|
Dineshvs
| |
| Friday, September 21, 2007 - 1:46 pm: |
| 
|
खुपदा आपल्याकडे सांबार मसाला आणलेला असतो, आणि एकदा हौसेने सांबार केले कि तो पडुन असतो. तो मसाला वापरुन हि एक वेगळ्या चवीची भाजी. लहान मुलाना खुप आवडेल. चार मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे, चार लाल टोमॅटो, हवे असतील तर अर्धी वाटी फ़्रोझन किंवा उकडलेले मटार, एवढे हाताशी असले कि झाले. जाड बुडाच्या कढईत थोडे तेल तापवुन त्यात अर्धा चमचा जिरे घालावे. ते तडतडले कि टोमॅटो बारिक कापुन घालावे. शक्य असले तर बिया काढाव्यात. मंद आचेवर ते परतत रहावेत. सगळे पाणी आटले कि मधला भाग मोकळा करुन घ्यावा. टोमॅटो कढईतच असु द्यावेत. या मधल्या मोकळ्या भागात एक चमचा साखर घालावी. ती मधल्यामधे परतत रहावी. जळुन सोनेरी झाली कि टोमॅटो मिसळुन घ्यावेत. त्यात एक चमचा सांबार मसाला व अर्धा चमचा लाल तिखट घालावे. नीट मिसळुन घ्यावे. मग त्यात हवे असतील तर फ़्रोझन मटार वा वाफवलेले मटार घालावेत. फ़्रोझन असतील तर झाकण ठेवुन जरा शिजु द्यावेत. मग त्यात दोन ते तीन कप पाणी घालावे. उकळले की त्यात उकडलेले बटाटे कुस्करुन घालावेत. मीठ घालुन उकळु द्यावे. सोम्य चवीची भाजी, चपाती वा पावाबरोबर छान लागते.
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|