Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through January 24, 2008

Hitguj » Cuisine and Recipies » उपयुक्त माहिती » Menu Combinations » Archive through January 24, 2008 « Previous Next »

Manuswini
Thursday, September 20, 2007 - 5:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रोज तीच फळे प्रसाद म्हणून त्याच लोकांना द्यायची. जी लोक फळे आणतात त्यांन प्रसाद म्हणून त्यातील फळे द्यायची नाहीतर mix फळे दे. अग वाटूनच संपतात. कधी कधी केळी इतकी पडायची आमच्या घरी, वाटून पण संपायची नाही. मग आई केळी वड्या करून शेवटच्या आरतीला वाटून टाकते.
शिर्‍यात केळी घाल.
शिकरण बनव.
(आता म्हणशील त्यात काय सांगायचे. नको तो आगाऊपणा माझा. पण सुचवते गं). :-)

fruit pudding कर अंडे न टाकता छान होते.

खीर कर (सफ़रचंदाची,अननसाची),

रोज fruit salad खा last resort , :-) शरीराला चांगले.:-)



Prajaktad
Thursday, September 20, 2007 - 7:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मग आई केळी वड्या करून शेवटच्या आरतीला वाटून टाकते>>>>केळी वड्या .. त्या आणी कशा करायच्या ते?... मने ! चल बघु लिही रेसिपी पटकन...का आहेत इथेच आधिच??

Manuswini
Thursday, September 20, 2007 - 8:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्राजे, लिहीली आहे बघ लाजोने रेसीपी, सेम तशीच पण तुला त्यात ओले खोबरे टाकायला आवडले तर टाक. कारण काय आहे ना कोणी कोणी आमच्य घरी गणपतीत नारळ,फळे आणायचे, मग एव्ह्ढे नारळ काय करणार?
नारळाच्या वड्या करून उरलेले नारळ चव वड्यात टाक.

जरासा जाडा रवा परतून मात्र घ्यायची आई. खरे तर आपण रवा केक करतो ना तसाच हा प्रकार होतो.
जाडा रवा किंचीत भाजून, पळीभर शुद्ध तूप,जायफळ, किंचीत वेलची, गुळ टाक(वेगळी चव लागते, ती चव तुला नक्कीच ज्यास्त आवडेल साखरेपेक्षा). दूध लागले तरच टाक कारण ओल्या खोबर्‍याचे पाणी असते ना. ठेव नी केक pan ला तूपाचा हात लावून काढ oven मधून. ते कूकर मधून शिजवले तर ओलसर रहाते वडी मग संपल्या नाही तर कोण खाणार?

आता ह्यात काही वेगळे असे नाही पण लिहीलीच कृती, मला वेगळेपणा न्हवता दाखवयचा इथे. :-)


Shmt
Tuesday, October 02, 2007 - 2:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी US मध्ये माज़्या मुलाचे बारसे करणार आहे. ग़ाजर हलवा करण्याच विचार करतिय. ५० लोकंसठि किति किलोचा किन्वा किति गाजर लागतील?

Wel123
Tuesday, November 13, 2007 - 7:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

mala 10 janansathi jewan banawayeche aahe please koni menu deil ka? menu madhe starter,main course n dessert hawe aahe

Anjut
Wednesday, November 14, 2007 - 11:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हाय wel123 तुम्हाला पदार्थांची नावे सांगण्या पेक्षा मेनु प्लCनिंग च्या टिप्स देते. सर्वसाधारण पणे १-२ पदार्थ आधी करून ठेवण्या सारखे असावेत.
जसे की दहीवडे फ़्रूट सलाड किंवा तत्सम dessert .
१-२ पदार्थ असे असवेत ज्यांची ग्रेवी गरम करूनही चव बदलत नही उदा. कुर्मा, बटर चिकन,छोले भरली वांगी, यांचा मसाला आधी तयार करून ठेवता येतो.
भात,पोळ्या आणि १ starter फक्त आयत्या वेळी करायचे ठेवावे.दुसरे ढोकळ्या सारखे आधी करून ठेवायचे
तसेच रायता किंवा कोशिम्बीर ही सकाळी करून आयत्या वेळी दह्यात घालता येते. आपापल्या प्राविण्यानुसार मेनु ठरवायचा पण सर्व पदार्थ आधी एकदा तरी करून पाहिलेले असावेत.
अश्या प्रकारे १ suggested menu असा असू शकेल.
starters आलू टिक्कि,(पालक कबाब,भजिया),खाटा, ढोकळा किंवा अमेरिकन सेव पुरी
main course मसाले भात (जीरा राईस,हरा पुलाव,लेमन राइस)
tomato सार, (कढी, डाळ पालक)
चिकन टिक्का मसाला(वेजिटेबल कुर्मा, grilled vegetables tandoori style ,मटार उसळ,वगैरे.
dessert गाजर हलवा,खीर, mango suffle, fruit salad.
भातही आधी धुऊन परतवून ठेवला तर आयत्या वेळी पाणी घालून शिजवता येतो.
मला आशा आहे की या सूचनांचा तुम्हाला फायदा होईल.


Wel123
Thursday, November 15, 2007 - 5:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Thanks Anjut,
Chan tips n menu sangitala aahe me asech karel.

Wel123
Saturday, November 17, 2007 - 8:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

mazakade anardana powder aahe....please koni sangel ka ki ti kashat taku shakto.

Dineshvs
Sunday, November 18, 2007 - 4:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आपण ज्यासाठी चिंच, लिंबू वैगरे वापरतो तिथे अनारदाणा वापरता येतो. हिरवी मिरची, अनारदाणा, पुदिना यांची चटणी चांगली होते.
पंजाबी समोस्याच्या सारणात, पराठ्याच्या सारणात ती वापरता येते.


Wel123
Thursday, December 06, 2007 - 11:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

please mala thodi help kara.....aamcha kade ek couple yenar aahe 2,3 diwas rahanar aahe tar jewan ,nasta kay banau mhanje sope jail......time pan kami lagala pahije.....pahile kay tayari karavi lagel.

Savani
Friday, January 18, 2008 - 1:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला जरा प्लीज सुचवा न साऊथ इंडीयन मेनु(इडली,सांबार, मेदू वडा,कर्ड राईस) बरोबर गोडाचा कोणता पदार्थ चांगला वाटेल?

Malavika
Friday, January 18, 2008 - 3:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ह्या मेनूबरोबर तांदूळाची खीर चांगली वाटेल.

Chinnu
Friday, January 18, 2008 - 3:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सावनीताई, मालविकाला अनुमोदन. तांदळाची खीर किंवा फ़िरनी, fruit salad , गुलाबजाम, रसराज वगेरे बरे वाटतील.
एक म्हणजे साउथ इंडियन मेनुमध्ये इडली सांबार हे पोटभरीचे पदार्थ असतात. त्यामुळे गोड पदार्थ हलकाच ठेवावा. अगदी फ़ळे कापुन ठेवलेले पण चालेल. किंवा icecreme sundae पण एक ऑप्शन.


Savani
Friday, January 18, 2008 - 10:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मालविका, चिन्नु, धन्यवाद. चिन्नु, अग मला पार्टीसाठी करुन न्यायचं आहे मग अगदी नुस्ती फ़ळं नको न म्हणुन काहीतरी पदार्थ हवा आहे. मला फ़िरनी चा पर्याय छान वाटतोय. बहुदा तेच करेन.

Wel123
Wednesday, January 23, 2008 - 6:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

maza kade haldikunkasathi weekend la 15 jan yenar aahet,me nastha thevnar aahe kay karne sope jail....please kahitari suchawa .....me wichar karat hoti ki chole bhature theu.....pan jar bhatura pahele karun thewala tar to changla nahi lagnar ka,please help.thanks in advance.

Savani
Wednesday, January 23, 2008 - 9:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

wel123 तुला पोटभरीचं पण नाश्त्याचा पदार्थ हवा आहे न. अगं मग इडली किंवा मेदु वडा सांबार बघ. आधी करून ठेवता येईल सगळं.
तुला छोलेच करायचे असतील तर छोले, पुर्‍या, श्रीखंड, आणि हवं असेल तर मसालेभात असा पण बेत छान वाटेल. श्रीखंड आदल्या दिवशी करून ठेवता येतील.छोले सुद्धा आदल्या दिवशी करता येतील. किंवा निदान ग्रेवी तरी करून ठेवता येईल. मसाले भाताची पण तयारी आधी करता येते.


Wel123
Wednesday, January 23, 2008 - 9:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Thanks savani,mala sang idli sobat ajun kay theu.....sweet ani ajun ek dish ji pahale karun thwata yeil.

Savani
Thursday, January 24, 2008 - 4:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गोड म्हणशील तर मला जे चिन्नु ने सुचवलं तेच मी तुला सुचवेन. फ़िरनी चांगली वाटेल. किंवा मग गव्हाची खीर.

Marhatmoli
Thursday, January 24, 2008 - 4:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला पुढच्या शनिवारि, ३४ लोकांना जेवायला बोलावायचे आहे. पाव्-भाजि, दहिभात, सुरळि वडि आणि शेवई खीर हा बेत ठिक राहिल का? कहि सुधारणा किंवा बदल योग्य वाटत असतिल तर जरूर सुचवा.

हे पदार्थ निवडण्याच एकमेव कारण हेच कि यापैकि बर्याच गोष्टि आधि करुन ठेवता येतिल किंवा वेळेवर पटकन होतिल. शनिवारि दिवसभर मला कामावर जायचे आहे. या व्यतिरिक्त काहि असे पदार्थ योग्य वाटत असतिल तर जरूर सांगा.


Savani
Thursday, January 24, 2008 - 4:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मराठमोळी,
शेवयाच्या खीरीऐवजी तू आईसक्रीम किंवा स्ट्रॉबेरी / मॅंगो मिल्कशेक ठेवू शकतेस. पावभाजी बरोबर चांगलं वाटेल.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators