|
Priyab
| |
| Tuesday, October 23, 2007 - 7:29 pm: |
| 
|
दही कसे लावावे हे कोणि मला सांगेल का? मी २% milk use करते. माझ्या इथे temperature खुप कमी असते. सध्या ४०-५० मधे आहे. काहि दिवसांनी अजुन कमी होईल.मी काल try केले दहि लावायला ultimately जे काही बनले ते खुप liquid होते.
|
Dineshvs
| |
| Wednesday, October 24, 2007 - 10:45 am: |
| 
|
दीपांत आपण घरी जे पनीर करतो किंवा भारतात बाजारात जे पनीर मिळते, त्यावर भरपुर दाब दिलेला असतो त्यामुळे, ते वितळत नाही. पण कॉटेज चीजची प्रक्रिया थोडी वेगळी असल्याने ते वितळते. खरे तर पनीर ची व्याख्याच न वितळणारे चीज अशी करतात. घरी पनीर बनवणे तितकेसे अवघड नाही पण UHT दुधाचे पनीर तितकेसे चांगले होत नाही. पनीर न तळता, जर नुसतेच शेवटी पदार्थात टाकले तर वितळणार नाही. पनीर खाण्याच्या तो सर्वोत्तम मार्ग आहे. Priyab दहि लावण्याबद्दल सविस्तर चर्चा इथे आहे. तपमान हाच एक काळजीचा घटक असेल, तर दहि लावलेले भांडे, लोकरीच्या कपड्यात गुंडाळुन ठेवणे, थर्मास मधे ठेवणे, तपवुन बंद केलेल्या ओव्हनमधे ठेवणे, असे उपाय आहेत.
|
Deepant
| |
| Wednesday, October 24, 2007 - 3:29 pm: |
| 
|
Thank u Dineshvs, Next time,i will try to make Panner at home.
|
Vrushs
| |
| Wednesday, October 24, 2007 - 9:48 pm: |
| 
|
मला इथे कुठे अंड्याची भुर्जी नाही दिसली.कोणी मदत करु शकेल काय?
|
Deepant
| |
| Thursday, October 25, 2007 - 5:04 am: |
| 
|
Hi Vrushs, हि घे अंड्याची भुर्जी ची रेसिपी. अंड्याची भाजी या सेक्शन मधे लिहिली.
|
Cutepraju
| |
| Thursday, October 25, 2007 - 6:35 am: |
| 
|
मला कोणी milkshakes कशि करायची याची क्रुती सान्गेल का? उदा. अन्जीर, सफ़रचन्द वगैरे, सुका मेवा, सिताफ़ळ..
|
Deepant
| |
| Thursday, October 25, 2007 - 11:23 pm: |
| 
|
प्लीज ,कोणी मसाला दूध कसे करायचे सांगेल का? दूधात नक्की काय काय घालायचे?
|
Dineshvs
| |
| Friday, October 26, 2007 - 3:29 am: |
| 
|
Cutepraju मिल्कशेक साठी तशी खास क्रुति नसते. साधारण गोडसर, म्हणजे आंबट नसलेल्या फ़ळाचे तुकडे गर वैगरे घ्यायचा. त्यातला बिया काढुन टाकायच्या. त्यात साखर घालुन मिक्सरमधुन पल्प करायचा, आणि मग त्यात थंड दुध घालायचे. अंजीराची साले व वरचा देठ काढुन घ्यायचा. अंजीर. सिताफळ, केळी, पपई, सफ़रचंद, चिकु, मेलन, स्ट्रॉबेरी वैगरे फळांचे मिल्कशेक्स चांगले होतात. खास दुधात घालण्यासाठी काहि सिरप्स मिळतात. ते घालुन मिल्कशेक्स चांगले होतात. कॉफ़ी, कोको वैगरे घालुनही मिल्कशेक्स करता येतात. हवे तर त्यात जास्तीचे क्रीम वा आईसक्रीम घालता येते. दीपांत, मसाला दुधासाठी दुध थोडेसे आटवुन घ्यायचे. त्यात चवीप्रमाणे साखर, बदामाचे काप, पिस्त्याचा चुरा, केशर वा वेलची घालायची. हवा तर रंग घालायचा. पुर्वी चारोळ्या घालत असत, पण त्यातली एखादी खवट निघाली तर सगळे दुध नासते. मसाला दूध साधारण गरमच पितात. अलिकडे तयार मसाला मिळतो. त्यात बहुदा काजुची पूडही असते.
|
Vishee
| |
| Friday, October 26, 2007 - 3:44 am: |
| 
|
दह्याचा चक्का करताना दही आपण बांधुन ठेवतो. त्यातुन जे पाणी रहातं ( whey ) ते सहसा आपण टाकुन देतो, पण तेच जास्त nutritious असतं. ते कस बरं उपयोगात आणता येइल? (मी परवा श्रीखंड केलं त्याचं उरलंय पाणी) हे लिहितानाच एक पर्याय सुचलाय. घावनाचं पीठ भिजवायला वापरता येइल. अजुन काही कोणाला सुचल्यास सांगा.
|
Dineshvs
| |
| Friday, October 26, 2007 - 3:53 am: |
| 
|
चपातीचे पिठ भिजवायला, आमटीत घालायला ते वापरता येईल. पियुष करण्यासाठी, किंवा सरबत करण्यासाठी वापरता येईल.
|
या वर्षी मला नेहमीचे लाडू, शंकरपाळे, चिरोटे, चकल्या अस न करता जरा वेगळा फराळ करायचा आहे दिवाळीत. उदा. मावे के गुजिये, बर्फी, बालुशाही, पतिशा अस काहीस. जरा सुचवाल काही वेगळ? दिनेश, तुमच्या प्रतिसादासाठी उत्सुक आहे.
|
Cutepraju
| |
| Friday, October 26, 2007 - 6:49 am: |
| 
|
धन्यवाद दिनेशदा!!! अन्जीर मिल्कशेक करताना सुखे अन्जीर घेउन पण चान्गला लागेल का?? कारण ताजे अन्जीर नेहमीच मिळतात अस नाही ना!
|
Sai
| |
| Friday, October 26, 2007 - 7:09 am: |
| 
|
/cgi-bin/hitguj/show.cgi?tpc=103383&post=1017283#POST1017283 oven baked कानवले/करन्ज्या कुणी मदत करणार का? मनःस्विनि , Pls....
|
Dineshvs
| |
| Friday, October 26, 2007 - 12:32 pm: |
| 
|
सुके अंजीर थोडा वेळ दुधात भिजवले तर चांगले. वृद्ध लोकानी खरे तर असे अंजीर खाणे चांगले. संत्री, अननस सारख्या फ़ळांचे डायरेक्ट मिल्कशेक्स करता येत नाहीत, पण त्यांचे सिरप्स मिळतात, त्याने असे शेक्स करता येतात. मुंबईत आता अनेक प्रकारचे सिरप्स मिळतात. त्यात बटरस्कॉच, कलिंगड, ठंडाई, लिची असे अनेक फ़्लेव्हर्स आहेत. केळ्याचा सिरपही छान लागतो.
|
Vishee
| |
| Friday, October 26, 2007 - 1:04 pm: |
| 
|
हो दिनेशदा, आज चपातीच्या पिठात वापरलं. श्रीखंडा बरोबर पुर्या तळताना त्यात घालणार होते पण वाटलं तळताना फुटल्या तर आंबटपणामुळे. तसच आमटीतपण आंबुस वास येइल की काय वाटलं. रात्री पराठ्यात पण घालणारे.
|
Mekhala
| |
| Friday, October 26, 2007 - 3:35 pm: |
| 
|
माझ्या मुलाला शेंगदाण्याची allergy आहे तर स्वयंपाकाला वापरायला पुण्यात canola oil कुठे मिळेल का?
|
Karadkar
| |
| Friday, October 26, 2007 - 4:25 pm: |
| 
|
मेखला, सफोला चालणार नाही का? कारण ते तर कुठल्याही मोठ्या दुकानात मिळेल ना?
|
Mekhala
| |
| Friday, October 26, 2007 - 4:39 pm: |
| 
|
सफोला म्हणजे sunflower seeds चे असते ना? भारतात जाण्यापूर्वी ते एकदा इथे त्याला देऊन बघितले पाहिजे. इथे US मधे मिळते का sunflower oil ?
|
Manuswini
| |
| Friday, October 26, 2007 - 5:45 pm: |
| 
|
दिनेशदा, sorry मध्येच घूसून सांगते, शर्मीला, गुजराती,मारवाडी, इतर वेगळे नी हेवी पदार्थ करायचा विचार आहे ना हे घे आणखी काही, मोहनथाळ, सोनपापडी, अंजीर बर्फ़ी( without sugar ), कमळफुले(ही मस्त लागतात)
|
Sms
| |
| Friday, October 26, 2007 - 5:59 pm: |
| 
|
whey pizza kiwa bhaturyanche che peeth bhijavtana vaparle tar jaasta phulun yete.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|