|
Akhi
| |
| Friday, December 14, 2007 - 9:01 am: |
|
|
ही वाळवलेली मेथी फोडणी च्या वरणात पन खुप छान लागते.
|
Dineshvs
| |
| Friday, December 14, 2007 - 1:14 pm: |
|
|
फ़्लॉवरची भजी, फ़्लॉवर मटारच्या करंज्या. फ़्लॉवरचे आईसक्रीम, खीर, मेथीची गोळा भाजी. मेथीच्या तरंगवड्या. मेथी मलाई मटार. मेथीचा झुणका. बघा किती प्रकार करता येतात ते.
|
Prajaktad
| |
| Friday, December 14, 2007 - 4:09 pm: |
|
|
अल्पना!इकडे उसगावात दे पाठवुन!... मेथीचे वरण ही छान होते..वरुन खमंग लसणाची फ़ोडणी..मेथी-आलु कोरडी भाजी(यात बरिच मेथी खपेल,बटाटा थोडाच घालायचा..) मेथीची पचडी.. फ़्लॉवरचे मात्र वेगळे( वर सुचवल्यापेक्षा) प्रकार काही सुचत नाही आहेत.
|
Chinnu
| |
| Friday, December 14, 2007 - 4:23 pm: |
|
|
अल्पना, तुला मेथी वाळवून ठेवता येईल. नंतर थोड्या पाण्यातून काढून वरील मेथीच्या कुठल्याही प्रकारात वापरू शकशीलच. फ़्लॉवरसाठी मात्र त्याचे मोठे तुरे आधी लिंबू पाण्यात बुडवून मग भज्यांच्या पीठात बुडवून भजी तळून पहा. लिम्बू पाणी नाही वापरले तरी चालेल. हेच कोफ़्ते म्हणून त्यांची भाजी पण होवू शकेल. मंचुरियन बर्यापैकी होते फ़्लॉवरचे. अजून एक प्रकार म्हणजे साध्या फ़ोडणीमध्ये फ़्लॉवरचे तुरे घालून ताजी मिरी पावडर नाहीतर जारा जाडसर कुटून घालायची. ही भाजी कोरडीच करतात. वरणभातात साइडला बरी असते. आवड असेल तर वर लिंबु पिळावे. पण मिरी पावडर जरा जपून वापरणे. उष्ण असते. Hope this helps!
|
Chinnu
| |
| Friday, December 14, 2007 - 4:26 pm: |
|
|
जादू, अमेरिकन लोकांना काय आवडेल आपलं काही सांगता येत नाही. जे जे सुशोभीत करून आणि जास्त हात न वापरता (काटे चमच्याने) खाता येईल असं काहीही त्यांना आवडेल असे वाटते. ढोकळा करायला सोपा आणि बर्यापैकी प्रमाणात होते. शिवाय चटणी 'डिप' म्हणून ठेवायची की झाले. मेसेज उशीराने पाहिला गं.
|
Alpana
| |
| Friday, December 14, 2007 - 5:44 pm: |
|
|
चिनु, दिनेश, अखि थन्क्स.... काल रात्री पासुन घरी मेथी उत्सव सुरु केलय.... रात्री डाळ्मेथी, सकाळी पराठे...आज रात्री नवर्यच्या म्हणण्यावरुन परत मेथीची आई करते तशी मुगाची डाळ, कुट, लसुण वैगरे घलुन केली होति भाजी... पण पुर्ण आठवडा तर नाही ना खाता येणार मेथी... मेथी वालवायचा उपाय चान्गला आहे.... आज दिवसभरात बर्यापैकी निवडली.. उरलेलि उद्या निवडेल आणी लगेच वाळवायला ठेवेल.. पण फ्लॉवर मात्र कळत नाहीये.... एकतर मला त्याच्या चविने, वासाने मळमळतय.. आणी गेला महिनाभर जवळपास एक दिवसाआड गोबीचा कुठलातरी प्रकार खावा लागलाय... प्राजक्ता पत्ता पाठव, लगेच पोस्टुन देते
|
Shyamli
| |
| Friday, December 14, 2007 - 5:55 pm: |
|
|
एखाद्या हॉटेलवाल्याला विकून टाक नाहितर तसाच देउन टाक,नाहितर जवळपास एखादा आश्रम वगैरे असेल तर तिथे नेउन दे वाया जाण्यापेक्षा बरं
|
Deepant
| |
| Friday, December 14, 2007 - 6:35 pm: |
|
|
मला कोणितरी ३-४ दिवस चांगले राहतील असे जेवणातले पदार्थ सुचवाल का?विशेषत्: भाज्या. मेथीचे थेपले, भोपळ्याचे घारगे सोडुन. आणी पोळ्या-पराठे २-३ दिवस चांगले रहतात का? कोणी गाइड कराल का प्लीज...?
|
Wel123
| |
| Friday, December 14, 2007 - 7:10 pm: |
|
|
tumhi tikhat puri banau shakta kanaket jast mohan ghalun tikhat,meeth lasun til he serwa ghalun tyacha purya karu shakata.
|
Savani
| |
| Friday, December 14, 2007 - 8:14 pm: |
|
|
अल्पना, माझ्या इथल्या एक ओळखीच्या काकू फ़्लॉवर फ़्रीझ करून ठेवतात. मटार प्रमाणे. म्हन्जे हवं तेव्हा वापरता येतो. त्या नक्की कसं करतात मला माहीत नाही. पण ही लिंक सापडली, बघ तुला उपयोगी वाटते का. http://www.wikihow.com/Freeze-Cauliflower
|
Arch
| |
| Friday, December 14, 2007 - 8:16 pm: |
|
|
लोणच कर ग अगदी छोटे छोटे तुकडे करून. वासही येत नाही फ़्लॉवरचा आणि टिकतपण बरेच दिवस.
|
Chinnu
| |
| Friday, December 14, 2007 - 8:59 pm: |
|
|
हो अल्पना, लोणचं कर त्याचं. छान idea आर्च! माझी एक मामी, फ़्लॉवर blanch करून कोरडे करून(पुसून घेवून) लोणचं करते. कृती नै मैत सावनीची idea पण छान आहे फ़्रीज़ करायची. double zipper ziplock bag मिळाली तर कापुन कोरडे करून डीप फ़्रीझ कर. दीपांत, पोळीला तुप लावून हवाबंद डब्यात ठेवल्यास टिकते (एक दिवस तरी) ३ चार दिवसाचे माहित नाही साध्या तेलपोळ्या आणि पराठे खुप तेल लावून भाजलेले बरेच टिकतात. अर्थात त्यांना पण थंड झाल्यावर कोरड्या हवाबंद डब्यात नाहितर ziplock bag मध्ये ठेवलेले सोयीस्कर.
|
Prady
| |
| Friday, December 14, 2007 - 10:01 pm: |
|
|
http://food-n-more.blogspot.com/ इथे बघ लोणच्याची रेसेपी.
|
Deepant
| |
| Friday, December 14, 2007 - 10:56 pm: |
|
|
thanks wel123 and chinu for quick reply.I will try that. प्लीज, जरा भाज्या पण सुचवाल का कोणी at least २ दिवस टिकणार्या.
|
Wel123
| |
| Saturday, December 15, 2007 - 2:02 am: |
|
|
beans kiwa gawar barik cut karun telat jeere ani lasun fodani karun tyat fry karu shakta pani mulich taku naka nantar tikhat meeth masala danyache kut taka chan rahate
|
Prady
| |
| Saturday, December 15, 2007 - 2:43 am: |
|
|
दीपांत उसळी छान टिकतात. मटकी,राजमा, चवळी, छोले,मसुरीची आमटी वगैरे. माझ्या परीक्षा जवळ आल्या की बर्याचदा ह्या उसळींचाच आधार घेते मी. एखाद्या दिवशी करून ठेवता येतात. तसंच काकडीच्या बिया काढून बारीक चिरून ठेवता येते. आयत्या वेळी दही घालून घ्यायचं, भोपळ्याच्या आणी बिटाच्या फोडी उकडून वरून फोडणी घालून ठेवायची आयत्या वेळी रायतं किंवा कोशिंबीर करून घ्यायची दही घालून. डोशाचं पीठ, पसरेट्टूचं पीठ पण छान टिकतं, पावभाजी आहेच थोडी चटपटीत म्हणून कधीतरी. फळभाज्या मला शक्यतो ताज्या ताज्याच शिजवल्या की खायला आवडतात. पण फरसबीची भाजी, पालकाची पातळ भाजी, फ्लॉवरची भाजी, ओल्या वाटाण्याची उसळ वगैरे छान टिकतं. थोडे मोड आलेले मूग स्टोर करता येतील. आयत्या वेळी थोडं लिंबू चाट मसाला काळं मीठ घालून तोंडी लावणं होतं. कधी त्यातच कांदा किंवा चिरून ठेवलेली काकडी घालून थोडं वेरियेशन होतं. कधी कॅन मधल्या अननसाच्या फोडींमधे गाजर,मटार मायक्रोवेव मधे उकडून घालायचे आणी घट्ट दही किंवा मेयो घालून कोशिंबीर करता येते. खरंतर करण्या सारखं पुष्कळ आहे. पण होतं असं कधी कधी की वेळ आल्यावर सुचत नाही. अजून सुचलं तर लिहीन. तुला उपयोग होईल अशी आशा आहे.
|
Prady
| |
| Saturday, December 15, 2007 - 2:54 am: |
|
|
विचारा तुम्ही सांगतो आम्ही मधे "आठवड्याच्या स्वयपाकाची पूर्वतयारी" म्हणून बीबी होता तो लॉक केलेला दिसतोय. ईतर कुठे हलवण्यात आलेत का ते पोस्ट्स? बहुदा तिथेच मला वाटतं शोनूचं एकूणच ती कसं मॅनेज करते आठवड्याचा स्वयपाक ह्यावर छान पोस्ट होतं. कुणी लिंक देऊ शकेल का ती?
|
Shyamli
| |
| Saturday, December 15, 2007 - 7:29 am: |
|
|
/hitguj/messages/103383/127988.html?1162661117 प्रज्ञा हेच शोधत होतीस का?
|
Prady
| |
| Saturday, December 15, 2007 - 6:41 pm: |
|
|
धन्यवाद श्यामली. हेच हवं होतं. माझ्याकडे उघडत नव्हता तो बीबी रात्री.
|
Deepant
| |
| Monday, December 17, 2007 - 6:11 pm: |
|
|
Thanks a loooot wel123 and prady. मला या सगळ्याचा खरेच बराच उपयोग होइल. वेल१२३ ,मी गवार, बीन्स,वालपापडी, घेवडा या भाज्या नेहमी अशाच वाफ़ेवर करते व नंतर कूट घालते(फ़क्त गवार -बीन्स मधे).पण शंका होती कि टिकेल का नाही. धन्यवाद वेल१२३. प्रॅडी, मस्तच ग.खुपच उपाय सुचवलेस. मटकी चा प्रयोग करुन बघितलाय. बाकी मी नक्कि करुन बघेल.धन्यवाद प्रॅडी.
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|