|
Manuswini
| |
| Thursday, February 28, 2008 - 5:50 pm: |
| 
|
thaks to all for spinach tips
|
Bee
| |
| Friday, February 29, 2008 - 5:19 am: |
| 
|
प्र, मी मजेत. खूप दिवसांनी तुझी पोष्ट वाचतो आहे. तुला इथे पाहून आनंद झाला. ब्लांच समजवून सांगितल्याबद्दल धन्यवाद. मी पुर्वी हा शब्द ऐकला होता. हिरवीगार शिजवलेली भाजी पण चाखली होती पण त्यावेळी हेच का ते ब्लांच हे माहिती नव्हते. मी बिडाची कढई वापरतो भाज्यांसाठी त्यात भाज्यांचा रंग टिकून रहातो. पुर्वी मी ब्रोकुली एका पातेल्यात करायचो तेंव्हा ती गोळा भाजी तर व्हायचीच खेरीज रंगही बदलायचा. आता एक एक तुरे वेगळे राहतात आणि रंगही टिकून राहतो.
|
आर्च नी दिव्या, मी केला हां पालक टोफ़ु काल उघडा ठेवून. छान हिरवा राहीला रंग. थॅकू अगेन!
|
Tulip
| |
| Monday, March 03, 2008 - 6:58 pm: |
| 
|
आक्रोड खाण्यासारखा राहीलेला नसेल तर त्याची जाडसर पावडर करुन (आतल्या आक्रोडाची btw ) स्क्रब म्हणून वापरावी. स्कीन ग्लो होईल :P . वॉलनट स्क्रब किती एक्सपेन्सीव आहे.इथे तुम्हाला अर्धा किलो मिळतोय
|
हां पण अश्या खराब झालेल्या वालनटचा स्क्रब मधल्या ऑइलच्या ऍलर्जी वर महगडे ऑलीव ऑइल वापरा. source: allergy due to oils in nuts दिवे घ्या....
|
Malavika
| |
| Tuesday, March 04, 2008 - 3:20 am: |
| 
|
टुलीप, कसा करायचा वाॅलनट स्क्रब ?
|
Bee
| |
| Tuesday, March 04, 2008 - 5:20 am: |
| 
|
उत्तम त्वचेसाठी प्राणायाम सर्वात BEST !
|
Tulip
| |
| Tuesday, March 04, 2008 - 7:24 am: |
| 
|
वॉलनटच्या आतला भाग काढून कडक उन्हात दोनेक दिवस ठेव. संत्र्याची आणि लिंबाची सालं कडक उन्हात अगदी कोरडी सुकव. मग हे सगळं मिक्सरमधून अगदी बारीक पावडर करुन काढ. तिन्ही एकत्र कर. संत्र आणि लिंबाच्या सालांची पावडर युज्वली कोणत्याही घरी बनवलेल्या स्क्रब मधे घातली तर सुंदर वास तर येतोच पण स्कीन एकदम क्लिअर, हेल्दी दिसते. शिवाय ती घालून उकळवलेलं पाणी बेष्ट हेअर रिन्स. असे घरगुती स्क्रबचे उद्योग करुन वर्षं लोटलीत. येह सब मेरी मा की रेसिपीज. आता सगळं रेडीमेडच. ऍम सॉरी ह्या बीबी वर हे अगदीच अस्थानी झालय. पण कोणी विचारलं तर उत्तर नको द्यायला?
|
Bee
| |
| Wednesday, March 05, 2008 - 2:55 am: |
| 
|
आजकाल खूपशा खाजगी कंपन्यांमधे माईक्रो आवन असतो. दुपारच्या वेळी त्यामधे काहीतरी भाजून खाता येत. घरात सांडगे होते, ते मी काल भाजून खाल्लेत. इथे परदेशात आजूबाजूला खायला असे फ़ारसे काही मिळत नाही. हल्दीराम किंव तत्सम लोकांचे जंक फ़ुड अधुनमधुन खाणेही मी शक्यतोवर टाळतो. त्यापेक्षा ऑफ़ीसमधे मक्याचा थोड्या लाह्या भाजता येईल व त्याचा पॉप कॉर्न करता येईल असे सांडगे भाजताना माझ्या लक्षात आले. घरूनच जर मक्याच्या दाण्याला हळद मीठ चोपडून आणले आणि इथे जर ते भाजलेत तर छान लाह्या खायला मिळतील. लाह्याची ह्यापेक्षा अजून जास्त चांगली कृती आहे का कुणाकडे?
|
Dineshvs
| |
| Wednesday, March 05, 2008 - 3:27 am: |
| 
|
बी, अलिकडे खास ओव्हनमधे भाजण्यासाठी म्हणून, मक्याचे दाणे मिळतात. वरुन तेल हळद वगैरे लावायचे ते एका छोट्या बाटलीत वेगळे भरुन नेलेस तर छान. तुला आवडत असेल तर रताळे, बटाटे, कच्चे केळे वगैरेही भाजुन खाऊ शकतोस. भाजलेले रताळे त्यावर थोडे दूध आणि साखर घालुन घे. रताळ्याला चिर पाडून त्यात, थोडी साखर भरुन भाजलेस तर छान लागते.
|
Shonoo
| |
| Wednesday, March 05, 2008 - 3:36 am: |
| 
|
ट्यु 'घरी बनवलेल्या कोणत्याही स्क्रबमधे घातली तर' - हे घरी बनवायचे स्क्रब सांग ना कसे करायचे.
|
Manuswini
| |
| Wednesday, March 05, 2008 - 4:28 am: |
| 
|
घरी बरेच स्क्रब बनवू शकतो. खसखशीत तांदूळचे पीठ,मसूर दाळ पिठ एकत्र दूधात खालील टाका. आदल्या दिवशी बदाम दूधात भिजवून साल कढून कुटून घ्यावे रबरबीतच(एकदम बारीक नाही). मग हळद,चंदन पॉवडर, दही असे वरच्या पिठत मिक्स करून गालाला circular motion मधून बाहेरच्या बाजूला आणत रगडावे(खूप जोरात नाही हां), १० १५ मीनीटे सूकू द्यावे. मग थंड पाण्याणे धूवावे. चेहरा खरेच चमकदार.(म्हणेल त्याची शप्पथ घेइन मी) असे बरेच tried n tested scrub आहेत माझ्याकडे. हवेत का कुणाला? स्कूल संपून इथे नोकरी मिळेपर्यन्त हेच दर दूपारचे काम. काहीही कारण नसताना(चेहरा ठीक असताना म्हणायचेय) चेहरा सतत कश्यात तरी माखलेला, आणखी चमकेल ह्या आशेखाली ) mods हलवा योग्य ठीकाणी ही पोस्ट्स.
|
Bee
| |
| Wednesday, March 05, 2008 - 6:31 am: |
| 
|
धन्यवाद दिनेश. नाचणी सत्वाची लापशी देखील ऑफ़ीसमधे गरम उकळत्या पाण्यात करता यावी असे वाटते.
|
Dineshvs
| |
| Wednesday, March 05, 2008 - 8:50 am: |
| 
|
तसे करताना लापशी पेक्षा, ते सुप प्रमाणे पातळ कर. एक कप पाण्याला एक छोटा चमचा सत्व पुरे. मग आवडीप्रमाणे मीठ, किंवा साखर घाल. दूधही घालु शकतोस. पण दूध मात्र बाहेर काढल्यावरच घाल. असा काहिहि प्रकार करताना प्रत्येक तीस सेकंदानी ओव्हन उघडुन, पदार्थ ढवळुन घे. नाहितर सगळे फसफसून बाहेर सांडेल. सध्या तिथे हवामान गरम असेल, तर रात्रीच हा प्रकार करुन फ़्रीजमधे ठेव. सकाळी प्यायला छान वाटेल.
|
Bee
| |
| Wednesday, March 05, 2008 - 9:24 am: |
| 
|
दिनेश, धन्यवाद. नविन टिपा छान आहेत. इथे खरच खायचे प्यायचे खूप हाल होतात. त्यात मी प्रचंड rigid मनुष्य.
|
Malavika
| |
| Wednesday, March 05, 2008 - 2:15 pm: |
| 
|
धन्यवाद ट्युलिप आणि मनु. मनु, अजुन कहि टिप्स कृती असतील तर सांग. इतर कुठला BB असेल तर त्यावर सांगितले तरी चालेल.
|
Nano
| |
| Wednesday, March 05, 2008 - 8:52 pm: |
| 
|
Mazya kade thodi utaraleli santri shilak aahet. Tya santracha scrub karta yel ka?
|
Manuswini
| |
| Wednesday, March 05, 2008 - 9:12 pm: |
| 
|
हो नक्कीच, त्या साली उन्हात कडकडीत सुकवून, बारीक वाटून कुठल्याही फ़ेस पॅक मध्ये वापरता येतील.
|
Nano
| |
| Wednesday, March 05, 2008 - 9:21 pm: |
| 
|
Thank you Manusvini. Me udyach karun pahin. salicha upyog hoil pan aatil fodi matra vaya janar.
|
Sonalisl
| |
| Wednesday, March 05, 2008 - 10:31 pm: |
| 
|
संत्र्याचा रस सुद्धा चेहर्याला लावावा असं मी कुठेतरी वाचलं होतं.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|