Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through November 08, 2007

Hitguj » Cuisine and Recipies » Looking For Recipes » Archive through November 08, 2007 « Previous Next »

Chinnu
Monday, November 05, 2007 - 3:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्स गं मृण. काकडीचे कोरडे मस्तच होते. बडीशेप नी धन्याची आयडिया सहीच!

Prady
Monday, November 05, 2007 - 3:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जादू अगं मी इथे mixer वरच दळली होती भाजणी. चाळणी माझ्याकडे पण नाही. चकलीच्या बीबी वर बघ. मागच्या वर्षी बरीच चर्चा झाली होती भाजणीची. मी आर्चच्या पद्धतीनेच केल्या चकल्या. फक्त थोडी मिश्र पिठं वापरून. काही डाळी घरीच mixer वर दळल्या. छान होतात चकल्या. थोड्याशा करून बघ आधी. जमल्या तर कर परत.

Suyog
Monday, November 05, 2007 - 7:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी मिक्सर वर केली भाजणी नन्तर चाळुन घेतली आधी तळताना तुकडे होत मग थोड थालिपिथाच भाजणी घालुन माय क्रोवेव मदे १ मिनीट ठेवल ननतर चकली जमली

Suyog
Monday, November 05, 2007 - 7:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

thanks for tips and directions over here

Dineshvs
Tuesday, November 06, 2007 - 8:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कणकेच्याही चकल्या ( कोरडी वाफ़वुन ) करता येतात. पण त्यालाही चाळणी लागणारच.
बटाट्याची शेव हा अगदी सोपा प्रकार आहे. बटाटे उकडुन मॅश करायचे त्यात तिखट मीठ घालायचे आणि मावेल तेवढा मैदा घालायचा. आणि शेय गाळुन तळायची. चांगली शेव होते.


Manuswini
Tuesday, November 06, 2007 - 8:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ह्या वेळेला मावशीने(मुंबईच्या) गोडबोलेकडून फराळ आणला. नवीन सुनेला दिवाळीचा फराळ काही खास करायला आवडत नाही येत नाही(अशी तक्रार मावशीची).
करंजी ठीक सांगीतली पण बाकी पदार्थ छान आहेत म्हणाली. कडबोळीचे कौतूक international call वर almost पाच मीनीटे केली(फोन मी केला होता ना..).
मी आईला सुद्धा तेच म्हटले तु सुद्धा जावून आण, कशाला खटपट करतेस...

US ला पाठवायचे भाव वाढले आहेत (इती मावशी).

बरे हे पुराण ह्याच साठी की कोणाला हवे तर म्हणून.


Suyog_11
Wednesday, November 07, 2007 - 5:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला फिनिक्स मध्धे कोकम सरबत कुठे मिळेल याची कोणाला कल्पना असेल तर प्लिज सांगा...

Psg
Wednesday, November 07, 2007 - 8:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कणकेच्या चकल्या कश्या करायच्या? वाफवून घ्यायची कणीक म्हणजे कूकरमधे कणकेत पाणी न घालता, घट्ट झाकण लावून ठेवायचे का? आणि पुढे? त्यात काय काय घटक पदार्थ घालायचे? जरा एक्स्प्लेन करा प्लीज..

Akhi
Wednesday, November 07, 2007 - 8:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कणीक मलमल च्या कपड्या मधे घट्ट बांधावी.
कुकर ला शिटी न लावता १० मि वाफवुन घेने मग गरम कणीक असताना च ती मोकळी करावी. म्हणजे त्रास होत नाही. गार ज़लय्वर तिचा दगड होतो.
पीठा मधे तीळ मोहन हिंग मीठ धने पावडर टाकुन भिजवुन घेणे आणी जश्या भाजणी च्या चकाल्या करतो तश्याच चकल्या करव्या.


Dineshvs
Wednesday, November 07, 2007 - 2:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कणीक कोरडीच वाफवायची असते. तसेच घट्ट नाही जरा सैलसरच बांधायचे.
वाफ़वुन झाली कि ती चाळुन घ्यायची, त्यात वर akhi ने लिहिल्याप्रमाणे सगळे मिसळुन चकल्या कारायच्या.


Ami79
Thursday, November 08, 2007 - 4:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कणीक कोरडीच वाफवायची म्हणजे काय? गव्हाचे पीठ पाणी न मिसळता वाफवून घ्यायचे. जर ते भिजवले तर कणीक कोरडी कशी असेल? (कदाचित हा प्रश्न तुम्हाला बालिश वाटू शकतो.:-)

Dineshvs
Thursday, November 08, 2007 - 1:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो गव्हाचे पिठ कोरडेच फ़डक्यात बांधुन वाफ़वायचे. यात बालिश वगैरे काही वाटले नाही, मी पण अशीच सुरवात केली.

Divya
Thursday, November 08, 2007 - 1:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला कोणी सल्ला देउ शकेल का? भाजणीच्या चकल्या करताना त्या तेलात टाकेपर्यन्त तुटतायेत. चवीला छान झाल्यात, पण करायला त्रास होतो आहे काही उपाय आहे का?

Prady
Thursday, November 08, 2007 - 2:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पीठ खूप घट्ट झालय का. थोडा गरम पाण्याचा हात लावून मळून बघ.

Divya
Thursday, November 08, 2007 - 2:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रज्ञा पीठ घट्ट नाही झालय पण भाकरी मोडते तसे तुकडे होतायेत.

Dineshvs
Thursday, November 08, 2007 - 2:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिव्या पिठात तेल जास्त पडलय. किंवा भाजणी फ़ार जुनी आहे.
थंड पाण्याचा हात लावुन नीट मळुन एखादी चकली करुन बघायची. तीपण तुटली तर थोडा मैदा वा भाजलेला रवा घालुन परत मळुन घ्यायचे. चवीत थोडा फरक पडतो पण चकल्या जमतात.
आहेच त्या अवस्थेत एखादी कडबोळी वळुन पण बघता येईल.


Divya
Thursday, November 08, 2007 - 2:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश पीठ जुनेच असावे. माझ्याकडे यावर्षी भाजणी नव्हती. एका मैत्रिणीने मागच्या वर्षी भाजणी केली त्या पद्धतीने केल्या. तांदुळाची पीठी ४ वाट्या, २ वाट्या चणा डाळ पीठ, एक वाटी उडीद डाळ आणि एक वाटी मुग डाळ पीठ, सगळे मंद आचेवर भाजुन एकत्र केले आणि गरम पाण्यात तिखट मीठ आणि तीळ घालुन त्यात हे पीठ भिजवले फ़ार मस्त झाल्यात चकल्या चवीला पण ते मोडायचा त्रास होतो आहे. हि सर्व पीठे इथे indian stores मधे मिळतात. तुम्ही सांगीतलेला उपाय करुन बघते. मैत्रीणीचे म्हणने डाळीचे पीठ कमी पडले असावे. बघते करुन आणि सांगते.

Sahi
Thursday, November 08, 2007 - 4:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ह वरिल उपायानी नाहि झाले तर चक्क कोर्नस्ट्राच घालुन पहा...थोड्या पिठात म्हनण्जे लाडुएव्ह्ड्यात १४ टे स्पुन


Sahi
Thursday, November 08, 2007 - 4:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

I mean 1/4 th table spoon

Divya
Thursday, November 08, 2007 - 7:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

sahi thanks ग सल्ल्या बद्दल. थोडेसे बेसन लावले आणि केल्या चकल्या छानच झाल्यात, खमंग, कुर्कुरीत आणि tasty पण.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators