Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through December 29, 2007

Hitguj » Cuisine and Recipies » Looking For Recipes » Archive through December 29, 2007 « Previous Next »

Arch
Friday, December 21, 2007 - 7:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रज्ञा, अग गरम केले न की ते microwave किंचित चिवट होतात. आयत्यावेळीच तळ. मी गेल्या आठवड्यातच केले होते आणि उरलेले थोडे गरम करून खाल्ले तर ती चव येत नाही.

माझी मैत्रीण party च्यावेळी आधी अर्धवट तळून ठेवते म्हणजे party च्या दिवशी पटकन तळल जात.


Prady
Friday, December 21, 2007 - 8:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Thanks आर्च. आयत्या वेळीच तळेन मग मी.

Maanus
Friday, December 21, 2007 - 10:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तळुन ठेवले तरी चालतील बहुतेक, but then use the normal oven, not microwave to heat it.


नाहीतर लोक येण्यापुर्वी एक तास तळुन ठेवा, आणि लगेच normal oven pre-heat करुन त्यात ठेवुन द्या. :-)


Lopamudraa
Sunday, December 23, 2007 - 8:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रॅडी, जर oven मध्ये गरम केले तेही preheated तर चवीत फ़ारसा बदल होत नाही. कुरकुरीत पण राहतात. आणि धुर होतो, मग कितीही थंडी असली तरी खिडक्या दारे उघडा हा त्रास वाचतो.

Manuswini
Monday, December 24, 2007 - 3:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वरती तुला प्राडी सगळ्यांनी संगीतले नी मी पण हेच अगदी सुचवणार होते,

तळून oven मध्ये aluminium foil मध्ये झाकून ठेवावे. oven अर्थात १०-१५ मीनीटे चांगला तापून बंद करायचा मग अवकाशाने तळलेले वडे ठेवायचे. मी अश्या कांद्याच्या भजी करून ठेवल्या होत्या. मस्त राहील्या. light on करून पण ठेव oven चा.

कांदा भजी तर नरम लगेच पडतात ना पण ह्या प्रकाराने मस्त राहील्या.


Lopamudraa
Monday, December 24, 2007 - 9:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रगडा पॅटीस ची रेसीपी मला कुठेच सपडली नाही.):

Madat_samiti
Monday, December 24, 2007 - 3:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इथे आहे-
रगडा पॅटीज

Prady
Tuesday, December 25, 2007 - 1:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनू,लोपा,माणूस धन्यवाद तुम्हाला सगळ्यांना.

Manjud
Wednesday, December 26, 2007 - 7:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सिताफळ बासूंदीचं प्रमाण कोणीतरी मला सांगा. आणि सिताफळ्यातल्या बिया आणि गर वेगळं करण्याची सोपी आणि वेळ वाचवणारी पद्धतही...........

Dineshvs
Wednesday, December 26, 2007 - 8:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बासुंदीमधे फ़ळे घालतो त्यावेळी त्या फ़ळाना पाणी सुटुन, बासुंदी थोडीफार पातळ होणार, हे लक्षात घ्यावे लागते, त्यामूळे खुपदा अगदी आयत्यावेळी फळे बासुंदीत मिसळतात. तसे सिताफळाचे प्रमाण वगैरे नाही. सिताफ़ळाचा एक वाटी गर तीन वाट्या बासुंदीला पुरेल. जर सिताफळे गोड असतील, तर जास्तीची साखरही नको. पण हे वैयक्तिक आवडीनिवडीवर अवलंबुन.
सिताफ्ळाच्या बिया काढण्यासाठी काहि ज्युसरची मदत होवु शकते. नाहितर जेवणाच्या काट्याने गर एका थाळीत दाबुन बिया वेगळ्या करता येतात. सिताफ़ळातील काहि पाकळ्यात बियाच नसतात. त्या पाकळ्या जरा जास्त शुभ्र दिसतात. त्या वेगळ्या काढुन घ्याव्यात. मग बाकिच्या मॅश केल्या तरी चालतात.


Manjud
Wednesday, December 26, 2007 - 9:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

थॅंक्यू दिनेशदा. बासुंदी आटवून गार झाल्यावर सिताफळाचा गर मिसळायचा ना त्यात?

मी मिल्कशेक करताना जरा जास्तच पिकलेली सिताफळं घेते. म्हणजे बिया आणि गर वेगळा करायला वेळ लागत नही. मला वाटलं यापेक्षा काही सोपी पद्धत असेल. आता सिताफळ बसुंदी करून बघेन आणि रीपोर्ट टाकेन इथे...


Dineshvs
Wednesday, December 26, 2007 - 10:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो अगदी पुर्ण गार झाली कि. बासुंदीत थंड झाल्यावर संत्री, सफरचंद वगैरे फळेही मिसळता येतात.
अर्थात विरुद्धाहार वगैरे डोक्यात न आणता !!!


Manjud
Wednesday, December 26, 2007 - 10:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेशदा विरुद्धाहाराबद्दल मी फक्त ऐकूनच आहे. फारसं मनावर घेत नही.

Aakshi
Wednesday, December 26, 2007 - 4:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुणाला शिकागोमधे रंगाची लाल तिखट पावडर कुठे मिळेल माहित आहे का? Thanks in advance

Sanash_in_spain
Wednesday, December 26, 2007 - 5:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी काही दिवसांपुर्वी नाशिकला एका रेस्टॉरंट मध्ये एक नविन (माझ्यासाठी नविन) प्रकारची भाजी खाल्ली. 'हरे नारियल कि सब्जी'. ती शहाळ्यातच सर्व्ह केली होती. तिचे मेन कन्टेन्ट होते शहाळ्याच्या आतली मलाई (खोबरे), मटर, पनीर, वगैरे. मेथी पण होती वाटते थोडीशी. चव आपल्या मेथी मटर मलई किंवा नवरत्न कोर्म्यासारखी पण थोडी कमी गोड होती.

कोणाला माहिती असेल तर ह्याची रेसिपी द्या ना प्लीज...


Dineshvs
Thursday, December 27, 2007 - 9:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सनश, कुठल्याहि मलाई घालुन केलेल्या भाजीत, शहाळे म्हणजे कोवळा नारळ घालुन, आपल्या आवडीची भाजी करता येईल.
हे तुकडे भाजी पुर्ण शिजल्यावरच घालायचे. अगदी कोवळे खोबरे असेल तर शिजवताना ते विरघळते आणि थोडे कोवळे असेल, तर शिजल्यावर वातड होते. त्यामुळे शिजवणे टाळायलाच पाहिजे.
कोकणात सहसा कोवळा नारळ, जेवणात वापरायच्या दृष्टीने, नापसंतच केला जातो.

कोवळ्या शहाळ्यात कोलंबी भरुन ती शिजवण्याची एक कृति मी मागे लिहिली होती.


Manuruchi
Friday, December 28, 2007 - 6:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

{maalaa maazyaa maitrinine tichyaa waaditil paalakachyaa 4 te 5 judyaa aanun dilyaa aahet tari to kashyaa prakaare tik waayache te saangaal kaa plej, paalaak ukadawun frij madhye theu shak ta yeto kaa

Vrushs
Saturday, December 29, 2007 - 1:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला लसणीची पात मिळाली आहे.ती कोणकोणत्या पदार्थात वापरता येईल?

Dineshvs
Saturday, December 29, 2007 - 3:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लसणीची पात खास करुन उंधियु साठी वापरतात.
त्या बारिक चिरुन ऑम्लेटमधे घालता येतात.
विदर्भात त्याचे सांडगे घालतात.
एरवी कुठल्याही चटणीत, ती घालता येते.


Swa_26
Saturday, December 29, 2007 - 5:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लसणीची पात बारिक चिरुन जिरा राइसमधे घातली तर छान चव येते.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators