Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Condensed milk

Hitguj » Cuisine and Recipies » गोडवा » दुग्धजन्य » खीर » Condensed milk « Previous Next »

Ami79
Tuesday, October 23, 2007 - 5:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी अशा प्रकारचे दुध आणले आहे. पण त्याचे काही बनवायचे म्हतले की मन साशंक होते. माझ्या काही शंका आहेत
१. ते एखाद्या पदार्थात घातले तर तो पदार्थ गरम करता येतो का? शिजवता येतो का? तसे केल्याने ते खराब होत नाही ना?
२. ते खुप जास्त गोड असते, असे म्हणतात. मग त्यात साखर घालतच नाहीत का?


त्याच्या काही सोप्या कृती मला कोणी सांगेल का?


Dineshvs
Tuesday, October 23, 2007 - 1:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अलिकडेच यावर चर्चा झाली होती.
ते घालुन पदार्थ गरम करता येतो. काही प्रकारची मिठाई तशीच करता येते.
त्यात भरपुर साखर असते त्यामुळे पदार्थात अजिबात साखर घालावी लागत नाही.
भारतात, त्या डब्याच्या वेस्टनावरच काहि पाककृति असतात. हे दुध वापरुन, खीर, लाडु, नारळाच्या वड्या, फ़्रुट सलाड, फिरनी, भप्पा दोई, वैगरे अनेक प्रकार करता येतात.


Anjalisavio
Tuesday, October 23, 2007 - 1:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अमि, मी शेवयांची खीर करते. अजिबात साखर घालत नाहि. शेवया तुपावर परतवुन घेते, मग पाण्यात थोड्या शिजवुन दुघ घालुन एक उकळि आलि कि हे Milk add करते. एक लिटर full cream Milk ला एक टिन घेते. छान घट्ट खीर instant होते.
दिनेशदा मी पुर्वी पातळ शेवया ज्या रमझान मधे खास मिळतात त्या वापरुन खीर करायचे, पण ह्या वेळि मला गव्हाच्या मिळाल्या आणि salesman नी अगदि मागे लागुन घ्यायला लावल्या. ते product, Made in Bangladesh होते म्हणुन मी घेत नव्हते पण नवरा म्हणाला स्वस्त आहेत नाहि आवडल्या तर वापरु नकोस. म्हणुन घेतल्या. पण खीर नेहमीपेक्षा खुपच छान झाली. त्याला एक प्रकारचा खमंग वास होता. अश्या गव्हाच्या शेवया भारतात मिळतात का? आणि कुठल्या नावाने?

अमि दुसरी झटपट रेसिपि ऊद्या देते. ऊशीर झालाय निघायला.


Ami79
Wednesday, October 24, 2007 - 4:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद मंडळी.

आणखी काही कृती येऊ देत


Manjud
Wednesday, October 24, 2007 - 5:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अमि,

चिकू, केळं, संत्र, मोसंब, सफरचंद इ. फ्रुट सॅलडसाठि घेतो ती सग्ळी फळ चिरून घेऊन एका पातेल्यात घालून त्यावर वरून मिल्क मेडचा डबा ओतायचा. इन्स्टंट फ्रुट सॅलड तयार. साखर अजिबात घालयची नाही. वेलची वगैरे आवडीप्रमाणे. फळांचं पाणि सुटून त्याची consistency एकदम पर्फेक्ट होते. मिल्कमेडचा डबा साफ करण्यासाठी शेवटि थोड दुध डब्यात घालून पिऊन टाकायचं ते पण सही लागतं.

हि माझी १००० वी पोस्ट........ (कुठुनही वाहून जाणार नाही.)


Anjalisavio
Wednesday, October 24, 2007 - 9:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

१ टिन मिल्क मेड, २ अंडि, १ चमचा साखर, वेलची पुड, dry furits - Optional
अंडि अलगद फ़ेटुन घ्यावित. मग त्यात मिल्क मेड ओतुन फ़ेटुन घावे. वेलची पुड, dry fruits घालावे. एका स्टीलच्या पातेल्यात (किंवा कुकरच्या भांड्यात) चमचाभर साखर टाकुन ती करपावावि. ते पातेल थंड झाल्यावर हे मिश्रण ओतावे, व कुकर मधे ठेवुन कुकर प्रखर ज्योति वर ठेवावा. पहिलि शिटी झाल्यावर ज्योत मंद करुन १५ मिनिटे ठेवावे. मग कुकर थंड झाल्यावर भांड बाहेर काढुन serving dish मधे उलटे करावे.
जर लहान मुलाना द्यायचे असेल तर गरम दिले तरी चालते नाहितर फ़्रिज मधेहि ठेवुन छान लागते.



Manuswini
Wednesday, October 24, 2007 - 5:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे कीतीतरी प्रकार करु शकतेस,
माझे रवा लाडू रेसीपी आहे बघ 'रवा लाडू' मध्ये.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators