Neelu_n
| |
| Wednesday, August 22, 2007 - 5:00 am: |
| 
|
पातोळ्या: याची पाककृती उकडीच्या मोदकासारखीच आहे. पण पद्धत जरा वेगळी. थोडक्यात उकडीच्या करंज्या म्हटले तरी चालेल. साहित्य(उकडीकरीता): तांदळाचे पीठ, पाणी, चिमुटभर मीठ, चमचाभर तुप साहित्य(सारणाकरीता): खवलेला नारळ, गुळ, वेलची पुड, हवे असल्यासास काजु तुकडे किंवा चारोळी, तुप आणि हळदीची पाने कृती: प्रथम मंद आगीवर जाड बुडाचे पातेले ठेवुन त्यात चमचाभर तुप घाला. नंतर त्यात गुळखोबर्याचे मिश्रण घाला. गुळ पातळ झाला कि अधुन मधुन ढवळा. सगळे एकजीव व घट्ट झाले आणि सुटलेले पाणी आटले की त्यात वेलची पुड, आवडीनुसार काजुचे तुकडे अथवा चारोळी घाला. हे मिश्रण सारणाकरीता तयार झाले. उकडीकरीता नेहमीप्रमणे जितके तांदळाचे पिठ असेल त्याच्या सव्वा पट पाणी ऊकळत ठेवा. त्यात चिमुटभर मीठ व दोन चमचे तुप घाला. पाण्याला उकळी आली कि त्यात हळु हळु पिठ मिसळा. सतत ढवळत रहा. अजिबात गुठळ्या होवु देऊ नका. गॅस मध्यम असु द्या. पिठ घट्ट होत आले कि झाकण ठेवुन एक वाफ़ येऊ द्या. नंतर ही उकड परातीत काढुन चांगली मळुन घ्या. हळदीची पाणे स्वच्छ धुवुन घ्या. पान मोठे असेल तर त्याचे दोन भाग करावेत. पोळीपाट किंवा सपाट ताटात पान पसरुन ठेवावं. उकडीचा छोटा गोळा घेवुन तो पानावर गोल थापावा.(पानाच्या मधल्या शिरेच्या दोन्हि बाजुस) थापताना मध्ये मध्ये पाण्याचा हात लावावा. म्हणजे ते पिठ एकसमान पसरते. पिठाचा थर शक्यतो पातळच असावा. नंतर कडेला पातोळी बंद करण्याएवढी जागा सोडुन मध्ये गुळखोबर्याचे सारण पसरुन घालावं. सारण बाहेर येइल इतके जास्त भरु नये. नंतर पान बंद करुन चिमटीने हळु हळु दाबुन पातोळी व्यवस्थीत बंद करावी. अशा प्रमाणे बनवलेल्या सर्व पातोळ्या मग मोदकपात्रात अथवा पातेल्यावर चाळणी ठेवुन उकडुन घ्याव्यात. उकडायला १० ते १५ मिनिटे लागतात. पानांचा रंग काळपट हिरवा झाला आणि हळदीचा सुवास आला की पातोळ्या उकडल्या हे कळते. पातोळ्या खायला देताना पानासकटच देतात. खाताना मग पान काढुन खातात. पानावर थापल्यामुळे पानाच्या शिरांचे डिझाईन त्यावर उमटते अश्या हळदीच्या सुवासाच्या पातोळ्या खायला खुप छान लागतात.
|
Neelu_n
| |
| Wednesday, August 22, 2007 - 5:04 am: |
| 
|
पातोळ्या उकडायाला ठेवण्यापुर्वी तयार पातोळ्या
|
Swa_26
| |
| Wednesday, August 22, 2007 - 6:09 am: |
| 
|
निलु, तुच बनवलीस वाटतं पातोळी?? अगदी 'अपने हाथों से' ... खुप मस्त लिहिलयंस पण!!! अगदी तपशीलवार... मी पण अशाच बनवते!!
|
Psg
| |
| Wednesday, August 22, 2007 - 7:12 am: |
| 
|
मस्त आहे कृति नीलु. फोटोअही मस्त आलाय हळदीची पानं आवश्यकच आहेत का? वासासाठी वापरतात का ती? (मोदक करायला जमत नसतील तर करंज्या करायची आयडीया सही आहे! )
|
नीलू सही आहे कृती. हळदीची पाने मिळाली तर करून पाहीन. पूनम मीही अगदी हेच विचारणार होते तसे हळदीचे पान नसेल तर पॉलिथिन च्या तुकड्याच्या आधाराने करंज्या करून त्या उकडल्या(पॉलिथीन काढून) तर होतील बहुतेक व्यवस्थित.
|
Neelu_n
| |
| Wednesday, August 22, 2007 - 8:40 am: |
| 
|
पूनम, स्वा, संघमित्रा धन्यवाद पूनम, फोटो घरचे नाहियत. इथे नेटवरच मिळाले. हळदीची पाने तर आवश्यकच आहेत. स्वाद आणि चवीसाठी त्याचच तर महत्व आहे... ह्या पातोळ्या कोकणात जास्त करुन नागपंचमीला केल्या जातात. आता नागपंचमी आणि हळदीची पाने याचा काही परस्पर संबंध आहे का हे मला ठावुक नाहीय.. दिनेशदा कदाचित यावर जास्त माहिती देवु शकतील. हळदीची पाने जर मिळत नसतील तर तुम्ही म्हणता तसे करायला काही हरकत नाही. पण उपलब्ध असतील तर त्यातच करुन बघा.
|
नीलुताई, एकदम बेष्ट रेसिपी... आणि त्याला समर्पक फोटोही... या रक्षाबंधनला करणार आहे..
|
Deepa_s
| |
| Wednesday, August 22, 2007 - 10:35 am: |
| 
|
पुण्यात कुठे मिळतील हळदीची पानं? हळदीची पानं नाही मिळाली तर कर्दळीच्या पानात केली तर चालतील का? आकार साधारण तोच मिळू शकतो.
|
Prajaktad
| |
| Wednesday, August 22, 2007 - 10:43 am: |
| 
|
तसे हळदीचे पान नसेल तर पॉलिथिन च्या तुकड्याच्या आधाराने करंज्या करून त्या उकडल्या(पॉलिथीन काढून) तर होतील बहुतेक व्यवस्थित. सन्घमित्रा! त्यापेक्शा कापडी रुमालावर छान होतिल अस वाटत शिवाय,थेट वाफ़वता येइल अर्थात, ती चव आणी सुवास येणार नाहिच म्हणा.
|
Amruta
| |
| Wednesday, August 22, 2007 - 1:28 pm: |
| 
|
आकार येइल पण सुवास? पातोळ्यांसाठि हळदिची पाने हवितच. श्रावणात हळ्दीची पाने खर तर मिळतात भरपुर. नाहीतर घरी पण कुंडीत चांगली येतात पान. आत्तापासुन लावा म्हणजे पुढच्या वेळि उपयोगी पडतील
|
Amruta
| |
| Wednesday, August 22, 2007 - 1:29 pm: |
| 
|
ह्या वर्षी मी कुठे खाउ पातोळे
|
Chinnu
| |
| Wednesday, August 22, 2007 - 3:19 pm: |
| 
|
नीलु, फोटो आणि कृती सहीच. इकडे एका Indian store मध्ये पहिली होती हळदीची पाने. आणुन करायला पायजे. अगदी तो. पा. सु.!
|
Dineshvs
| |
| Thursday, August 23, 2007 - 2:56 am: |
| 
|
नीलु आमच्याकडे पण अश्याच करतात. नागपंचमीला काहि कापायचे तळायचे नसते म्हणुन या करतात, शिवाय याच दिवसात पाने मिळतात म्हणुनही. हळदीच्या पानाला काहि पर्याय असु शकत नाही. फारतर केळीची पाने वापरु शकु पण अर्थातच सुवास असणार नाही तो. ओली हळद बाजारात मिळते. अगदी थाई दुकानातही मिळु शकेल. ती लावली तर निदान दोन चार पाने तरी मिळतील. पॉलीथीन मधे मात्र उकडु नये. ते गरम होवुन पदार्थाला चिकटु शकेल.
|
Neelu_n
| |
| Thursday, August 23, 2007 - 5:08 am: |
| 
|
दिनेशदा धन्यवाद हे मात्र खर काही गोष्टीला पर्याय नसतोच. दीपा खरं म्हणजे मुंबईत हळदीची पाने म्हणुन कर्दळीची पाने विकायला ठेवुन फसवतात. म्हणून पाने विकत घेताना नीट पाहुन घ्यावी लागतात. अगदीच हळदीची पाने नसतील तर केळीची पाने वापर.
|
Manuswini
| |
| Thursday, August 23, 2007 - 5:36 am: |
| 
|
wow! काय आठवण केलीस गं नीलू, हळदीची पाने म्हणजेc हळदीची(च) पाने, पातोळ्याची खासियत ही हळदीच्या पानामुळेच आहे. मग पातोळ्या करुच नये हळदीची पाने नसतील तर. उकडीचे मोदकच खावेत बनवून. खरच सुवास जो येतो ना त्याला तोड नाही. हे सगळे मिसते मी इथे. माझी आजी खोबर्याबरोबर तवस क्सून टाकते. तवस म्हणजे मोठी काकडी.
|
Amruta
| |
| Thursday, August 23, 2007 - 4:02 pm: |
| 
|
होय आमच्याकडे पण मोठी काकडी किसुन घालतात. हा अगदी पातोळ्यांचा season आहे. आत्ता इतक्या खाव्याश्या वाटतायत.. निलुच्या फोटोंवर समाधान मानाव लागतय
|
Manuswini
| |
| Thursday, August 23, 2007 - 5:32 pm: |
| 
|
कोकणी भाषेत तवसं म्हणजे मोठी काकडी सारखे असते, आता पावसात शेतात खुप येतात त्या. तिकडे आई सांगत होती की परवा पर्यंत खावून कंटाळलो पातोळ्या, आणी मला एकही नाही ना मी आईला म्हटले. ती अगदी योग्या वेळी चिपळुणला(तिच्या सासरी) देशात जाते. मजा असते त्यांची.
|
Bee
| |
| Friday, August 24, 2007 - 1:49 am: |
| 
|
अरे पण विदर्भातल्या पातोळ्या ह्या तिखट असतात.. हा मला कोकणी मेनू वाटतो आहे.
|
Neelu_n
| |
| Friday, August 24, 2007 - 6:17 am: |
| 
|
बी, वाटतो म्हणजे काय!! कोकणीच मेनु आहे. कोकणी BB वर कोकणीच मेनु टाकणार ना. मनुस्विनि तवसं म्हणजे मोठी काकडीच. पण मला वाटते त्या बारमाही मिळतात. आम्ही गावी गेलो की सगळ्यांकडुन त्याच भेट म्हणुन मिळतात. मनुस्विनि, अमृता तुमचे गाव कोणते?
|
Psg
| |
| Friday, August 24, 2007 - 11:20 am: |
| 
|
जमलं तर नुसत्या हळदीच्या पानाचा फोटो टाका ना म्हणजे ओळखायला सोपे जईल.. कर्दळीसारखी दिसतात का? आणि नुसत्या हळदीच्या पानालाही सुवास येतो का? जरा ओळखायला मदत करा पाहू
|