|
Dineshvs
| |
| Saturday, September 15, 2007 - 4:56 am: |
|
|
त्याचे दाणे काढुन त्यात आले, मिरची, लसुण, काळे मीठ घालुन चटणी करता येईल. हवेच तर कच्चा कांदा किसुन, पिळुन त्यात मिसळता येतो. हि चटणी समोसा, चाट वैगरे बरोबर चांगली लागते. बरीच असतील तर दाणे काढुन फ़्रीजमधे वाळवता येतील. ते अनारदाणे म्हणुन वापरता येतील.
|
Aashu29
| |
| Saturday, September 15, 2007 - 3:15 pm: |
|
|
kamaal aahe paav bhaajichi recipe disat nahi kuthe ti?
|
Karadkar
| |
| Saturday, September 15, 2007 - 5:06 pm: |
|
|
असे कसे होइल इथे पाहीले का? /hitguj/messages/103383/59368.html?1189768081
|
Aashu29
| |
| Monday, September 17, 2007 - 9:50 am: |
|
|
oh thanks!!upahaar madhe pahilach nahi
|
Chakali
| |
| Wednesday, September 19, 2007 - 1:57 pm: |
|
|
मला थोडी मदत हवी होती. मागच्या आठवड्यात इन्डीयन स्टोअर मधुन "पलप्पम/ वेल्लयप्पम पोडी" असे लिहिलेले पाकिट आणले... हा पदार्थ माझ्या मिस्टरानी ते bangalore मध्ये राहात असताना खाल्ला होता. घाईघाईत कृती न बघता घेतले. आणि पाकिटावर साउथ इन्डीयन भाषेत कृती लिहीली आहे. कुणी सान्गू शकेल का हा पदार्थ कसा बनवायचा ते
|
Mrinmayee
| |
| Wednesday, September 19, 2007 - 2:30 pm: |
|
|
चकली, पलप्पम आणि वेलयप्पम हे दोश्याचेच प्रकार (असं अठवतंय). पलप्पम मधे नारळाचं दूध घालतात. (हा दोसा पळी किंवा वाटीनी न पसरवता गरम तव्यावर पळीभर बॅटर टाकून ३० सेकंद थांबून मग तव्यालाच फिरवून पसरवतात. म्हणून हा दोसा मध्याभागी जरा फुगीर असतो.) वेलयप्पम ला बॅटर वाटाताना जरा ओलानारळ घालतात. यीस्ट घालून रात्रभर फुगवतात. नारळाचं पाणी पण चालतं. माझ्या बंगलोरच्या शेजारणी अप्रतीम करायच्या हे दोसे. माश्याच्या घट्ट कालवणाशी किंवा 'पुळी (चिंचेच्या)सांबाराशी' खातात बहुदा. आणलेलं पीठ नारळाच्या दुधात भिजवून, यीस्ट घालून फर्मेंट करून मग दोसे लावुन बघतेस का?
|
Karadkar
| |
| Wednesday, September 19, 2007 - 4:04 pm: |
|
|
पालप्पम हा केरळी प्रकार आहे. माझ्याकडे आहे रेसिपी पण शोधणे शक्य नाहिये. पण गूगल ने हे दिले. http://pachakam.com/recipe.asp?id=414 पालप्पम करण्यासाठी एक वेगळ्या प्रकारचा तवा मिळतो. वेलयाप्पम साठी हे दिले http://www.pachakam.com/recipe.asp?id=141
|
Manuswini
| |
| Wednesday, September 19, 2007 - 5:01 pm: |
|
|
अग आप्पमचाटी तवा मिळतो special वेलय्यप्पम साठी, खोल असतो मध्ये, पिठ टाकायचे नी गोल फिरवायचा, कडा मग पातळ कुरकुरीत. चीकन करी बरोबर झकास लागतो. नारळ रसात वाटायचे नी सकाळी हवे असेल तर सोडा नाहीतर yeast मी काहीच टाकत नाही पण होतो चांगला. basically, yeast टाकण्यापेक्षा शिजवलेला भात नी पोहे टाक, चांगले आंबते पिठ. yeast ह्याच कारणाकरता की ते फूलून येईल.
|
Chakali
| |
| Thursday, September 20, 2007 - 2:19 am: |
|
|
धन्यवाद Mrinmayee , Karadkar, Manuswini .मी नक्कि करून बघेन
|
Dineshvs
| |
| Thursday, September 20, 2007 - 7:55 am: |
|
|
पलप्पम चे वर्णन मागे टिव्हीवर, मधे ईडली आणि कडेने डोसा, असे केले होते.
|
Ravisha
| |
| Friday, September 21, 2007 - 1:45 am: |
|
|
कोणी "black beans" ची उसळ कशी करायची सांगेल का?
|
Sanyojak
| |
| Friday, September 21, 2007 - 4:19 am: |
|
|
हौशी मंडळीनो! तिकडे गणेशोत्सवातही पाककला स्पर्धा ठेवलीय. माहीती आहे ना? तुमच्या आया, आज्ज्या, माम्या, मावश्या, काकवा आणि तुम्ही स्वतः अशा सुग्रणींच्या वर्षानुवर्षांच्या अनुभवातून किंवा बाबा, काका, मामा अशा सुग्रणांच्या संडे स्पेशल प्रयोगांमधून तावून सुलाखून आलेले एखादे झटपट जेवण कॉंबी आठवतेय का? चला तर आता पाचच दिवस राहिले स्पर्धा संपायला. त्वरा करा!
|
Disha013
| |
| Friday, September 21, 2007 - 5:11 pm: |
|
|
अख्ख्या उडदाच्या डाळीचे (साल नसलेल्या) नेहमी करतो तसे मेदुवडे होतील का? की दुसरे काही करता येइल? वडे बिघडणार नसतील तर तेच करायचा विचार आहे.
|
Upas
| |
| Monday, September 24, 2007 - 3:42 pm: |
|
|
साताळलेली डाळ (गणपतीतला प्रसाद) साहित्य : २ वाट्या चण्याची डाळ, तेल, हळद, हिंग, मोहोरी, ओलं खोबरं, कोथिंबीर, मिरच्या कृती : चण्याची डाळ स्वच्छ धुवून चार तास भिजत ठेवावी. त्यानंतर डाळ हातावर चोळून धुवून घ्यावी. कुकर मध्ये चाळणीत डाळ ठेवून दोनच शिट्ट्या काढाव्यात. अख्खी डाळ रहायला हवी. डाळीचे दाणे अगदी कडकडीत रहाता कामा नयेत किंवा त्यांचे पीठही होता कामा नये. कुकरमधून डाळ काढून फोडणीस टाकावी. चवीप्रमाणे मीठ घालून डाळ परतवावी. खोबरं, कोथिंबीर आवडीनुसार पेरावी. झाली डाळ तयार! हा गणेश विसर्जनाच्या दिवशीचा पारंपारिक प्रसाद..
|
Jagmohan
| |
| Monday, September 24, 2007 - 7:22 pm: |
|
|
नमस्ते, सर्वप्रथम मुळ पदार्थ अप्पम् हा केरळमधला आहे. ईडली आणि दोश्याप्रमाणे ह्यात उडीद वापरत नाहीत. फक्त तांदूळ वापरले जातात. बाकीचे नमुने मग त्यामधे इतर काय गोष्टी मिसळल्या आहेत, कसल्या प्रकारचा तवा वापरला आहे वगैरे वर ठरतात. जर आपण अप्पम् हा बेस क्लास मानला तर वेल्लप्पम, पालप्पम हे सगळे डिराईव्हड् क्लासेस समजले पाहिजेत. गंमतीची गोष्ट अशी की ९०% केरळातल्या डेलीकसीज आपल्या कोकणातपण बनतात. पण नावे फक्त वेगळी आहेत. उदा. आपल्या कोकणात शिरवाळ्या बनतात. त्याच शिरवाळ्या खाली कारवार साईडला शाविगे आणि केरळात ईडीअप्पम म्हणून बनतात. जगमोहन
|
Suyog
| |
| Tuesday, September 25, 2007 - 6:26 pm: |
|
|
milk powder che pedhe kinwa mawa modak kase karatat
|
Karadkar
| |
| Tuesday, September 25, 2007 - 6:50 pm: |
|
|
झटपट पेढे येथे मिळतील http://vadanikavalgheta.blogspot.com/2007/03/blog-post_2814.html किंवा /hitguj/messages/103383/4774.html?1182350259 येथे मिळतील
|
Suyog
| |
| Tuesday, September 25, 2007 - 7:06 pm: |
|
|
thanks for quick response
|
Manuswini
| |
| Tuesday, September 25, 2007 - 8:50 pm: |
|
|
जगमोहन, जावा चांगले शिकवीता अप्पम,इडीप्पम बरोबर
|
मी इन्दिअन दुकान मधुन तान्दुल शेवाई आनलि आहे. याचा उपमा कसा करतात? नेहमि सार खा का?
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|