|
Ami79
| |
| Tuesday, December 18, 2007 - 8:28 am: |
| 
|
मला सुक्या मासळीची काय काय प्रकार बनवता येतील हे जाणून घ्यायचे आहे
|
Swa_26
| |
| Tuesday, December 18, 2007 - 9:01 am: |
| 
|
अमी, सुक्या मासळीचे वेगवेगळे प्रकार येतात. बोंबील, सुकट, जवळा, सोडे असे आणि इतरही!! तुला नक्की कुठला प्रकार करायचा आहे?
|
Swa_26
| |
| Tuesday, January 22, 2008 - 12:00 pm: |
| 
|
सुके बोंबिल स्वच्छ करुन कापुन तव्यावर थोडे परतुन घ्यायचे. नि मग पाण्यात टाकायचे. थोड्या वेळाने बोंबिल सोलुन त्यातला काटा काढुन टाकायचा. आता थोड्या तेलात लसुन ठेचुन टाकायची मग थोडा कांदा बारिक चिरुन घालायचा. थोडा वेळ परतुन मग लाल तिखट, हळद घालायची. आता ह्यात बोंबिल घालायचे नि वरुन थोडा कोकम कुस्करुन घालायचा आणि शिजवायचे. भाकरीसोबत खायला घालायचे नि खायचे
|
Swa_26
| |
| Wednesday, January 23, 2008 - 5:21 am: |
| 
|
वरील कृतीमधे मीठ लिहायचे राहुन गेले. अंदाजाने घालावे, कारण सुक्या मासळीला आधीच मीठ लावलेले असते.
|
Manuswini
| |
| Wednesday, January 23, 2008 - 9:55 pm: |
| 
|
सुखे बोंबील नी वांगी, सोडे नी वांगी बटाटा, मोदकांचे सार, करंदी सुखी नी बटाटा रस्सा, भाजून परतलेले बोंबील, सुख्या बांगड्याचा रस्सा. बरेच प्रकार आहेत.
|
Ami79
| |
| Friday, February 01, 2008 - 10:02 am: |
| 
|
मनु, विस्ताराने लिही ना. स्वाती धन्स गं. मी नक्की करुन पाहिन
|
Manuswini
| |
| Monday, February 04, 2008 - 11:39 pm: |
| 
|
अग ami, sorry आलेच नाही इथे. अग इथे सोडे, कोलंबी भागात लिहिल्या आहेत रेसीपी. जवळपास तश्याच आहेत. पुन्हा पुन्हा तेच तेच आलटून पालटून लिहिले की आपल्या नावावर कृती खपवणे बरे नाही म्हणून लिहित नाहीये :-) काही टिप्स हव्या तर नक्की सांगेन. नाहीतर अपाले दिनेशदा आहेतच मदतीला.
|
Shonoo
| |
| Monday, February 18, 2008 - 11:44 pm: |
| 
|
सुक्या मासळीचे हे दोन सोपे प्रकार १. सुकट अगदी बारीक कोलंबी, ताज़ी असताना जवळा म्हणतात ती सुकवली की सुकट होते. वाटी भर सुकट चांगले पाखडून घ्यावे म्हणजे वाळू जाईल. मग त्यात इतर काही कचरा, इतर माशांचे तुकडे वगैरे असतील तर निवडून घ्यावे. दोन्-चार लसूण पाकळ्या ठेचून तेलात फोडणीला टाकाव्यात ( तेल जरा सढळ हाताने घालावे ). लसूण गुलाबी होत आल्यावर वाटी भर बारिक चिरलेला कांदा घालू परतावा. कांदा मऊ झाला की त्यावर सुकट घालावे व मालवणी मसाला ( नसल्या लाल तिखट, कळद, धने जिरं पूड, चिमूटभर गरम मसाला एकत्र करून ) घालावा. तिखटाचे प्रमाण आपापल्या आवडी प्रमाणे. एखादे कोकम घालावे. मग झाकण ठेवून दोन मिनिटे वाफ काढावी. तांदळाच्या भाकरी बरोबर वाढावे. काही जण सुकट चाळणीत टाकून गार पाण्याखाली धूउन घेतात. पण तसे केल्याने ते कुरकुरीत होत नाही. सुके बांगडे चिमट्यात धरुन बांगडा गॅसवर भाजावा. ( पापड भाजल्या प्रमाणे) . भाजल्यावर थोडे खोबरेल तेलाचे थेंब सोडावे. असाच वरण भाताशी खाता येतो. नाहीतर, हलकेच काटे काढून माशाचे बारीक तुकडे करावे. बारीक चिरलेला कांदा, ओलं खोबरं, बारीक चिरलेली हिरवी मिर्ची सर्व एकत्र कालवावे. असल्यास एक कोळसा गॅसवर चांगला तापवावा. नीट पेटला की त्यावर चमचाभर खोबरेल तेल ओतून तो निखारा लगेच कोशिम्बीरीत ठेवून त्यावर गच्च झाकण ठेववे. दोन एक मिनिटांनी झाकण उघडुन कोळसा काढून टाकावा. कोशिंबीर तयार.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|