|
Manuruchi
| |
| Monday, September 10, 2007 - 9:20 am: |
| 
|
are ikde koni firaknar nahi ka ? mala madat havi aahe
|
Dineshvs
| |
| Monday, September 10, 2007 - 1:32 pm: |
| 
|
मनुरुची, गणपतिचा प्रसादाचा मेनु ठरलेलाच असतो. उकडीचे मोदक, वरण भात, लाल भोपळा, गवार अश्या काहि खास भाज्या, बटाट्याची भाजी, काकडीची कोशिंबीर पुर्या वैगरे परंपरेने चालत आलेले पदार्थच करतात. हौस असेल तर ऋषीपंचमीची भाजी करता येईल. त्याची कृति आहे इथे
|
Mrinmayee
| |
| Monday, September 10, 2007 - 1:32 pm: |
| 
|
हा मेनु कसा वाटतो ते बघ. ह्यातल्या जवळजवळ सगळ्याच पदार्थांची तयारी आधी करून ठेवता येईल. खमंग काकडी (काकडी आधी चोचवून. दाण्याचा कुट तयार ठेवून) हिरवी मिरची-कोथींबीर चटणी (ही देखील आधीच वाटून ठेवता येईल) पालकाची पातळ भाजी. (आधल्या दिवशी पालक आणि डाळ एकत्र शिजवून दुसर्या दिवशी फोडणी) साधं वरण (तुर डाळ हवी तर पालक्-डाळींबरोबर शिजवून घेता येईल). बटाट्याची भाजी (आधल्या दिवशी बटाटे उकडून ठेवले तर जास्त सोपं) साधा भात (हा जेवायला बसायच्या अर्धा तास आधी गॅसवर चढवता येतो.) मसाले भात करायचा झाला तर तांदुळ आधीच धुवून उपसून (आधल्या रात्री) डब्यात भरून फ़्रीज मधे ठेवायचे. मसाले आणि भाज्यादेखील परतून डब्यात बंद करून ठेवायच्या. दुसर्या दिवशी भांड्यात एकत्र करून आधण ओतायचं) नेवैद्याचं काय गोड करता तुम्ही? मोदक, शीरा खीर ह्यात मला शॉर्ट कट नाही माहिती. तळणाला वेळ नसेल तर भज्यां ऐवजी पापड कुर्डया तळता येतील. (तुला मदतीला कुणी नाही हे गृहित धरून. असतील हाताखाली कामाला तर चार पदार्थ आणखी
|
Shyamli
| |
| Monday, September 10, 2007 - 1:51 pm: |
| 
|
माझ्याकडेही गणपतीमधे बरेच लोक जेवायला असणार आहेत (५०-६०-???) आकडा फायनल नाहिये तर यासाठी मेनु मी असा ठरवला आहे गाजराची कोशिंबीर,नारळाची चट्णी,चुका मिळाला तर चुका किंवा नुसतीच पालकाची डाळ घालून भाजी,कोबी किंवा बटाटा कोरडी भाजी, मसाले भात, ,मट्ठा आणि पापड असाच आहे पण गोडात मोदकच करावेत का? (गोडापाशी गाडी अडते नेहमी ) मनुनी दिलेला मुगाचा शीरा करावा का? का फार वेळ लागेल त्याला? अजुन काहि पर्याय? आणि ५ दिवस प्रसाद काय करायचा ?(रोज लोक येणार आरतीला) आर्च, दिनेशदा, मृ किंवा अजून कोणीही , लवकर लवकर सांगाल का जरा ?(एवढे लोक म्हंट्ल्यावर घाबरायलाच झालय मला जरा )
|
Saj
| |
| Monday, September 10, 2007 - 4:43 pm: |
| 
|
Shyamali, age prasadala satyanarayanachya prasadacha shira, khirapat/panchkhadya, halvyache dane, pedhe/kaju modak, panchamrut kiva barech jan yetana nehami fale yeun ghetat. tar hi fale kapun tyat pedhe/barfi mix karun chan prasadacha kala tayar karta yeto aani falehi vaparli jatat. ajun idea suchavatilch tula jankar
|
Supermom
| |
| Tuesday, September 11, 2007 - 1:01 pm: |
| 
|
मृ, तुझा मेनू मला एकदम आवडला. फ़क्त माझी इच्छा कढी पण करण्याची होती. आमच्याकडे मसालेभाताबरोबर कढी ठेवतात बहुधा. मग मी असा मेनू ठेवायचा म्हणतेय. हिरव्या मिरचीची चटणी, खमंग काकडी, उकडलेल्या बटाट्याची सुकी भाजी, लाल भोपळ्याची बाकरभाजी, मसालेभात, तळलेल्या कुरडया पापड्या,कढी,खव्याचे मोदक(रिकोटा नि मिल्क पावडर मिसळून) , नि शेवयाची खीर. तर यात खीर दुधाची आहे म्हणून कढी विचित्र वाटेल का? की शिरा ठेवू खिरीऐवजी? लवकर सांगा प्लीज कोणीतरी. आजच ग्रोसरीला जायचंय मला.
|
Dineshvs
| |
| Tuesday, September 11, 2007 - 1:35 pm: |
| 
|
गणपतिला प्रसाद करताना हातावर ठेवता येईल असा असावा. पंचखाद्य म्हणजे खवा, खोबरे, खसखस, खडीसाखर, खारिक मिसळुन देतात. वाटली डाळ पण चालते. शेवटच्या दिवशी करतात. फळांचे तुकडे, केळी, केळी घालुन केलेला शिरा, गोड आप्पे वैगरे करतात. खीर आणि कढि एकत्र ठेवण्यात मला तरी काहि गैर वाटत नाही. भरली केळी, हाहि पर्याय आहे.
|
Savani
| |
| Tuesday, September 11, 2007 - 1:57 pm: |
| 
|
सुमॉ, ते खव्याचे(रिकोटाचे) मोदक कसे करतेस सांगशील का जरा?
|
Supermom
| |
| Tuesday, September 11, 2007 - 2:35 pm: |
| 
|
सावनी, अगदीच सोप्पे आहेत ग ते. खालच्या लिंक प्रमाणे मिश्रण बनवायचे नि हवे तसे आकार द्यायचे. http://www.webindia123.com/cookery/v_recipe/ricottacheeseburfi.htm
|
Karadkar
| |
| Tuesday, September 11, 2007 - 3:14 pm: |
| 
|
सु. माॅ. अग कढी आणि खीर एकत्र खुप चांगले नाही होत (स्वानुभव). त्यामुळे कढी करायचीच असेल तर मग शिरा कर मस्त दुध्केळ घालुन. किंवा खीर करुन टोमटोचे सार पण करायला हरकत नाही.
|
Karadkar
| |
| Tuesday, September 11, 2007 - 3:16 pm: |
| 
|
श्यामली, १. पंचखाद्य २. खजुर रोल ३. नारळ बर्फ़ी ४. कापलेली फळे ५. शिरा असा ५ दिवसाचा प्रसाद होऊ शकतो.
|
Shyamli
| |
| Tuesday, September 11, 2007 - 3:22 pm: |
| 
|
अग खजुर रोल सोडलं तर बाकिचं करतच आलेय मी एवढे वर्ष पण ते देशात असताना,पण यंदा इथे पहिल्यांदाच करतीये हे सगळं म्हणून मला वाट्तय कि एवढाच करायचा का प्रसाद? शिवाय एक दिवस महाप्रसाद करणारच आहे, मग काय म्हणताय लोक्स तुम्ही? प्रसाद प्रसादाएवढाच द्यायचा ना रोज??? खजुर रोल ची आयडिया मस्तय (खजुर छानच मिळतात इथे )
|
Aakshi
| |
| Tuesday, September 11, 2007 - 3:51 pm: |
| 
|
supermom, cud u plz tell me how to make modak of Khava/Khoya? I got it in the indian store.I posted the request in the looking for recipes but no1 i replying... Please its urgent..
|
Karadkar
| |
| Tuesday, September 11, 2007 - 3:53 pm: |
| 
|
प्रसाद हातावर देण्यापुरताच कर न. आणि महाप्रसाद ठेवणार आहेस तर मग बकीचे थोडे हातावर देण्यापुरतेच असु देत.
|
Manuswini
| |
| Tuesday, September 11, 2007 - 5:27 pm: |
| 
|
वाटलेली डाळ ही करु शकतेस श्यामली, आता हे मी फक्त कोकणस्थाकंडे पाहीलेय की ती प्रसाद म्हणून वाटतात. ते ही हातावर नाहीतर Dryfruits mix कर. बदाम,खजूर, काजु,फुटाणे,गोड तीळदाणे वगैरे. लहान मुलांना आवडतो हा प्रसाद. मला आवडायचा लहान असताना, मागून मागून खायची आरती संपल्यावर. तेव्हा मुंबईत आम्ही लहान मुले गोळा होवून सगळ्यांच्या घरी आरत्या करायला जायचो. मोठ्या मोठ्या आरत्या म्हटल्या की भरपूर प्रसाद कांकाकडून वरती कराडकरताईने सांगीतले आहेच पण श्यामली हे असे माझी आई करायची, १) बेसनचे छोटे लाडू,(हे आई घरीच बांधायची कारण आम्ही ते गणपतीच्या पुढ्यात ठेवायचो). २) रव्याचे लाडू ३) केळे(सालीसकट कापून), सफ़र्चंद वगैरे बर्यापैकी सुखी फळे ४) सुका मेवा जो वर लिहिला आहे तो, त्यात शेंगदाणे पण टाक ५)श्यामलि, मूगाचा शीरा कर गं, हा एकदम Fav item होता आम्हा मुलांचा, तो प्रसाद आहे म्हटल्यावर ज्यास्त आरत्या मुलांच्या, लहान द्रोण मिळतात ना सत्य नारयणाच्या पूजेला त्यात आधीच भरून ठेव गणपतेला आधी वेगळा नैवेद्या काढून. ६) नारळ वडी पण आधीच करून ठेव. अग बिंधास ग... जाम मजा येते घरी आरतेला भरपूर लोक असतील तर. ५) खव्याचे मोदक,पेढे पन वाटु शकतील. आई कधी कधी ते घरी आणलेले पेढे कुसकरून, झटपट लाडू करायची. ते बघ रवा,खवा लाडू. मस्त लागतात. एक अशीच टिप,राग नसावा, शक्यतो सुका प्रसाद ठेवावा, शीरा,वाटलेली डाळ असेल तर द्रोणात देणे बरे. काही लोक श्रीखंड प्रसाद म्हणून देतात आणि ते ही हातावर, आता हात कशाला पुसायचे, तुमच्या कपड्याला का? असा मला प्रश्ण पडायचा. आणि वाटायचे जरा डोक सुद्धा वापरत का नाहीत ही लोक. (असे लहानपणी वाटायचे). एकतर tissue paper सुद्धा द्यायचे नाहीत नी नसायचे सुद्धा त्यांच्याकडे वाटते.
|
Manuswini
| |
| Tuesday, September 11, 2007 - 5:41 pm: |
| 
|
सुमॉ, हे माझे मत आहे, कढी असेल तर खीरी एवजी केसरी शीरा खवा किंवा दूध पॉवडर टाकून किंवा मूग शीरा छान लागेल. नाहीतर भाताची गूळ टाकून खीर ज्यास्त दूध लागत नाही. authentich style थोडी मल्लु Style बनवलीस तर छान लागेल. तु एकटी आहेस ना so choice is yours वालाचे बिरडे अगदी patent असायचे ह्या दिवसात आमच्याकडे, ते जरा जिकरीचे काम आहे तुला. नाहीतर पडवळाची दाळ टाकून भाजी. तिखटात एखादी उसळ, चवळी किंवा हरभरा. मस्त लागते वरण, भात,उसळ,हिरवी मिरचीची पडवळाची भाजी,ताक,कोशींबीर,लोणचे, शीर वगैरे. उसळ कांदा नी लसुण न टाकता अगदी झणझणीत बनवाते आई
|
Karadkar
| |
| Tuesday, September 11, 2007 - 6:01 pm: |
| 
|
मनुबाळे, कराडकरताई काय! तुला पण गुण लागला का?
|
Manuswini
| |
| Tuesday, September 11, 2007 - 6:07 pm: |
| 
|
अहो मी खरेच आदराने लिहिले हो? मला कुणाचा गूण नाही लागत. आता अग तु ग केले तर म्हणतील काय आगवू आहे. हे बरे आहे हां. बरे ठिक, मग काय म्हणु तुम्हीच सांगा?
|
Prajaktad
| |
| Tuesday, September 11, 2007 - 6:29 pm: |
| 
|
आता हे मी फक्त कोकणस्थाकंडे पाहीलेय की ती प्रसाद म्हणून वाटतात>>>छ्या ! भलतच काय ? आम्हीही करतो की (दे. रु).. ब्राम्हणेतर ही बरेच लोक करताना बघितयेत मी वाटली डाळ. गणपती आग़मनाच्या दिवशी.. जेवण मेनु केळी / पेरू / टॉमटो-काकडी / नुसती काकडी / डाळिंब कोशिंबिर ओल खोबर,कोथिंबिर,हिरवी मिरची चटणी.. मुग / घोसाळे भजी पापद कुरडई पालक / अळु पातळ भाजी(डाळ दाणे घालुन) बटाटा-मटार / कोबी / गवार सुकी भाजी चवळी / मटार उसळ साध वरण भात तुप मिठ लिंबु २१ मोदक(उकडीचे तळणीचे,पेढ्याचे) प्रसाद खिरापत पंचखाद्य रेवड्या गुडिशेव शिरा आंबा घालुन शिरा मुगाचा शिरा नारळ भात(छोटी मुद पाडुन) कलिंगडाच्या फ़ोडी काकडी काप वाटली डाळ सुरळिच्या वड्या. (ही मला आठवणारी खिरापत(प्रसाद)आहे..) गणपती बाप्पा मोरया!
|
Karadkar
| |
| Tuesday, September 11, 2007 - 6:34 pm: |
| 
|
अग मला अग तुग बोलावलेस तरी चालेल. माझे नाव मिनोती आहे त्यामुळे तसे बोलाव नाहीतर सरळ कराडकर म्हण. आणि तु कुणाला कशि हाक मारतेस त्यावरुन तु आगावु की नाही ते कसे ठरेल ;)
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|