|
Manuswini
| |
| Tuesday, September 11, 2007 - 6:53 pm: |
| 
|
प्राजे,झाले ना, हे अगदी दंगा उसळायला कारण आहे का ग अग मी गमतीनी लिहिले, तरी मला वाटलेच अजून कसा काय प्रतेसाद आला नाही कुठून? जरा मेले गम्मत करू शकत नाही. kididng ग. honestly . हां! वाटली डाळ प्रकारावर अजून तरी कुणाची मक्तेदारी नाही आहे. मिनोतीच छान आहे, कराडकर पेक्षा.
|
Upas
| |
| Tuesday, September 11, 2007 - 8:48 pm: |
| 
|
अगदी अगदी प्राजक्ता आमच्यात सुद्धा ( दे. य. ) करतात वाटली डाळ.. फक्त आपण भरभरून करतो आणि देतो.. हातावर टेकवत नाही.. ~D वरच्या पदार्थांव्यतिरीक्त खमंग काकडी आणि शेवटच्या दिवशी साताळलेली डाळ..
|
Manuswini
| |
| Tuesday, September 11, 2007 - 9:09 pm: |
| 
|
उपास, lol काय दंगा करायचा विचार आहे का? कोकणस्थ Vs देशस्थ का? पण मग मी 'रा. सा. ब्रा' represent करेन. just kidding
|
Manuswini
| |
| Tuesday, September 11, 2007 - 9:17 pm: |
| 
|
उपास, हा साताळलेली डाळ काय प्रकार आहे, नवीन दिसतो. वाटलेली डाळचा cousin का? (दे. य) कडचा का? जरा रेसीपी बीबी वर जावून रेसीपी लिहीलीस तर आवडेल try करायला. बाप्पा येतातच आहेत आता, येत्या गणपतीत हा बनवून (दे. य) चा खास प्रकार म्हणून प्रसिद्धी मिळवून देईन . seriously विचारतेय, त्या smilye वर जावू नकोस.
|
Upas
| |
| Wednesday, September 12, 2007 - 3:23 am: |
| 
|
ह्या weekend ला नक्की टाकतो, घरी विचारून इथे लिहितो..
|
Manjud
| |
| Wednesday, September 12, 2007 - 10:20 am: |
| 
|
हेल्लो, मग मी तर दे. आणि को. चं कॉम्बिनेशन आहे. मग मी कोणाची बाजू घेऊ?? विसर्जनाला माझ्या माहेरी (दे. ऋ.) आंबा डाळ करतात आणि सासरी (एकारांत को.) वाटली डाळ करतात. पण दोन्हिकडे आम्हि वाट्या भरभरून डाळ वाटतो..........
|
Ashwini_k
| |
| Wednesday, September 12, 2007 - 10:57 am: |
| 
|
मंजू, मी देखिल सासर माहेरून कोकणस्थ ब्राम्हण आहे आणि आम्हीदेखिल या डाळी भरभरून खातो आणि वाटतो. अग पण विसर्जनाच्या काळात कैर्या कुठून आणता? मला तर ठाण्याच्या बाजारात कैर्या नाही दिसत आहेत. उपास, गिरगावात असताना वाडीच्या गणपतीला कोणी वाटल्या डाळीचा प्रसाद वाटला तर हाताच्या ओंजळीतच मिळायचा कारण आरतीला किती जण येतील याचा कोणीच अंदाज लावू शकत नसे. आणि मजा म्हणजे, जास्त प्रसाद असतील तर गोड, तिखट आम्ही त्याच ओंजळीत खायचो.
|
Manjud
| |
| Wednesday, September 12, 2007 - 11:39 am: |
| 
|
अश्विनी, अगं उन्हाळ्यात कैर्या मिळतात तेव्हाच त्या किसून मीठ घालून डीप फ्रीज मध्ये ठेवून देते मी. नाहीतर फक्त लिंबू पिळून सुद्धा छान लागते डाळ, मग तिला लिंबूडाळ म्हणायचं. आरतीला किंवा विसर्जनाला खरोखरच किती जण येतील त्याचा अंदाज न आल्यामुळेच अशी हातावर प्रसाद द्यायची पद्धत पडलीये. उपास, ती साताळलेली डाळ लवकर लिहा....
|
Zakki
| |
| Wednesday, September 12, 2007 - 3:40 pm: |
| 
|
आश्विनी, प्रश्न को. ब्रा. की दे. ब्रा. नसून पुणेकर की इतर असा आहे! तर त्यावरून ती डाळ हातावर प्रसादापुरती 'लावायची' की भरभरून द्यायची, हे ठरते.

|
Prajaktad
| |
| Wednesday, September 12, 2007 - 6:28 pm: |
| 
|
अग मी गमतीनी लिहिले, तरी मला वाटलेच अजून कसा काय प्रतेसाद आला नाही कुठून? जरा मेले गम्मत करू शकत नाही. kididng ग. honestly . >>>> अग ! हो ना गम्मतच आहे ... मागे कुणितरी देशश्थाच्या पुरणपोळ्यांना ' पुरणभाकरी ' म्हटले होते ... आता खरतर देशस्थांच्या पुरणपोळ्या म्हणजे अगदी ओठांनी खाव्या इतक्या मऊ !..no kidding .... सहकुटुंब जेवायला येवुन खात्री करुन बघा.... आता हे आमंत्रण सुद्धा देशस्थांच लक्षण की ! ... बाकी वाद नको बाप्पा येतिल आता २ दिवसात .. प्रसन्न मनाने स्वागत करुया !
|
श्यामलि, कराडकर खजुर रोल कसा करायचा? रमादान चालु झालय ना आज पासुन मस्त खजुर यायला लागलेत बाजारात.
|
Karadkar
| |
| Thursday, September 13, 2007 - 4:27 am: |
| 
|
अंजली, इथे बघ रेसिपी http://vadanikavalgheta.blogspot.com/2007/03/blog-post_30.html
|
कराडकर, खुप छान आहे हि रेसिपी. मागे एकदा OFFICE मधे एका मुलाने आणला होता हाच प्रकार. सगळ्याना आवडला म्हणुन त्याच्या आईला फ़ोन करुन विचारल, तर ती म्हणाली कि तिने काळा खजुर (इथे सिडलेस खजुर मिळतो) तुकडे करुन मंद आचेवर, थोड्याश्या तुपावर परतला. पुर्ण गार झाल्यावर त्यात पिस्ता, काजु, बदाम चे बारिक तुकडे करुन नीट मळुन घेतले आणि हवा तो आकार देवुन थोड्या पिठि साखरेत घोळवुन पेपरकप मधे घालुन फ़्रिज मधे ठेवले.
|
Vishee
| |
| Thursday, September 13, 2007 - 5:23 am: |
| 
|
मी नाही कधी ऐकलं वाटली डाळ प्रसादाला देतात. मी क. ब्रा., आता लग्नानंतर दे. ब्रा. माझ्या मामाकडे असतो गणपती. विसर्जनाला आम्ही आणि मामेभावांच्या दोन तिन मित्रांकडचे (जे को. ब्रा. आहेत) एकत्र जात असु. सगळ्यांचा प्रसाद म्हणजे खोब्र्याचे तुकडे, नारळाच्या वड्या अस काहितरी गोड असे. हा, अजुन दे.ब्रां. चा नाहि पाहिला गणपती. (आमच्या घरी नसतो .)
|
Manjud
| |
| Thursday, September 13, 2007 - 5:48 am: |
| 
|
गणपती बाप्पा विसर्जनाला आपल्या घरी जातात ते तोंड आंबट करून जातात म्हणून त्या दिवशी प्रसादाला वाटली डाळ्/ आंबा डाळ करतात. आणि प्रवासात त्याना शिधोरी म्हणून दही पोह्यांची पुरचुंडी बांधून देतात. तो दहिपोह्यांचा प्रसाद मात्र विसर्जन करणारा बाप्पाला पाण्यात बुडवून आल्यावरच वाटतात.
|
Ashwini_k
| |
| Thursday, September 13, 2007 - 8:25 am: |
| 
|
मंजू, ---अगं उन्हाळ्यात कैर्या मिळतात तेव्हाच त्या किसून मीठ घालून डीप फ्रीज मध्ये ठेवून देते मी. नाहीतर फक्त लिंबू पिळून सुद्धा छान लागते डाळ, मग तिला लिंबूडाळ म्हणायचं. --- -- ही idea चांगली आहे. किसून केलेली आंबोशी थोडावेळ पाण्यात भीजवून घातली तर same effect येईल का पाहीले पाहिजे. लिंबू डाळ मी पण करते, पानाच्या डाव्याबाजूचा प्रश्न झकास सुटतो.
|
Manuswini
| |
| Thursday, September 13, 2007 - 5:13 pm: |
| 
|
ती शिदोरी काय प्रकार असतो, साधा दही भात पण त्या दिवशी काय वेगळीच चव लागते. मी विसर्जनाहून घरी आले की हात मारायची. बरोबर आई चवळीची भाजी किंवा लाल माठाची भाजी द्यायची....... यार इथे गणपतीत ती मजा नाही................
|
Karadkar
| |
| Friday, September 14, 2007 - 2:29 am: |
| 
|
अग अंजली, मी पण पूर्वी खजुर भाजुन घ्ययचे. Pअन तो जरा जरी जास्ती गरम झाला ना तर मग कडक होतो म्हणुन सोडुन दिले. पिठीसाखरेच्या ऐवजी खोबर्यामधे जरी घोळवलेस न तरी सुरेख लागेल बघ.
|
Savani
| |
| Wednesday, September 19, 2007 - 3:58 pm: |
| 
|
मला जरा मदत हवीये प्लीज. सध्या घरी गणपती असल्याने रोज आरतीला येणारी लोक फ़ळं घेऊन येतात. त्यामुळे माझ्याकडे खुप फ़ळं झाली आहेत. तर शनिवारी आमच्या मराठी ग्रूप च्या कार्यक्रमासाठी मला त्या फ़ळांचा उपयोग करुन काही पदार्थ न्यायचा आहे. मला फ़क्त फ़्रूट सॅलड हाच ऑप्शन माहीत आहे. अजून वेगळं काय करता येईल?
|
Karadkar
| |
| Thursday, September 20, 2007 - 12:28 am: |
| 
|
सफ़रचंद खुप असतील तर त्याचा pie करुन नेता येईल. बेरीज खुप असतील तर तसे लिही इकडे मग त्यचे काय करायचे ते पण सांगु शकेन. केळी असतील खुप तर बनाना ब्रेड करता येईल. अन्डी खात नसाल किंवा गणपती असल्याने वापरायची नसतील तर तशा रेसीपीस पण मिळतात. थोडक्यात काय कोणती आणि किती quantity मधे फळे आहेत त्यावर सांगु शकु थोडक्यात काय मागणी तसा पुरवठा ~D~D
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|