Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through December 13, 2007

Hitguj » Cuisine and Recipies » उपयुक्त माहिती » Wants tips » Archive through December 13, 2007 « Previous Next »

Rujutajoshi
Thursday, December 14, 2006 - 10:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पर्व रग्डा पाटीस केल. पण 30 min शीजवून सुधा वाट्णा टणकच होता, आधी भीजवावा लागतो का?

Prady
Thursday, December 14, 2006 - 10:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो अगं वाटाणा भिजवावा लागतो ७-८ तास तरी. आणी शिट्ट्या पण थोड्या जास्त होऊ द्यायच्या कूकरच्या शिजवताना. आणी पांढर्‍या वाटाण्यात मसाले आणी मिठाचा स्वाद पटकन मुरत नाही. म्हणून शिजतानाच मीठ, छोटा दालचिनीचा तुकडा, १-२ लवंगा, ४-५ काळी मिरी दाणे असं घालून कूकरमधे शिजवलं तर छान येतो स्वाद.

Savani
Friday, December 15, 2006 - 5:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी वाटाणा शिजत ठेवताना त्यात आलं पण घालते किसून.

Prasadp77
Friday, December 15, 2006 - 9:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

I am not an expert in cooking but I noticed that it depends on the type of vatana. Here, I used to get material from Punjabi store who imports from India and that vatana needed overnight soaking but then I started getting pakistani variety and it practically doesn't need soaking. Just add excess of water in pressure cooker, 6-7 whistles and its done.
For safe side, soak it overnight.

Rujutajoshi
Friday, December 15, 2006 - 1:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ha ha ha ... तारीच माझा वाटाणा टणाक होता....त्य जायश्री देशपांडे बाई लीहायचे विसरल्या

Nalini
Thursday, June 14, 2007 - 10:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोथिंबिर जास्त टिकवण्यासाठी काय करावे?>>
कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली की मग थोडावेळ हवेवर कोरडी करून घ्यायची. मग हि कोथिंबीर हवी तशी(बारीक, अगदी बारिक, मोठी) कापून घ्यायची. अल्युमिनिअम फॉइलचे चौकोनी तुकडे करुन त्यात एका वेळेला लागते तेवढी कोथिंबीर घलून त्याची पुडी बनवायची. अशी सगळी कोथिंबीर फॉईल मधे पॅक केली की फ्रिज़रमधे ठेवुन द्यायची. हवी तेव्हा एक पुडी खोलून वापरता येते.


Ashishmate
Wednesday, June 27, 2007 - 12:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बेसन bhijavli ki tyachyat chote chote balls tayar hotat...(kadachit uthalya boltat tyla )..ani mag tya kachya rahata kitipan shijavla tari...

kahi upa upay ..
ASHish....



Dineshvs
Wednesday, June 27, 2007 - 4:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अशिष, बेसन चाळुन घ्यावे. त्यात थोडे थोडे पाणी घालुन गुठळ्या मोडतच पिठ भिजवावे.

Vrushs
Thursday, June 28, 2007 - 1:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आशिष, बेसन भिजवताना Egg beater ने फेटले तर अजिबात गुठ्ळ्या रहात नाही.

Ashishmate
Monday, July 02, 2007 - 6:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Dineshvs / Vrushs

Tnx Yar....

Arundhati_s
Thursday, July 12, 2007 - 4:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आज सकाळ चा गोन्धळ!!!
अन्डं मायक्रोवेव्ह मधे उकडायला ठेवलं. २ मिन. ते आत मधे च फ़ुटलं. सगळा मायक्रोवेव्ह खराब झाला. पण आतमधे अन्ड्याचा खुप जास्त वास येतो आहे. तो कसा घालवायचा? अन्डं मायक्रोवेव्ह मधे उकडवता येत नाहि का?


Chandya
Thursday, July 12, 2007 - 4:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अंडी microwave oven मध्ये उकडण्यासाठी एक वेगळे भांडे मिळते microwave egg boiler . त्यात एकावेळी ४ अंडी उकडण्यासाठी ठेवता येतात (कमी अधिक अंड्यांसाठीचे देखिल मिळत असावे).

उकडून सोललेली अंडी microwave मध्ये ५ सेकंदाच्यावर re-heat करु नयेत. जास्त वेळ गरम केल्यास तुमचे ओठ आणि तोंड सोलले जाण्याची शक्यता वाढते. :-)


Me_mastani
Friday, July 13, 2007 - 10:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बाहेर जो सोललेला लसूण मिळतो तो फ्रिज मधे जास्त दिवस टिकण्यासाठी काय करावे? ४-५ दिवसानन्तर त्याला बुरशी यायला लागते.

Ksmita
Friday, July 13, 2007 - 11:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Me_mastani,
मी एकदा २-३ वाट्या लसूण जरासा तेलावर परतून हवाबंद डब्यात ठेवला होता फ़्रिजमधे साधारण ४-५ आठवडे तरी टिकला होता चटणी वाटणात वापरुन संपला

Prady
Saturday, July 14, 2007 - 2:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या इथल्या गुल्टी मैत्रिणी असा लसूण आणी आल्याची पेस्ट करून डीपफ्रीज करतात. खूप दिवस टिकते. तसंही ते non-veg खूप फ्रिक्वेंटली खातात त्यामुळे वापरली ही जाते वरचे वर.

अजून एक लसूण टिकवण्याची पद्धत म्हणजे तेलात पाकळ्या बुडवून ठेवणे. पण जाणकारांनी मत द्यावं. मी स्वत्: हे केलं नाहीये. वाचलं होतं कुठेतरी.


Dineshvs
Saturday, July 14, 2007 - 2:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लसुण तेलात, व्हीनीगरमधे किंवा मधात बुडवुन ठेवता येतो. मधातला लसुण औषध म्हणुन घेता येतो.
लसणाची पेस्ट करुन हवाबंद डब्यात ठेवली तर टिकते. ती फ़्रीजरमधे ठेवावी. अलिकडे तयार बाटलीत अशी पेस्ट मिळते. पण खरेच फार लसुण वापरत नसाल तर अशी पेस्ट करुन ठेवु नये. लसुणही फार साठवुन ठेवु नये.
मी पुर्वीही लिहिले आहे, बाजारात मिळणारे गार्लिक प्रेस हे उपकरण मला खुप उपयोगी वाटते. लसुण सोलणे, त्याची पेस्ट करणे सगळेच होवुन जाते.


Rads
Saturday, September 15, 2007 - 10:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश, हे गार्लिक प्रेस उपकरण कसे असते. इलेक्टिकल आहे का हातानेच वापर करायचा? मला लसुण सोलायचा खूप कंटाळा येतो.

Dineshvs
Saturday, September 15, 2007 - 2:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे अगदी साधे हाताने वापरायचे उपकरण असते. साधारण सरबताच्या गाडीवाल्याकडे लिंबाचा रस काढण्याचे जे लाकडी उपकरण असते तसेच दिसते. यात एक खोलगट भाग असतो. त्यात लसणीच्या पाकळ्या ठेवायच्या. मग त्या खोलगट भागात अचुक बसेल असा एक भाग वरुन त्यात दाबायचा. त्या खोलगट भागाला खालुन छिद्रे असतात. लसणीच्या गराचा लगदा खाली पडतो व साली त्या खोलगट भागात राहतात. त्या हाताने काढुन टाकायच्या.


Wel123
Friday, November 16, 2007 - 10:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

mala koni sangel ka kothimberchi chutney kashi banawayechi please

Wel123
Thursday, December 13, 2007 - 5:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

soy milk garam karu shakato ka please kuni sanga.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators