|
Dineshvs
| |
| Saturday, December 27, 2003 - 3:49 am: |
| 
|
मेथी मलाई मटार खुपदा पुस्तकात यासाठी कसुरी मेथी वापरायला सांगितलेली असते, पण मला ताजी मेथी वापरायला आवडते. एक वाटी मटाराचे दाणे वाफ़वुन घ्यावेत. चार कांदे किसुन घ्यावेत. एका काळ्या वेलचीचे दाणे, एक दोन लवंगा, दोब साध्या वेलच्या, अर्धा ईंच दालचिनी (किंवा एखादे चक्रीफ़ुल) गरम करुन त्याची पुड करावी. एक वाटी ताज्या मेथीची फ़क्त पाने घ्यावीत. तेलाची लाल मिरचीचे तुकडे घालुन फ़ोडणी करावी. त्यात किसलेला कांदा त्याला सुटलेल्या पाण्यासकट टाकावा. तो अगदी मंद आचेवर परतत रहावा. त्याचा कच्चट वास गेला की त्यात वरच्या मसाल्याची पुड घालावी.मग मेथीची पाने न चिरता घालावीत व परतत रहावे. ती पाने शिजली की मटार घालावेत व सगळे एकत्र करावे. एक कप भरुन दुध घालुन मंद आचेवर शिजु द्यावे. शक्य असल्यास काजुची पेस्ट किंवा मगजाची पेस्ट घालावी. मीठ घालावे. हवे असल्यास थोडेसे पाणी घालावे. सर्व्ह करताना पाव कप क्रीम घालुन परत थोडे गरम करावे. यात हळद अजिबात घालायची नाही. हा सगळा प्रकार मंद आचेवर फ़ुरसतीने करायचा प्रकार आहे.
|
Asmaani
| |
| Monday, September 04, 2006 - 7:43 pm: |
| 
|
दिनेशदा, आज दुपारच्या जेवणात तुमच्या रेसिपी प्रमाणे मेथी मलाई मटर केली होती. खुपच सही झाली होती. thanx for recipie .
|
thanks दिनेशदा काल तुमच्या कृतीनुसार मेथी मलई मटर केली खुपच छान ज्घाली होती.
|
Dineshvs
| |
| Thursday, September 14, 2006 - 4:50 pm: |
| 
|
अरे वा, आपल्याकडे पुर्वी मेथी, दुध, मटार, काजु हे एकत्र करणे कधीच सुचले नसते, पण हॉटेलवाल्यानी हा पदार्थ लोकप्रिय करुन दाखवला खरा.
|
Sojo
| |
| Friday, September 15, 2006 - 6:53 am: |
| 
|
Thanks for the recipee दिनेशदा, काळी वेलची म्हणजेच बडी (मसाल्याची) वेलची ना? आणी ही रेसिपी फार स्पैसी होत नाहि ना? मगजाचि पेस्ट कशी करायची.
|
मी काजु गरम पाण्यात भिजवले साधारण दोन तासानी सरळ मिक्सरमधे घातले बरोबर थोड दुध घातलं आणि केली पेस्ट. बहुदा मगज बीचही असंच असावं. पण छान होते हे खरय ही भाजी माझ्यासारख्या गोड भाज्या आवडणार्यांसाठी तर उत्तमच पुन्हा एकदा धन्यवाड दिनेशदा आणि हो मी मसाला वेलचीच घातली होती.
|
Sojo
| |
| Friday, September 15, 2006 - 10:42 am: |
| 
|
Thanks Manisha, मीही करून पाहेन ही
|
Prarthana
| |
| Tuesday, November 14, 2006 - 5:48 am: |
| 
|
हल्ली शाही बिर्यानि मसाला मिळतो. त्यातही मसाल्याचेच साहित्य असते. तो वापरला तर चालेल ना?
|
मला एक basic प्रश्ण आहे. ह्यात किंवा अनेक रेसीपी मधे क्रीम घालावे असे लिहिलेले असते. हे क्रीम म्हणजे काय असते?
|
Manuswini
| |
| Tuesday, November 14, 2006 - 7:57 pm: |
| 
|
अग cream म्हणजे दूधाची मलई किंवा दूध खुप तापवुन जी साय येते ती फेटलेली असते
|
Sami
| |
| Tuesday, November 14, 2006 - 7:58 pm: |
| 
|
रचना light किंवा table/coffee cream असे लिहिलेले असते ते आणायचे. dairy section मधेच असते.
|
ohh ok thankyou ... ... ...
|
ह्या भाजीसाठी फ़्रोज़न मेथी वापरली तर चालते का
|
Dineshvs
| |
| Monday, February 19, 2007 - 5:32 pm: |
| 
|
फ़्रोझन मेथी वापरायला हरकत नाही. पण सुचनेप्रमाणे थॉ करुन घ्यावी. व नीट शिजवुन घ्यावी.
|
म्हणजे भाजीत घालायच्या आधी थोडी शिजवून घ्यायची का
|
Dineshvs
| |
| Tuesday, February 20, 2007 - 3:38 am: |
| 
|
तशी आधी शिजवायची गरज नाही. भाजीतहि शिजेल. पण ताज्या भाजीपेक्षा थोडा जास्त वेळ लागेल.
|
Velachi
| |
| Thursday, April 12, 2007 - 3:46 pm: |
| 
|
मी काल करुन पहिलि हि रेcइपि...खूप छान झाली होति...दिनेशदा तुम्हाल सगल श्रेय त्याबद्दल
|
Haripriya
| |
| Thursday, April 12, 2007 - 4:23 pm: |
| 
|
२२ लोकांसाठि हि भाजी करायची आहे. कुणीतरी प्रमाण देवु शकेल का?
|
Dineshvs
| |
| Thursday, April 12, 2007 - 5:22 pm: |
| 
|
हरिप्रिया ( नाव छान आहे बरं का ) वरचे प्रमाण तीन चार जणांसाठी आहे. त्यामुळे २२ जणांसाठी त्याच्या सहा पट प्रमाणात सर्व घटक घ्यावेत.
|
Haripriya
| |
| Saturday, April 14, 2007 - 1:14 am: |
| 
|
धन्यवाद दिनेश. मस्त झाली होती भाजी आणि नीट पुरली पण.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|