Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through October 26, 2007

Hitguj » Cuisine and Recipies » Looking For Recipes » Archive through October 26, 2007 « Previous Next »

Priyab
Tuesday, October 23, 2007 - 7:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दही कसे लावावे हे कोणि मला सांगेल का? मी २% milk use करते. माझ्या इथे temperature खुप कमी असते. सध्या ४०-५० मधे आहे. काहि दिवसांनी अजुन कमी होईल.मी काल try केले दहि लावायला ultimately जे काही बनले ते खुप liquid होते.

Dineshvs
Wednesday, October 24, 2007 - 10:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दीपांत आपण घरी जे पनीर करतो किंवा भारतात बाजारात जे पनीर मिळते, त्यावर भरपुर दाब दिलेला असतो त्यामुळे, ते वितळत नाही. पण कॉटेज चीजची प्रक्रिया थोडी वेगळी असल्याने ते वितळते. खरे तर पनीर ची व्याख्याच न वितळणारे चीज अशी करतात.
घरी पनीर बनवणे तितकेसे अवघड नाही पण UHT दुधाचे पनीर तितकेसे चांगले होत नाही.
पनीर न तळता, जर नुसतेच शेवटी पदार्थात टाकले तर वितळणार नाही. पनीर खाण्याच्या तो सर्वोत्तम मार्ग आहे.
Priyab दहि लावण्याबद्दल सविस्तर चर्चा इथे आहे. तपमान हाच एक काळजीचा घटक असेल, तर दहि लावलेले भांडे, लोकरीच्या कपड्यात गुंडाळुन ठेवणे, थर्मास मधे ठेवणे, तपवुन बंद केलेल्या ओव्हनमधे ठेवणे, असे उपाय आहेत.


Deepant
Wednesday, October 24, 2007 - 3:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Thank u Dineshvs, Next time,i will try to make Panner at home.

Vrushs
Wednesday, October 24, 2007 - 9:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला इथे कुठे अंड्याची भुर्जी नाही दिसली.कोणी मदत करु शकेल काय?

Deepant
Thursday, October 25, 2007 - 5:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Hi Vrushs, हि घे अंड्याची भुर्जी ची रेसिपी. अंड्याची भाजी या सेक्शन मधे लिहिली.

Cutepraju
Thursday, October 25, 2007 - 6:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला कोणी milkshakes कशि करायची याची क्रुती सान्गेल का? उदा. अन्जीर, सफ़रचन्द वगैरे, सुका मेवा, सिताफ़ळ..

Deepant
Thursday, October 25, 2007 - 11:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्लीज ,कोणी मसाला दूध कसे करायचे सांगेल का? दूधात नक्की काय काय घालायचे?

Dineshvs
Friday, October 26, 2007 - 3:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Cutepraju मिल्कशेक साठी तशी खास क्रुति नसते. साधारण गोडसर, म्हणजे आंबट नसलेल्या फ़ळाचे तुकडे गर वैगरे घ्यायचा. त्यातला बिया काढुन टाकायच्या. त्यात साखर घालुन मिक्सरमधुन पल्प करायचा, आणि मग त्यात थंड दुध घालायचे.
अंजीराची साले व वरचा देठ काढुन घ्यायचा.
अंजीर. सिताफळ, केळी, पपई, सफ़रचंद, चिकु, मेलन, स्ट्रॉबेरी वैगरे फळांचे मिल्कशेक्स चांगले होतात. खास दुधात घालण्यासाठी काहि सिरप्स मिळतात. ते घालुन मिल्कशेक्स चांगले होतात.
कॉफ़ी, कोको वैगरे घालुनही मिल्कशेक्स करता येतात. हवे तर त्यात जास्तीचे क्रीम वा आईसक्रीम घालता येते.
दीपांत, मसाला दुधासाठी दुध थोडेसे आटवुन घ्यायचे. त्यात चवीप्रमाणे साखर, बदामाचे काप, पिस्त्याचा चुरा, केशर वा वेलची घालायची.
हवा तर रंग घालायचा. पुर्वी चारोळ्या घालत असत, पण त्यातली एखादी खवट निघाली तर सगळे दुध नासते. मसाला दूध साधारण गरमच पितात. अलिकडे तयार मसाला मिळतो. त्यात बहुदा काजुची पूडही असते.


Vishee
Friday, October 26, 2007 - 3:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दह्याचा चक्का करताना दही आपण बांधुन ठेवतो. त्यातुन जे पाणी रहातं ( whey ) ते सहसा आपण टाकुन देतो, पण तेच जास्त nutritious असतं. ते कस बरं उपयोगात आणता येइल? (मी परवा श्रीखंड केलं त्याचं उरलंय पाणी)

हे लिहितानाच एक पर्याय सुचलाय. घावनाचं पीठ भिजवायला वापरता येइल. अजुन काही कोणाला सुचल्यास सांगा.


Dineshvs
Friday, October 26, 2007 - 3:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चपातीचे पिठ भिजवायला, आमटीत घालायला ते वापरता येईल.
पियुष करण्यासाठी, किंवा सरबत करण्यासाठी वापरता येईल.


Sharmila_72
Friday, October 26, 2007 - 5:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

या वर्षी मला नेहमीचे लाडू, शंकरपाळे, चिरोटे, चकल्या अस न करता जरा वेगळा फराळ करायचा आहे दिवाळीत. उदा. मावे के गुजिये, बर्फी, बालुशाही, पतिशा अस काहीस. जरा सुचवाल काही वेगळ?
दिनेश, तुमच्या प्रतिसादासाठी उत्सुक आहे.


Cutepraju
Friday, October 26, 2007 - 6:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद दिनेशदा!!! अन्जीर मिल्कशेक करताना सुखे अन्जीर घेउन पण चान्गला लागेल का?? कारण ताजे अन्जीर नेहमीच मिळतात अस नाही ना!

Sai
Friday, October 26, 2007 - 7:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

/cgi-bin/hitguj/show.cgi?tpc=103383&post=1017283#POST1017283
oven baked कानवले/करन्ज्या कुणी मदत करणार का? मनःस्विनि , Pls....

Dineshvs
Friday, October 26, 2007 - 12:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुके अंजीर थोडा वेळ दुधात भिजवले तर चांगले. वृद्ध लोकानी खरे तर असे अंजीर खाणे चांगले.
संत्री, अननस सारख्या फ़ळांचे डायरेक्ट मिल्कशेक्स करता येत नाहीत, पण त्यांचे सिरप्स मिळतात, त्याने असे शेक्स करता येतात.
मुंबईत आता अनेक प्रकारचे सिरप्स मिळतात. त्यात बटरस्कॉच, कलिंगड, ठंडाई, लिची असे अनेक फ़्लेव्हर्स आहेत. केळ्याचा सिरपही छान लागतो.


Vishee
Friday, October 26, 2007 - 1:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो दिनेशदा, आज चपातीच्या पिठात वापरलं. श्रीखंडा बरोबर पुर्‍या तळताना त्यात घालणार होते पण वाटलं तळताना फुटल्या तर आंबटपणामुळे. तसच आमटीतपण आंबुस वास येइल की काय वाटलं. रात्री पराठ्यात पण घालणारे.

Mekhala
Friday, October 26, 2007 - 3:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या मुलाला शेंगदाण्याची allergy आहे तर स्वयंपाकाला वापरायला पुण्यात canola oil कुठे मिळेल का?

Karadkar
Friday, October 26, 2007 - 4:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मेखला, सफोला चालणार नाही का? कारण ते तर कुठल्याही मोठ्या दुकानात मिळेल ना?

Mekhala
Friday, October 26, 2007 - 4:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सफोला म्हणजे sunflower seeds चे असते ना? भारतात जाण्यापूर्वी ते एकदा इथे त्याला देऊन बघितले पाहिजे. इथे US मधे मिळते का sunflower oil ?

Manuswini
Friday, October 26, 2007 - 5:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेशदा, sorry मध्येच घूसून सांगते,

शर्मीला,
गुजराती,मारवाडी, इतर वेगळे नी हेवी पदार्थ करायचा विचार आहे ना हे घे आणखी काही,
मोहनथाळ,
सोनपापडी,
अंजीर बर्फ़ी( without sugar ),
कमळफुले(ही मस्त लागतात)


Sms
Friday, October 26, 2007 - 5:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

whey pizza kiwa bhaturyanche che peeth bhijavtana vaparle tar jaasta phulun yete.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators