|
Dineshvs
| |
| Tuesday, August 28, 2007 - 12:18 pm: |
| 
|
करडई ची भाजी म्हणजे करडईच्या बियांची कोवळी रोपे. उभट पांढरट दांडा आणि त्याला दोनी बाजुनी आठ दहा सेमी लांब व एक दीड सेमी रुंद गर्द हिरवी पाने असे याचे रुप. पानांच्या कडाना किंचीत काटे असतात. भाजी म्हणुन आणली जाते त्यावेळी हे काटे अजिबात टोचत नाहीत. ( शेतात फ़ुलावर येऊन सुकलेल्या रोपांचे काटे मात्र खुप टोचतात. याला लाल पिवळी फ़ुले येतात. बोंडेही काटेरी असतात. यात पांढर्या बिया असतात व त्याचे तेल काढतात. या बोंडांची पण भाजी करतात. ) तर हि पालेभाजी निवडताना पाने व कोवळे कोंब घ्यावेत. भाजी स्वच्छ धुवुन चिरावी. अख्खे मसुर भिजत घालावेत. एका जुडीला वाटीभर पुरेत. एका जुडीसाठी आठ दहा लसुण पाकळ्या, पाच सहा हिरव्या मिरच्या घ्याव्यात. एक कांदा चितुन घ्यावा. तेलाची फोडणी करुन त्यात हिंग व लसुण घालावा. त्यात कांदा व मसुर परतुन घ्यावेत. झाकण ठेवुन एक वाफ़ येऊ द्यावी. मग त्यावर चिरलेली भाजी घालावी. परतुन शिजवावी. मग मीठ घालावे. हि भाजी खुप चवदार लागते. शिळी झाली कि जास्तच चवदार लागते. पाने खुडायला सोपी असतात.
|
Suparna
| |
| Tuesday, August 28, 2007 - 1:50 pm: |
| 
|
हो दिनेशदादा मी साधी कांदा मिरच्यांची फोडणी घालून करते तरी खूप चवदार लागते. पण पाहीजे तेव्हा मिळत नाही.... जराशी दुर्मीळच आहे ही भाजी. आता मिळाली की अश्या पद्धीतीने नक्की करीन. छान वाटतेय मसूर घालून.......
|
Karadkar
| |
| Tuesday, August 28, 2007 - 3:14 pm: |
| 
|
करडईची भाजी मसूराच्या ऐवजी हरभर्याची डाळ घालुनही छानच होते. आणि खोलगट लोखंडी तवा असेल तर त्यात करावी. भाजी घेताना नीट पाहुन घ्यावी, कारण त्यावर प्रचंड कीड असते. अगदी कोवळ्या पानांच्या बेचक्यात असते. त्यामुळे सगळी निघतेच असे नाही.
|
Suparna
| |
| Tuesday, August 28, 2007 - 3:30 pm: |
| 
|
टिप्स साठी आभार कराडकर ... भाजी मात्र लवकर मिळायला हवी ....
|
Fulpakhru
| |
| Tuesday, August 28, 2007 - 5:22 pm: |
| 
|
मिनोती US मधे मिळते का करडई ची भाजी? काय नावाने मिळते?
|
Karadkar
| |
| Tuesday, August 28, 2007 - 6:02 pm: |
| 
|
फ़ुलपाखरु, नाही ग मिळत इथे ती भाजी कराडला जाते तेव्हा आठवणीने हे सगळे खाउन येते पण. सुपर्णा, अग सांगायचे विसरले, करडई सातारा, कोल्हापुर, सांगली भागात हिवाळ्यात मिळते - डिसेंबर ते फ़ेब्रुवारी पर्यंत.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|