Prajaktad
| |
| Wednesday, November 23, 2005 - 3:35 pm: |
| 
|
Xaovayaa krNao ho tsao kÝXalyaacaoca kama Aaho.maI kiQa paTXaovayaa krtanaa baiGatlyaa naaiht pNaÊ hat
Xaovayaa krtanaa Barpur vaoLa baiGatlao Aaho.. hat XaovayaI tr Agaid kosaasaarKI baairkih vaLila jaato..maaJaI vaihnaI Xaovayaacao gaÜla ÔoNyaasaarKo
cavaMgao kÉna Kasa maaJyaasaazI raKuna zovato..[tko saubak kama iKr krtanaa sauwa maÜDu nayao Asa vaaTt.
|
Dineshvs
| |
| Wednesday, November 23, 2005 - 3:59 pm: |
| 
|
पाट शेवयाचा पाट साधारण अर्धा फ़ुट रुंद व चार फ़ुट लांब असतो. तो साधारण ४५ अंशावर एखाद्द्या डब्याच्या आधाराने ठेवायचा. खुर्चीत बसल्यासारखे त्याचा टोकावर बसायचे. तो पाट तुकतुकीत असुन त्यावर काहि चिरा असतात. कडबोळे वळल्याप्रमाणे बोटाने त्याची एका बाजुने शेवई पाडली पाहिजे. ती दुसर्या व्यक्तीने एका ताटात पसरवायची. मग ताटातुन सोडवल्या तरी त्याचा गोल आकार कायम राहतो. व डब्यात नीट भरता येतात. या शेवया सरळ हव्या असल्या तर एखादी काठी आडवी टाकुन त्यावर वाळवतात. आभाळ आले तर या शेवया खाली पडतात. कारण माहित नाही पण मी हे प्रत्यक्ष बघितले आहे. जाययाच्या जेवणात त्या हव्याच. जावयाची थट्टा करण्यासाठी त्यात तुप टाकायचे. म्हणजे त्या सैल हिवुन खाता येत नाही. शहाणी करवली मग त्यावर पिठीसाखर टाकायची. मग त्या खाता येत.
|
Prarthana
| |
| Tuesday, February 20, 2007 - 6:22 am: |
| 
|
शेवयाचे इन्ग्रेडिएन्ट्स द्या की
|
Dineshvs
| |
| Tuesday, February 20, 2007 - 12:38 pm: |
| 
|
शेवया फक्त कणकेच्याच करतात. अगदी कणभर मीठ घालायचे त्यात. पण आता घरी करायच्या तर गव्हले, नखोत्या, मालत्या वैगरे करणे सोपे जाईल. हे प्रकार केवळ बोटाने करता येतात.
|
Karadkar
| |
| Wednesday, February 21, 2007 - 12:08 am: |
| 
|
शेवया साध्या कणकेच्या करत नाहीत कधी. ते पीठ प्रचंड मेहेनतिने करतात. शेवया करण्याची प्रोसेस खुपच वेळखाऊ आहे.
|
Manuswini
| |
| Wednesday, February 21, 2007 - 1:01 am: |
| 
|
शेवया कणकेच्या नसतात. .... आजी चिकाच्या बनवायची. बहुतेक गव्हाचा चीक का काय ते असायचे. सोहळ्याने कुठल्याश्या वस्त्रगाळ कापडात तो चीक ती बांधुन ठेवायची नी पहाटे उठुन करायची त्यामुळे ती कशी करायची हे पाहीले नसले तरी तीची आदल्या दिवशीची तयारी पहायची. मग सगळ्यांना ती शेवया वाटायची.
|
Karadkar
| |
| Wednesday, February 21, 2007 - 1:23 am: |
| 
|
मनु, त्या कुरडया (कुरवड्या) शेवया नव्हेत.
|
Robeenhood
| |
| Wednesday, February 21, 2007 - 2:20 am: |
| 
|
आँ???? मनुस्विनीचे डोके ठिकाणावर आहे ना?
|
Limbutimbu
| |
| Wednesday, February 21, 2007 - 5:04 am: |
| 
|
>>>>> मनुस्विनीचे डोके ठिकाणावर आहे ना? तुला कशाला हव तिच डोक??????? तुझ तू (असल तर) वापर ना! DDD
|
Manuswini
| |
| Wednesday, February 21, 2007 - 6:13 am: |
| 
|
रॉबीन काका तुम्हाला काय झाले? मला ही तुमचाच प्रश्ण पडला होता पण आम्हाला कोणाला असे फटकळ बोलायची सवय नाही ना...........
|
Limbutimbu
| |
| Wednesday, February 21, 2007 - 6:22 am: |
| 
|
>>>>> आम्हाला कोणाला असे फटकळ बोलायची सवय नाही ना........... अग त्या फटकळ बोलण्याविषयी एक म्हण हे.... उचलली जीभ लावली टाळ्याला.......! किन्वा उचलला हात, बदडला कीबोर्डला.... असही म्हणता येइल!
|
Meghdhara
| |
| Wednesday, February 21, 2007 - 8:39 am: |
| 
|
दिनेश.. आभाळ आल्यावर हवेतील आर्द्रता वाढत असावी आणि ती आर्द्रता शोषुन शेवयी जड होऊन शेवयी खाली पडत असावी.. कुणाचे काय तर कुणाचे काय शिक्षणातला किंचीत बी.एससी. थोडा जागा झाला इतकेच. मेघा
|
Lopamudraa
| |
| Wednesday, February 21, 2007 - 9:43 am: |
| 
|
शेवया मैद्याच्या करतात पण तो मैदा गहु ओलवुन दळुन वस्रगाळ करुन मग त्यात किंचीत मिठ टाकुन करतात. पाटाच्या शेवया आणि हाताच्या शेवया असे दोन प्रकार आमच्या घरी व्हायचेत. पाटाच्या शेवया जाड असत मोठ्ठी लाकडी फ़ळी उभी करुन (सी साॅ सारखे) त्यावर पाटाच्या शेवया करतात. त्या फ़ळि चा वापर फ़क्त शेवया करण्यासाठी करतात त्यात सुंदर designs सुध्दा असते.पाटाच्या शेवया गुळ च्या पाण्यात शिजवुन वर तुप टाकुन खायच्या तर हात शेवया अगदी नाजुक,दोर्यासारख्या त्या फ़क्त हातानीच कराय्च्या. त्यात दुध or तुप साखर or खिरिसाठी वापराय्च्या. हे सगळे सुट्टीत आजीकडे पहिलेले, पाताच्या शेवया म्हणजे खुप स्कील चे काम असायचे आम्ही आपले मध्ये मध्ये कराय्चो. पण कधी जमल्या नाहित..
|
Dineshvs
| |
| Wednesday, February 21, 2007 - 10:10 am: |
| 
|
आमच्या घरी गव्हाचे पिठ सपीटाच्या म्हणजे मैद्याच्या चाळणीने चाळुन, ते पिठ घट्ट भिजवुन करत असत. त्यासाठी गहु मात्र बघुन घ्यावा लागे ( पास्ता वैगरे च्या पाकिटावर DURUM लिहिलेले असते त्या गव्हाचा देशी अवतार असावा ) बाकि मी आणि लोपाने लिहिल्याप्रमाणे. पाटावरच्या शेवया ईतक्या बारिक नसत. पण माझ्या आजोळी, ईतके नाजुक साजुक प्रकार खायची आवड नाही. मेघधारा, तसेहि कारण असेल. पण मग त्या बायका हळहळायच्या, कारण सगळी मेहनत वाया जात असे.
|
Shyamli
| |
| Wednesday, February 21, 2007 - 11:09 am: |
| 
|
हं तर वैशालीनी लिहिल्याप्रमाणे हा गहु बहुदा जोडगहु\खपली (CBDG) या जातीचा घेतात तो थोड तेल आणि पाण्याचा हात लाउन मुसळानी सडुन घेतात मग दळुन घेउन त्याला सपीटाच्या चाळणिने चाळुन त्या पिठात मिठ घालुन हातानीच अतीशय बारीक अशी शेवई वळतात बाकी बरोबर आहे वरच सगळ 
|
Manuswini
| |
| Wednesday, February 21, 2007 - 5:39 pm: |
| 
|
मी आईला विचारले की आजी काय करायचे ते. मी वरती दोन पदार्थ एकत्र केले. पण हो मी वरती चिकाची लिहिले ते कुरड्या साठी( ईती आई) नी गहु वस्त्रगाळ प्रकार हा शेवया साठी वगैरे वगैरे. चिकाचे गव्हले पण पाडतात.
|
Meghdhara
| |
| Wednesday, February 21, 2007 - 5:47 pm: |
| 
|
दिनेश, अरे कुणाचे काय तर कुणाचे कायहे माझ्यासाठीच होते. आणि आत्ता वाचताना जाणवलं त्यासाठी बी. एससी. कशाला जागा व्हायला हवा.. असो. नारळाचे दुध आणि गुळ यात घालून तांदुळाच्या पीठाच्या उकडलेल्या शेवया लहानपणी खाल्लेल्या.. वाळवण सदरात हे येत नाही. सहज आठवलं. मेघा
|
Seema_
| |
| Wednesday, February 21, 2007 - 5:50 pm: |
| 
|
मनु बरोबर आहे तुझ . पातळ मलमलच्या कपड्यातच चाळुन घेतात शेवयाच पीठ . सासुबाईनी पाठवल्या आहेत शेवया नुकत्याच मला .
|
Nalini
| |
| Thursday, February 22, 2007 - 10:46 am: |
| 
|
शेवया करण्यासाठी गहू घेताना त्याचा रंग महत्वाचा. पाणी लागलेला गहू पांढरट दिसतो. शेवयासाठी खास करून काळ्या कुसळाचा गहू वापरला जातो. पण खास करून असा काळ्या कुसळाचा गहू पिकवला जात नाही. कोणाकडे उपलब्ध असेल तर तो घेतला जातो नाहितर आपला नेहमिचाच गहू वापरतात. लोपाने म्हटल्याप्रमाणे गव्हाला मिठ आणि पाणी लावुन ते दडपून ठेवतात व ते बारीक दळून आणतात. वस्त्रगाळ करून मग ते भिजवतात. पाटावरच्या शेवया फारश्या कुठे मिळत नाहित. आता सर्रास मशिनवर केल्या जातात.
|
Dineshvs
| |
| Thursday, February 22, 2007 - 11:57 am: |
| 
|
नलिनी, आता शेवयाचे पाटहि शोधावे लागतील. ( मुंबईला निवडक ठिकाणी अजुनहि हातशेवया मिळतात. पण त्या तश्या पाटावर करत असतील का, याची मला शंका आहे. ) या शेवया करताना शेवया वळणारी आणि ताटात ती सोडणारी यांचे सूत जमावे लागते. ज्या वेगात शेवई वळली जाईल त्याच वेगात ती ताटात पसरावी लागते. ताटातले जाळे फ़ार दाट नाही फ़ार विरळ नाही असे असावे लागते. मी लहानपणी आजोळी उलट्या ताटलीपर पेला उपडा घालुन, साहेबाची हॅट करायचो. उलट्या ताम्हणावर कमळ करायचो. मावशी मला कशी सहन करायची कुणास ठाऊक. हे आकार दिसायला चांगले दिसले तरी साठवायला कठीण असत. मग माझ्या या सगळ्या आकृत्यांची खीर करुन मलाच खाऊ घालत असे ती.
|