|
Karadkar
| |
| Wednesday, January 30, 2008 - 7:18 pm: |
| 
|
पल्लवी, मी हे करुन पाहून खुप वर्षे झाली अहेत त्यामुळे प्रमाणाचा खुप गोंधळ आहे. थोडे करुन पहा आणि कय बदल केलेस ते इथे लिहि साहित्य १२ मारी बिस्किटे २ चमचे भरुन instant coffee 1/2 कप पाणि कोमट करुन (गरम नको) 1/2 कप कोको पावडर ( unsweetened ) २-३ चमचे साखर शक्यतो पिठीसाखर (चवीप्रमाणे कमी जास्त करावी.) गरजेप्रमाणे गरम दूध क्रूती १. साखर, कोको एका बाऊल मध्ये एकत्र करावे. आणि त्यात गरम (शक्यतो उकळते असेल तर बरे) १ चमचा एकावेळी असे घालत नीट मिसळावे. या chocolate sauce ची consistency भजीच्या पिठासारखी असावी. २. केकच्या चौकोनी भांड्याला तुपाचा किन्चीत हत पुसुन घ्यावा. ३. कोमट पाण्यात कॉफी विरघळवून घ्यावी. आणि ती कॉफी एका पसरट बाऊलमध्ये ठेवावी. ४. मारी बिस्कीट एकेक करत कॉफीमध्ये बुडवावे. आणि तुप लावलेल्या भांड्यात ४ बिस्कीटाचि एक लेयर करावी. त्यावर तयार केलेला chocolate sauce पातळ थर पसरावा. पुढची लेयर करताना एकाआड एक बिस्कीट येईल अशी करावी. सगळ्यात शेवटची लेयर शक्यतो chocolate sauce ची असावी. आता हा ट्रेसाधारण १ तास्भर फ्रिझरमध्ये ठेवावा. आणि कापताना ब्रेड कापायच्या सुरीने कापावे. तीप १. मारी बिस्कीट एकेकच भिज्जवावे सगळी भिजवून ठेवु नयेत. २. एकावर एक असे करत प्रयेक माणसासाठी एक ४-५ बिस्किटाचा एक स्टॅक केला तरी छान दिसेल. ३. Hershey's वगैरे चा तयार chocolate sauce मिळत असेल तर तोच वापरून पहायला हरकत नाही. ४. Serve करताना थंडच serve करावे. प्लेट मधे थोडा chocolate sauce घालुन त्यावर एक स्टॅक ठेवुन वरुन पिठीसखर भुरभुरावी.
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|