Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through May 24, 2007

Hitguj » Cuisine and Recipies » विविधा » Gharche saajuk tup » Archive through May 24, 2007 « Previous Next »

Nalini
Friday, March 24, 2006 - 5:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

- हे लोणी गसवर तापायला ठेवायचे की मग त्याचे तासाभराणे तुप बनते.

तासाभराने???? तुप जळणार नाही का?

Lopamudraa
Friday, March 24, 2006 - 7:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

mahinabhar????? che loni kadhavaayalaa kevadhi kadhai lagel? lonee jast asel tar tevhadha vel lagtoch!!!

Sharmila_72
Saturday, March 25, 2006 - 11:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चिऊताई म्हणतात तस नुसत्या साईपासून पण काही जण तूप करतात. नॉर्थ इंडीअन व काही पंजाबी लोक पण असं तूप करतात. पण ही योग्य पद्धत नाही अस मला वाटत. दिनेश नी सांगितल्याप्रमाणे आयुर्वेदात अस तूप बसत नाही. मी एकदा ट्राय केल तर बेरी खूप निघाली आणि तूपाची चव नेहमीसारखी लागली नाही.

माणुस, तुझ्या तुपाच्या रेसिपीत एक स्टेप वाढव.
\- दही तयार झाल्यावर, ते लाकडाच्या रवी ने घुसळुन त्यातले पाणी व लोणी separate करा. / यानंतर लोणी पाण्यात घालून स्वच्छ पाणी निघेपर्यंत धुवा.
स्टेप बाय स्टेप फोटो?


Moodi
Monday, April 17, 2006 - 2:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्त मलईदार...
हा लेख दिसत नसल्यास font चेक करुन बघावा.

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/1420375.cms .

A_sayalee
Monday, April 17, 2006 - 2:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तूपाबाबत जे दिनेश नी लिहिलं आहे, तसंच ताकही विरजण घुसळून त्यातून लोणी वेगळे काढल्यावर जे उरते ते ताकच आयुर्वेदाला अपेक्शित असते. म्हणजे पचनाच मदत होते ती ह्या ताकाने.

Sayuri
Sunday, September 03, 2006 - 6:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी unsalted बटर चे तूप केले आहे. पण ते तूप वापरुन हिंग-जिरं ची फ़ोडणी करायला गेले तर, तूपात जिरे टाकल्यावर, तूपाला फ़ेस येतो आहे. (बाकी चवी मधे फ़रक पडत नाहीये) तसं का होत आहे.....माझे तूप बिघडले आहे काय?

Psg
Monday, September 04, 2006 - 7:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नाही गं, तूप पुरेसं गरम झालं नसेल तर जीरं टाकल्यावर फ़ेस येतो.. कडकडीत तूप झालं तर नाही येणार फ़ेस..तूप होण्या, न होण्यानी इथे काही फ़रक पडणार नाही.. :-)

Bee
Monday, September 04, 2006 - 8:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुप जर थोडं कच्च राहील तर फ़ेस येतो. जर हिंग घातलं असेल तर फ़ेस येऊ शकतो. तुप कडकडीत करू नकोस. त्याचे घातक परिणाम होतात. तुप नेहमी आच असेल तिथे बाजूला ठेवले की आपोआप विरघळते. कित्ती मला माहिती :-)

Sayuri
Monday, September 04, 2006 - 4:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद Psg आणि Bee. मला वाटलं माझं तूप बिघडलं की काय!.

Dineshvs
Monday, September 04, 2006 - 4:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Psg बी ने योग्यच लिहिले आहे. पण साजुक तुपात तळल्यावर काहिसा उग्र वास येतो त्यापेक्षा तेलाची फोडणी करुन, पदार्थात वरुन तुप घातले तर छान चव येते.

Aashi
Thursday, November 09, 2006 - 12:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी traditional पद्धतीने तुप करायचा प्रयत्न करतेय पण :-( दिवसातुन ३-४ दा तापवले तरी साय अगदी पातळ थर. मी vit D (red cap) वाल दूध वापरते. any suggestions?

Karadkar
Thursday, November 09, 2006 - 1:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आशी, उसगावात जे दुध मिळते ते homogenized असते. त्यामुळे ते दुध तापवले की साय येत नाही. तुला Trader Joe's असेल तर तिथले cream top दुध आणुन बघ. कदाचीत तुला साय मिळेल. मी हा प्रयत्न केला नाहीये. प्रयोग स्वत्:च्या जबाबदारीवर करावा.



Aashi
Thursday, November 09, 2006 - 5:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उसगावात? म्हणजे?
Trader Joe's Cleveland सारख्या छोट्या शहरात होते पण ईथे Houston मध्ये नहिये :-( नाही तर नक्कि try केल असत ग
मला माझ्या मुलाला तुप सुरु करायचा आहे पण unsalted butter वितळवुन केलेल तुप color, taste, texture सोडल्यास आपल्या अयुर्वेदिक तुपाच्या कितपत जवळ जाईल शन्का होती म्हणुन हा खटाटोप :-) आम्ही आत्तापर्यन्त u. butter चच तुप खात होतो हा भाग वेगळा

Sharmila_72
Tuesday, May 22, 2007 - 4:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तूप करताना बेरी कमी निघावी यासाठी:

लोणी काढल्यावर पाणी घालून धुवावे. त्यात आपल्याला काही सायीसारखे तुकडे तरंगताना दिसतील. त्यासकट पाणी फेकून द्यावे. परत पाणी पुन्हा लोण्यात हात घालून कुस्करल्यासारखे करून धुवावे. असे स्वच्छ पाणी निघेपर्यंत करावे. अशाने बेरी कमी निघते. लोणी व्यवस्थित न धुतल्यामुळे जे सायीसारखे तुकडे तरंगतात ते तळाला बसून त्याची बेरी होते. मला सुरुवातीला वाटायच की मी लोण्याचा अंश अशा धुण्यामुळे कमी करतेय कि काय. पण अनुभवावरुन समजल कि हे तुकडे विरघळत तर नाहीच उलट त्याची बेरी तयार होते.
पण हे लोणी धुण्याच काम सांभाळून करा बर, लोण्याचा गोळा धापकन सिंक मध्ये पडणार नाही याची काळजी घेऊन. ('आहे मनोहर तरी' या पुस्तकाची आठवण झाली)


Bee
Wednesday, May 23, 2007 - 5:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बेरी म्हणजे लोण्यातील मळ. तो कमी निघून कसे काय तूप चांगले होणार! मी तर असे ऐकले आहे की काही जणांची बेरी निघत नाही अशी तक्रार असते. खुद्द माझीच ही तक्रार होती प्रथम वेळेला मी जेंव्हा तूप कढवले होते त्यावेळी. बेरी ही जितकी जास्त निघेल तितके तूप चांगले होते. लवंग, विड्याचे पान हे बेरी निघण्यासाठी एक माध्यम असते.

मला वाटतं लोणी सिंक मधे धुवायचेच नाही. खाली जमीनीवर बसूनच हे काम करावे. लोणी धुवायला फ़ार पाणी लागत नाही. त्याच पातेल्यात गोळा खालीवर वळवायचा. हळुहळू पाणी खराब होत जाते आणि लोणी स्वच्छ.

बेरी ही फ़ेकून न देता कणकेत मळवायची. त्यानी पोळ्या छान सुगंधित होतात.


Alpana
Wednesday, May 23, 2007 - 6:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चिऊताई शर्मिला म्हणाल्याप्रमाणे पन्जाबी लोक साइचे direct तुप करतात. मी काही दिवसान्पुर्वी तुप बनवण्याचा प्रयत्न केला होता. १ महिन्याची साय साठ्वुन ठेवली पण नवरोबा मात्र साय खराब झाली म्हणत होता. तरिपण मी त्या साइचे विरजण लावले... पण बहुतेक दिल्लिच्या हिवाळ्यात निट विरजण लागले नाही. नन्तर मी ताक काढायचा प्रयत्न केला तर लोणी निघलेच नही. नवरा मला सारखे म्हणत होत कि घी ऍसे नही बनाते.... काहि दिवसानि त्याच्या काकु घरी आल्या त्यावेळी त्या म्हणाल्या कि मलाइ कभी खराब नही होती और उसे सिधा घी बनाने के लिये चुल्हे पे रखो.. मी त्याप्रमणे केले... चव तर छान आली पण तुप कमी आणी बेरी जास्त निघाली.

Sharmila_72
Wednesday, May 23, 2007 - 1:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी, सायीच विरजण चांगल लागल नाही तर बेरी निघत नाही. बेरी ही निघालीच पाहिजे बरोबर आहे तू म्हणतोस ते. पण ती बेरी लोण्यात तशीच राहून खाली तळाला लागून देण्यात काय अर्थ? म्हणून मी लोणी चांगले ६-७ वेळा धुते. तू म्हणाल्याप्रमाणे पाणी खराब होत जात, ते फेकून द्यायच पुन्हा नवीन पाणी घ्यायच परत ते पाणी खराब झाल कि फेकायच. ही process करताना हळूहळू पाणी स्वच्छ निघू लागत. आणि लोणी कढवल्यावर तळाला बेरी कमी साठते. आता जर कोणाला बेरी आवडत असेल तर त्यानी एकदाच लोणी धुवाव आणी तळाला साठू द्यावी खरपूस बेरी. शेवटी काय बेरी ही निघतेच. फक्त ती धुवून धुवून फेकायची की तशीच राहू द्यायची हा ज्याच्या त्याच्या आवडीचा प्रश्न! आणी हो, मी लोणी सिंक मध्ये धूत नाही ते भांड्यात घेऊनच धुते फक्त खराब पाणी सिंक मध्ये फेकते. अजून काही शंका असल्यास जरूर विचार. (बाय द वे, मला बेरी नुसती खायला खूप आवडते,पण थोडीशीच)

Sharmila_72
Wednesday, May 23, 2007 - 1:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अल्पना, माझही २-३ वेळा अस झाल होतं. नीट विरजण न लागल्यामुळे लोणी निघालेच नाही. घुसळल्यावर लोणी वर न तरंगता सगळ एकजीव होत होत. काहीजण फ़्रिजमध्ये साय साठवताना खाली एक चमचा विरजण टाकून वर साय टाकत जातात. मी कधी कधी करते अस. आणि नुसत्या सायीच विरजण न लावता तूप कढवल तर तू म्हणालीस तस तूप कमी आणि बेरी जास्त निघते. मला एक पंजाबी बाई सुध्दा म्हणाली होती ,"आप लोगोंका घी बनानेका तरीका अच्छा है, उससे घी ज्यादा निकलता है". दिनेश, बेरी प्रकारावर your help is highly required . तुम्ही सांगितल की आम्हाला आमच्या काही चुका होत असतील तर कळतात आणि खूप confident वाटत एखादा पदार्थ करताना.

Dineshvs
Wednesday, May 23, 2007 - 5:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पंजाबमधे दुधावर भरपुर दाट साय येते. नुसती साय साठवुन ती घुसळली कि त्याचे लोणी तयार होते. ( केक वैगरेसाठी जेंव्हा क्रीम व्हीप करायचे असते त्यावेळी ते बर्फावर ठेवुन, हळुहळु व्हीप करायला सांगितलेले असते. नाहीतर त्याचे लोणी होते. तसेच आयत्यावेळी क्रीम नसले तर पांढरे लोणी आणि दुध एकत्र करुन थोडे गरम केले तर कामचलाऊ, क्रीम तयार होते. ) पण त्या तुपाला चांगला वास येत नाही. बाजारात मिळाणारे लोणी अश्याच पद्धतीने काढलेले असल्याने, त्याला घरच्या साजुक तुपाची सर येत नाही.
विरजण लावणे, मग रविने ताक घुसळुन लोणी काढणे आणि ते कढवणे, यामुळेच तुपाला आवश्यक ती चव येते.
समजा साय वेगळी साठवली असेल तर घुसळायच्या आदल्या दिवशी, ती मोडुन त्यात दही घालावे, व दुसर्‍या दिवशी घुसळुन त्याचे लोणी काढावे.
मिक्सरमधे घुसळण्यापेक्षा, हाताने रविने घुसळले तर लोणी निघायला थोडा वेळ जातो, पण खुप मानसिक समाधान मिळते. यासाठी वेगळा वेळ काढायला नको. टिव्ही बघता बघताही हे काम होवु शकते.


Alpana
Thursday, May 24, 2007 - 4:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तिथे पन्जाब मध्ये गावी रोज 12-13 litre दुध येते.. त्यामुळे १-२ दिवसानिच सायीचे तुप करतात.. त्यामुळे नवर्याला वाटत होते कि साय खराब झली. काल त्याला हा बी बी दाखवला.. तेन्वा कुठे विश्वास बसला की साय अशी खराब होत नाही

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators