|
Shyamli
| |
| Thursday, August 16, 2007 - 4:06 pm: |
| 
|
दुधी भोपळ्याच्या सालाची चटणी साहित्य:साधारण वाटीभर दुधीची सालं, चमचाभर तीळ, पाव वाटी दाण्याचा कूट, ३ हिरव्या मीर्च्या, फोडणीचं साहित्य,मीठ कृती:जराश्या तेलावर दुधीची सालं थोडा रंग बदले पर्यंत परतून घ्यावी. यातच जरा वेळानी मीर्च्या,आणि तीळ टाकावे गार झालं की दाण्याचा कूट आणि मीठ घालून वाटून घ्यावं. वरून कढिपत्ता, हिंगाची फोडणी घालावी. ************* मस्त होते ही चटणी अजीबात ओळखता येत नाही कशाची चटणी आहे ते
|
Alpana
| |
| Friday, August 17, 2007 - 9:39 am: |
| 
|
अशीच दोडक्यांच्या सालाची पण चटणी करता येते..
|
Dineshvs
| |
| Friday, August 17, 2007 - 1:08 pm: |
| 
|
अशीच रताळे, बटाटा आणि लाल भोपळ्याच्या सालीचीही होते. लाल भोपळ्याच्या सालीची खुप छान लागते. त्यावेळी चणाडाळ घालतात, आणि ती चटणी भरड वाटतात.
|
Prajaktad
| |
| Thursday, August 23, 2007 - 8:00 pm: |
| 
|
श्यामली ! मी केली आजच भोपळ्याच्या सालीची चटणी,मस्त होते.. मी तेलावर भोपळ्याच्या साली,जिरे,हिरव्या मिरचीचे तुकडे अस परततल.जरा कुरकुरित झाल्यावर मुठभर ताजी कोथिंबिर चिरुन घातली आणी जरा जाडसर वाटल..
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|