|
Iop123
| |
| Sunday, October 14, 2007 - 10:46 pm: |
| 
|
कोणाला गव्ह्ल्यान्ची खीर माहीत आहे का? हे गव्हले तान्दळ्याच्या आकाराचे असतात. हे उन्हात वाळवून बनवतात. हे गव्हले कसे बनवतात?
|
Manuswini
| |
| Sunday, October 14, 2007 - 11:09 pm: |
| 
|
मला वाटते इथे कुठेतरी रेसीपी आहे त्याची. mods असेल तर ही मी लिहीलेली खोडून टाका. हो माहीती आहे ना, माझी आई गौरीच्या दिवशी खास नैवेद्याला बनवते, झकास लागते. no other kheer can beat this kheer, one of my fav kheer .गव्हाचे सत्व असते ते बहुतेक. आता आठवत नाही ती procedure पण आजी गावी गेली की बनवून आणायची. असो,(नाही समजून लिहीते). ते गव्हले घरी बनवणे कठीण आहे. माझी आजी बनवायची पहाटे उठून सोहळ्यात. आईला विचारून लिहीते गव्हले कसे बनवतात पण खीर ही अशी करतात. गव्हले चिकट असतात. ते किंचीत(हो अगदी किंचीत गरम परतायचे तूपत,ज्यास्त तूप घालु नये). ज्यास्त भाजले तर एक प्रकारचा छान चिकटपणा निघून जातो नी शिजता शिजत नाहीत नी मऊ होत नाही दाणा.(आई इती) मग रोजच्यासारखे बाजूला दूध उकळावायचे नी हळु हलू ओतायचे, काजु,बदाम साखर,केसर,वेलची घालायची.खुप आळते तेव्हा ज्यास्त उकळवत ठेवु नये. शिजली की बंद करून आळवलेले दूध टाकून द्यायची जेव्हा तेव्हा पुर्ण खीर दूध टाकून पुन्हा पुन्हा उकळण्यापेक्षा.
|
Farend
| |
| Monday, October 15, 2007 - 1:58 am: |
| 
|
मनुस्विनी हो फार मस्त लागायची ती खीर. मी समजायचो गव्हले म्हणजे गव्हाचाच काहीतरी प्रकार असतो.
|
Dineshvs
| |
| Monday, October 15, 2007 - 4:56 am: |
| 
|
गव्हले गव्हाच्या पिठाचेच करतात. वाळवण साठवण मधे असायला हवेत ते. मुंबईत दादरला, आयडीयलच्या समोरच्या दुकानात मिळु शकतात. खीरीबरोबर गव्हल्याचा साखरभात देखील करतात.
|
Shyamli
| |
| Monday, October 15, 2007 - 5:19 am: |
| 
|
आमच्याकडे तरी गव्हल्यांची खीर नैवेद्यासाठीच फक्त केली जाते, त्यासाठी लागणारे गव्हले अर्थात घरीच करतात. रवा दुधात भिजवून हातानी वळून गव्हले करतात, खीर मनुनी लिहील्याप्रमाणेच करतात
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|