|
दिनेश दा कान्दा लसुन सूका मसाल्याची रेसिपि द्याल क प्लीज? एका मैत्रिनिने दिला आहे हा मसाला, प्रविन चा सूका कान्दा लसून मसाला. एकदम टेस्टी आहे, घरि कसा बनवायचा?? कूणी सान्गेल का? मसाले च्या बिबि वर नाहिय हि रेसिपि. धन्स रुपाली
|
Miseeka
| |
| Wednesday, October 10, 2007 - 1:46 pm: |
| 
|
मी सेलरी आणलि आहे full bunch तर त्याचे काय करु मह्नजे ती जास्त प्रमाणात वापरता येइल? सुप करुन झाले त्यात थोडिच लागते आता उरलेल्या सेलरी चे काय करायचे आहे?सध्या बारिक काप करुन freezer मधे ठेवलि आहे.
|
Prady
| |
| Wednesday, October 10, 2007 - 1:55 pm: |
| 
|
सेलेरी स्टफ करता येईल. सेलेरीच्या दांड्याच्या खळग्यात क्रीम चीज,गाजराचा कीस,थोडा क्रश्ड पाईनॅपल,थोडा ग्रीन ओनिअन असं मिश्रण भरता येईल. आपल्या आवडीप्रमाणे अशी बरीच फिलिंग करता येतील. स्टार्टर म्हणून छान आहे.
|
Dineshvs
| |
| Thursday, October 11, 2007 - 3:19 am: |
| 
|
रुपाली, संध्याकाळी लिहितो. सेलरी, कुठल्याही भाजीत घालता येते. लांब तुकडे असतील तर बर्फ़ाच्या पाण्यात ठेवुन क्रंची करायचे आणे क्रीम डिप मधे बुडवुन खायचे. त्याचे काहि बारिक तुकडे कोरड्या मिठात मिसळुन घट्ट झाकणाच्या बाटलीत भरुन फ़्रीजमधे ठेवायचे. काहि दिवसानी मीठ त्याचा सगळा स्वाद शोषुन घेते व सेलरी सॉल्ट तयार होते. ते सुपमधे, पिझ्झावर, टोस्टवर वैगरे घालुन खाता येते.
|
Dineshvs
| |
| Thursday, October 11, 2007 - 11:17 am: |
| 
|
रुपाली, कोल्हापुरी मसाला, इथे लिहिला आहे /hitguj/messages/103383/54830.html?1192101326
|
Karadkar
| |
| Thursday, October 11, 2007 - 3:42 pm: |
| 
|
Mods, लालुने पण कांदा लसुण मसाल्याची कृती लिहिली होती त्याची लिन्क आता page not found अशी एरर देतेय पहाणार का?
|
Karadkar
| |
| Thursday, October 11, 2007 - 4:18 pm: |
| 
|
/hitguj/messages/103383/93126.html?1169674338 ही घ्या! चटणी खाली काय ठेवलिय ती? नावात चतणी आहे म्हणुन? हलवाहलवीचे बघणार का जरा
|
धन्स दिनेश दा आणि कराडकर.. हलवाहल्व करायला वेळच नाही आजकाल (: रुपाली
|
Zee
| |
| Friday, October 12, 2007 - 2:43 am: |
| 
|
काही दिवसा पुर्वी, इथे मला मसूराचा एक नविन प्रकार वाचायला मिळाला होता. त्यात मसूर शिजवुन मग त्यात चिन्च ओल खोबर अस घालुन उकळायचे होते. आणी वरुन फ़ोडणी होती.ती रेसीपी आता शोधली तर आता सापडत नाहीये. कोणी सान्गेल का ती रेसेपी कुठे लिहिली आहे ते.
|
Ami79
| |
| Saturday, October 13, 2007 - 4:08 pm: |
| 
|
मी मुळ्याच्या शेंगा आणल्या आहेत. पण त्याची भाजी कशी करावी ते मला कोणी सांगेल का?
|
Dineshvs
| |
| Sunday, October 14, 2007 - 8:38 am: |
| 
|
साधारण गवारी आणि फ़रसबीची भाजी करतो तशीच करायची. या शेंगा वाफ़वुन त्यात दहि घालुन, वरुन फ़ोडणी देऊन कोशिंबीरही करता येते. यालाच डिंगर्या म्हणतात. कदाचित या नावाने ती भाजी असेल इथे.
|
Ami79
| |
| Sunday, October 14, 2007 - 9:01 am: |
| 
|
धन्यवाद दिनेशदा. करुन पाहते
|
Manuswini
| |
| Tuesday, October 16, 2007 - 9:21 pm: |
| 
|
दिनेशदा, मला तेलपोळीची रेसीपी सांगाल का? ही नक्कीच गुळ पोळी पेक्षा वेगळी असते. आईने थोड्या दिवसापुर्वी देशातून पाठवल्या(विकतच्या होत्या) पण जबरी लागल्या. कुरुमकुरुम करत मी संपवल्या. आईने कधी तेलपोळी केल्या नाहीत घरी, फक्त पुरणपोळी नी गुळपोळी घरी केलेली असायची आमच्याकडे. तेव्हा तेल पोळी कशी करतात ते सांगा?
|
Sunidhee
| |
| Tuesday, October 16, 2007 - 11:14 pm: |
| 
|
झी मी एक मसूर ची भाजी भोपळ्यात टाकली होती काही. तिच का पहा.
|
Dineshvs
| |
| Wednesday, October 17, 2007 - 11:56 am: |
| 
|
तेलपोळी, पुरणपोळीचाच प्रकार आहे कि. फक्त त्यात कणीक जास्त मऊ भिजवावी लागते. लाटताना अजिबात पिठ न घेता, फक्त तेलावर लाटतात. तसेच ती अगदी पातळ लाटावी लागते. असे लाटायला खुपच कौशल्य लागते. अशी तेलावर पातळ लाटलेली पोळी, लाटण्यानेच उचलुन तव्यावर अलगद सोडतात. भरपुर तेल असल्याने व पातळ लाटल्याने ती लवकर भाजली जाते व कुरकुरीत लागते. हि पोळी लाटायला एक सपाट पत्रा मिळतो.
|
Manuswini
| |
| Thursday, October 18, 2007 - 8:08 pm: |
| 
|
थक्स दिनेशदा, मी करून बघेन
|
Deepant
| |
| Monday, October 22, 2007 - 6:24 pm: |
| 
|
कोटेज चीज म्हणजे पनीर का? 'स्मॉल कर्ड कोटेज चीज ' वापरुन काय करत येईल? please tell me.
|
Ami79
| |
| Tuesday, October 23, 2007 - 8:32 am: |
| 
|
/hitguj/messages/103383/133483.html?1193115733 मी इथे एक शंका उपस्थित केली आहे. कृपया नीरसन कराल का?
|
Dineshvs
| |
| Tuesday, October 23, 2007 - 1:19 pm: |
| 
|
दीपान्त, स्मॉल कर्ड कॉटेज चीज वापरुन कुठलीही पनीरची डिश करता येईल. ग्रिल वैगरे करता येईल. इथे आहेतच सगळ्या क्रुति.
|
Deepant
| |
| Tuesday, October 23, 2007 - 4:08 pm: |
| 
|
थंक्यु दिनेशदा,काल मी काॅटेज चीज वापरुन तुमच्या पद्धतीने पालक पनीर केले,खुप छान झाले.पण पनीर थोडे विरघळले. ह्या पनीरच्या घट्ट वड्या कशा करता येतील? प्लीज सांगाल का?
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|