ़क्त अर्क घेण्यासाठी. थाई जेवणात मात्र तो वाटणात वगैरे घेतात. आपण पाने घेतो ते मुळाकडच्या खोडाचा गुलाबी गाभा घेतात. याचे तिरकस काप करुन सूपमधे वगैरे घालतात.

फ़ळांचे वगैरे कबाब करताना हे दांडे कबाब स्टिक्स म्हणून वापरता येतात. चमच्याच्या मागच्या बाजुने हे जरा दाबुन घेतले तर त्याचा स्वाद फ़ळाना लागतो. ( अननस, करमळ, राजेळी केळे, अशी फ़ळे वापरता येतात. )

पित्झाची सविस्तर कृति आहे इथे.
साधारणपणे दोन कप मैदा, १० ग्रॅम ताजी यीस्ट किंवा एक चहाचा चमचा ड्राय यीस्ट, एक चहाचा चमचा प्रत्येकि मीठ व साखर असे प्रमाण घ्यावे. यीस्ट कशी वापरायची त्याची सविस्तर चर्चा आहे.
बेस कडक झाला याची कारणे, यीस्ट कमी वा कमी प्रतीची होती. पाणी कमी पडले, ओव्हनचे तपमान आणि किंवा वेळ जास्त होते, असे असू शकेल.


Manuswini
Monday, March 10, 2008 - 5:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

lemon grass घालून माशाची आमटी छान होते.
मी केली होती सालमन इन लेमनग्रास, मस्त लागते.

चेहर्‍यावर वाफ़ घे. चकचकीत होइल. कुठे अगदी जायचे असेल नी चेहरा चकचकीत हवा सेल तर. :-)



Dineshvs
Tuesday, March 11, 2008 - 3:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मराठमोळी, नेहमीची हिरव्या मिरचीची चटणी उपम्याबरोबर आणि ढोकळ्याबरोबर, चिंच खजुराची चटणी चांगली लागेल. हिरव्या चटणीत कोथिंबीर व आले घालावे. उडदाची डाळ वा शेंगदाणे लालसर परतुन घ्यावेत. व ते वाटणात घ्यावेत. पण पुदिना नको.

Princess
Tuesday, March 11, 2008 - 9:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रुनि, दिनेशदा, मनु धन्यवाद.
मने लगेच रेसिपी द्यायचीस ना :-) दे बरे लगेच.
दिनेशदा, थाई रेसिपीज शिकवा ना. खुप दिवसात तुम्ही इकडे काहीच लिहिले नाही.
आणि हो मनु, चेहर्‍यावर वाफ घेण्याची आईडिया छानेय.


Dhanashri
Tuesday, March 11, 2008 - 9:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद मी पीठ पुरीच्या पीठासारखे घट्ट केले होते.पुन्हा करेन तेव्हा लक्षात ठेवते.
ब्रेड लाहि अशीच सेम रेसिपी ना..


Dineshvs
Tuesday, March 11, 2008 - 11:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो धनश्री.
यीस्ट हि साखरेचे विघटन करुन त्यापासून कार्बन डाय ऑक्साईड आणि अल्कोहोल तयार करते. पिठात तितकी साखर नसते म्हणून साखर घालावी लागते.
तसेच तयार होणार्‍या वायुमुळे पिठ वर उचलले जाण्यासाठी, पिठात सैलपणा पण हवा.
खुपदा यीस्ट घातल्यावर अर्ध्या तासात पिठ फ़ुगुन दुप्पट होते, ते परत मळुन परत हव्या त्या आकारात गोळे करुन घेतले कि परत ते फ़ुगते.
असे दोनदा फ़ुगले म्हणजे यीस्ट, ताजी आणि कार्यान्वित आहे असे समजायचे. यासाठी हवेत थोडा उबदारपणा पण लागतो. त्याचीहि काळजी घ्यावी लागते.
ड्राय यीस्ट आणली, तर ती दोन तीन महिन्यात संपवुन टाकायची. पहिल्यांदा कोमट साखर पाण्यात यीस्ट ताकल्यावर दहा मिनिटात फ़सफ़सली पाहिजे, तरच ती यीस्ट वापरण्याजोगी असते.
असो हि सविस्तर चर्चा आहे इथे.


Chioo
Tuesday, March 11, 2008 - 11:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेशदा, ब्रेडसाठी bread flour नसेल तर काय वापरता येते? मैदा घेतला तर त्यात baking powder किती घालायची? आणखी काही घालावे लागते का?
Dhanashri , तू भारतात baking कशात करतेस? (तुझ्या profile मधे भारत लिहिले आहेस म्हणून. की तू बाहेर आहेस? माझ्या बहिणीला तिथे काय पर्याय वापरावा ते सुचत नाहिये.
इथे कोणाला scones कसे असतात आणि त्याची कृती माहित आहे का?


Marhatmoli
Tuesday, March 11, 2008 - 2:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Thanks दिनेश,

कोथिंबिरिच्या चटणित मी नेहमि आले, मिरच्या, जिरे पुड आणि लिंबाचा रस घालते याच चटणीत उडिद डाळ किंवा दाणे भाजुन घालु का? कि त्यात आणखिन काहि बदल करवे लागतिल?


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators