|
Bage
| |
| Friday, January 18, 2008 - 4:22 pm: |
| 
|
दिनेश, pls मला खापर पोळंयाची recipe देऊ शकाल का?
|
Wel123
| |
| Friday, January 18, 2008 - 6:04 pm: |
| 
|
Thanks dineshvs me tyacha wadya karte.
|
Prajaktad
| |
| Friday, January 18, 2008 - 7:38 pm: |
| 
|
आर्च! जिरे आणी पापड्खार टाकल्यामुळे किंचित पिवळसर छटा येते उकडिला.. उकड काढुन चाळणीत मोदक वाफ़वतो तशी वाफ़वत ठेवावी... मग, पापड हलकाही होतो..लाटि गरम राहिल्याने लाटायलाही सोपे जाते.. तु मोदक expert ..तुला तर अगदी सहज जमतिल.. 'पापड्खार' पापड्सोडा नावाने सुद्धा मिळतो.
|
Arch
| |
| Friday, January 18, 2008 - 7:44 pm: |
| 
|
प्राजक्ता, अग पण पापडखार किती घालायचा?
|
Dineshvs
| |
| Saturday, January 19, 2008 - 2:51 am: |
| 
|
पापडखार म्हणजे पोटॅशियम कार्बोनेट. याची काहि आम्लांशी विक्रिया होती. खास करुन उडदाच्या पिठात आणि पोह्यात जी आम्ले असतात, त्यावर हि विक्रिया होते. पण हि विक्रिया होण्यासाठी उच्च तपमान लागते. पापड तळताना असे तपमान उपलब्ध होते आणि कार्बन डाय ऑक्साईड वायु मोकळा होतो व तिथे बुडबुडा तयार होतो. या बुडबुड्यात गरम तेल शितुन तो आणखी मोठा होतो. भाजताना तेल आत जाण्याची क्रिया होत नाही म्हणुन भाजलेला पापड तितकासा कुरकुरीत होत नाही. नैसर्गिकरित्या केळ्याच्या झाडात हा क्षार सापडतो म्हणुन पुर्वी केळ्याच्या काल्याच्या पाण्यात पापडाचे पिठ भिजवत असत. त्यावेळी पापडखाराची गरज नसते. वाटीभर पिठाला चिमुटभर प्रमाण योग्य आहे. कमी पडला तर पापड हलके होणार नाहीत, पण जास्त झाला तर तळताना तेलाला फ़ेस येईल, व पापड जरा कडवट लागेल. पापडखार पदार्थ टिकवण्यासाठी पण वापरतात. गव्ह्याच्या लाह्या करताना, गुळ करताना तो वापरतात.
|
Dineshvs
| |
| Saturday, January 19, 2008 - 2:54 am: |
| 
|
खापरपोळ्या, असायला हव्यात इथे. नाहीतर मी लिहीन उद्या.
|
Surabhi
| |
| Saturday, January 19, 2008 - 2:02 pm: |
| 
|
आर्च, आम्ही उन्हाळ्यात असे तांदळाचे पापड नेहमी करतो. करायला खूप सोपे आहेत फक्त वाळवायला कडक ऊन हवं. एक फुलपात्र तांदळाच्या पीठाला एक चमचा पापडखार लागतो. एक फुलपात्र भरायला बोटभर कमी पाणी उकळायला ठेवून त्यातच पापडखार, एक चमचा तिखट व जीरे तीळ थोडे घालून उकळ आली की सपाट फुलपात्र तांदळाचे पीठ घालून ढवळून चांगली वाफ काढायची.मग खाली उतरवून मळून त्याचे गोळे करून मोदकपात्रात मोदकाप्रमणे २०-२५ मि. उकडायचे. मग तेलाचा हात लावून खूप मळावे व तेलावरच पातळ पापड लाटावे. पीठावर लाटू नये. जरूर कर ह्या पद्धतीने. छान होतील बघ. आणी सांग पण कसे झाले ते. गुजराती लोक त्याला "खारो" पण म्हणतात.
|
Surabhi
| |
| Saturday, January 19, 2008 - 2:26 pm: |
| 
|
खापरपोळ्या इथे धिरड्याच्या बीबीवर आहेत. दिनेश तुम्ही पण तुमची पद्धत लिहा. माझी काकी ह्या खूप छान करायची. मधमाश्याच्या पोळ्याप्रमाणे दिसायच्या. नारळाच्या रसात भिजलेल्या मऊ लुसलुशीत. चार माप तांदूळ त्याच्या निम्मे चण्याची डाळ व त्याच्या निम्मे उडदची डाळ (४:२:१ ) थोडी चमचाभर मेथी व हळद. हे भिजवून वाटायचे व रात्रभर तसेच ठेवायचे. सकाळी ते चांगले फुगून येते. त्यात डावभर तेल व करताना पाव चमचा सोडा घालायचा. पीठ दाटसरच हवे. नारळाचा रस काढून त्यात गुळ वेलची घालून तो एका पसरट पातेल्यात ठेवायचा. आता तवा (पुर्वी खापराचा तवा वापरीत असत म्हणे ) non-stick चा तापवून त्याला तेल लावून डावेने पीठ तव्यावर घालायचे. आपोआप पसरेल तितकेच पसरू द्यायचे त्यावर झाकण ठेवावे म्हणजे शिजते व जाळी पण छान पडते मोठ्मोठ्या भोकाची. उलटून दुसरी बाजू झाली की नारळाच्या रसात भिजत टाकायचे. दुसरी खापरपोळी तव्यावर होईपर्यंत ही भिजू द्यावी मग काढून एका केळीच्या पानावर ठेवावी. व तयार झालेली तव्यावरची आता रसात घालायची. अश्या सर्व कराव्या. आकार मोठ्या पुरी एवढा असतो.
|
Vidyat
| |
| Sunday, January 20, 2008 - 12:45 pm: |
| 
|
बेकरीत मिळते तशी खारी करण्याची रेसीपी कुणाल माहीत आहे क?
|
Arch
| |
| Sunday, January 20, 2008 - 3:13 pm: |
| 
|
सुरभी, छान ग. अगदी सविस्तर लिहिल्याबद्दल Thanks
|
Dineshvs
| |
| Monday, January 21, 2008 - 2:47 am: |
| 
|
आभार सुरभी, हेच लिहायचे होते. बहुतेक आधी लिहिले आहे इथे. काल GTG मुळे वेळच झाला नाही. पण या दोन्ही कृति, त्या त्या बीबीवर हलवायला हव्यात.
|
Bage
| |
| Tuesday, January 22, 2008 - 6:58 am: |
| 
|
thanks सुरभी करुन बघते आणि update करीनच
|
Surabhi
| |
| Tuesday, January 22, 2008 - 10:22 am: |
| 
|
आर्च, दिनेश, बागे, मी फक्त आमची घरगुती पद्धत लिहिलेय, Thanks वैगेरे म्हणू नका..... my pleasure !!
|
मी आजच "चाकवत" ही पालेभाजी आणली आहे..कशी करतात ती.. कोणी सांगू शकेल? मी इथे पालेभाजीच्या बीबी वर शोधलं पण नाही मिळाली. 
|
चाकवत निवडून, धूऊन बारीक चिरावा.त्यात भिजवलेले १ मुठभर शेंगदाणे,१टे.स्पून हरभरा डाळ घालून शिजवून घ्यावे. शिजवलेला चाकवत डावाने चांगला घोटावा व त्यात २ ट.Sपून डाळीचे पीठ घालून घोटावे. वरील भाजीत ३ वाट्या ताक घालून उकळायला ठेवावी. भाजीत चवीनुसार मीठ, साखर व २ च. हिरव्या मिर्च्या वाटून घाल्याव्यात. भाजीला उकळी येइपर्यंत ढ्वळावी. भाजी उकळली कि २ टी.स्पून तुपाची जिरे, हिंग, हळ्द घालून फ़ोडणी करून भाजीवर घालावी व भाजी उकळ्ल्यावर उतरवावी. भाजी उकळेपर्यंत ढवळल्याने भाजीत ताक फ़ुटत नाही. एकापुस्तकातून
|
धन्यवाद स्वाती. मी ही भाजी पहिल्यांदाच आणली आहे काल. थोडक्यात म्हणजे पालकाची ताकातली भाजी करतात तशीच करायची.
|
Maanus
| |
| Thursday, January 24, 2008 - 6:10 am: |
| 
|
very good video recipes http://youtube.com/user/vahchef
|
Manjud
| |
| Thursday, January 24, 2008 - 9:21 am: |
| 
|
मनिषा, चाकवताची अळूप्रमाणे सुद्धा भाजी करता येते. सगळे साहीत्य, कृती तशीच फक्त अळूच्या ऐवजी चाकवत घालयचा. आवडत असेल तर फोडणीत लसूण घातलीस तरी चालेल.
|
Orchid
| |
| Thursday, January 24, 2008 - 3:29 pm: |
| 
|
मंजु आणि मनिशाच्या पोस्टवरुन आठवलं पालकाचीपण अळुच्या पातळ्भाजीसारखीच भाजी करता येते... चिंच, गुळ, काजु, मेथी दाणे घालुन. मस्त टेस्टी होते.
|
माणूस मस्त आहे क्लिप.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|